Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गोंडवाना गणतंत्र पक्षाचे विधानसभेसाठी ३० उमेदवार निश्चित
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

गोंडवाना गणतंत्र पक्ष विदर्भात विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असून त्यापैकी ३० उमेदवारांची

 

नावे निश्चित करण्यात आली असून उर्वरित जागा लवकरच घोषित करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विष्णुकांत कुमरे यांनी दिली.
प्रदेश अध्यक्ष राजे वासुदेवशहा टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली गोंडवाना गणतंत्र पक्षाची नुकतीच बैठक झाली. बैठकीला आचार्य मोतीरावण कंगाली, मधुकर परचाके, गिलीप मडावी, श्यामकात मडावी, कवडू ओरके उपस्थित होते. यावेळी कुमरे यांनी ३० उमेदवारांची नावे घोषित करून कार्यकर्त्यांंनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले. आदिवासी समाजावर काँग्रस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाने अन्याय केला आहे. बोगस आदिवासींना शासन संरक्षण देत आहे, असा प्रचार या निवडणुकीत करण्यात येईल. कुठल्याही राजकीय पक्षाशी युती न करता गोंडवाना गणतंत्र पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असेही कुमरे यांनी सांगितले. सभेचे संचालन महेंद्र उईके यांनी केले. यावेळी विजय मसराम, संजय गेडाम, रवी सिडाम, विनोद कोवे, रमाकांत मडावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.