Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मिनी बसेसच्या विरोधात संतप्त ऑटो रिक्षाचालकांनी दगडफेक
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्टार बसमुळे व्यवसाय मंदावला असताना नव्याने मिनी बसेस धावू लागल्याने आणखी फटका

 

बसलेल्या संतप्त ऑटो रिक्षा चालकांनी गांधीबाग परिसरात तीन मिनी बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या.
गांधीबागमध्ये शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एमएच ३१ सीए ५१५४ क्रमांकाची स्टार मिनी बस पिपळा फाटय़ाकडे जाण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी एमएच ३१ सीए ५१७३ क्रमांकाची मिनी बस बर्डीहून आली. कामठीकडे जाण्यासाठी ती निघाली असतानाच दबा धरून बसलेले आठ-दहा ऑटो रिक्षा चालक हातात काठय़ा घेऊन बससमोर आले. ते पाहून चालकाने बस थांबवली. त्याबरोबर काहींनी बसवर चारही बाजूंनी दगडफेक करून काचा फोडल्या. त्यामुळे बसमध्ये बसलेले काही प्रवासी जखमी झाले. त्यानंतर पिपळ्याकडे जाणाऱ्या मिनीबसकडे ऑटो चालकांनी मोर्चा वळवला. या बसच्या चारही बाजूंनी काचा फोडल्या. त्यानंतर सर्वजण पळून गेले. रात्री अकरा वाजताच्या सुमारास आझमशहा चौकात एमएच ३१ सीए ५१३७ क्रमाकांच्या बसवर दगडफेकीची घटना घडली. या घटनेत एकूण तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून जखमींमध्ये अब्दुल गफार अब्दुल सत्तार (रा. मानकापूर) या बस चालकचाही समावेश आहे. तहसील व लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.