Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भ माध्यमिक शिक्षकही उद्याच्या संपात सहभागी
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

केंद्र शासनाप्रमाणे राज्य सरकार व निमसरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतनाच्या शिफारशी लागू

 

करण्यात याव्या या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना ४ ऑगस्टच्या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आमदार व्ही. यु. डायगव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची नुकतीच आमदार निवासात बैठक झाली असून त्यात संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शिक्षकांना केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू केलेल्या नाही. हकीम समितीने केंद्र शासनाकडे एकूण पदाच्या तुलनेत १ टक्क्यापेक्षा जास्त शिक्षक पदे आहेत. दिल्ली व इतर केंद्रशासित प्रदेशातील शिक्षकांची पदे वगळल्यास हे प्रमाण आणखी कमी होईल तर, हे प्रमाण राज्य शासनाकडे ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. १९७७ मध्ये ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप, त्या अनुषगांने राज्य शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व महागाई भत्ता मंजूर करण्याचा घेतलेला निर्णय आजही अस्तित्वात आहे. शासनाच्या तडजोड न करणाच्या भूमिकेचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने निषेध केला आहे. हा निर्णय हाणून पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डायगव्हाणे यांनी केले. पत्रकार परिषदेला दत्तात्रय मिर्झापुरे, सुभाष भात्रा, आनंदराव कारेमोरे, प्रमोद रेवतकर, कृष्णा साटोणे, विश्वास गोतमारे उपस्थित होते.