Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

प्रगतिशील लेखक संघाच्या यवतमाळ शाखेची स्थापना
प्रश्नगतिक वैचारिकतेचा प्रवास खुंटलेला नाही -डॉ. जोशी
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

संतांपासून ते समाजसुधारकांपर्यंत झालेल्या प्रश्नगतिक वैचारिकतेचा प्रवास खुंटलेला नसून तो

 

खुंटला आहे असे भासवले जात असल्याचे मत कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे व्यक्त केले. प्रगतिशील लेखक संघाच्या यवतमाळ शाखेच्या स्थापनेप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. जोशी म्हणाले, ‘प्रगतिशीलता ही वृत्ती असून ती कुणा विशिष्ट पक्षाची वा गटाची मिरासदारी नाही. ही वृत्ती जितकी आधुनिक तेवढीच सनातन देखील आहे. लेखक- कलावंतांची जातीय वाटणी करण्याची कितीही कारस्थाने रचली तरी शेवटी ती पराभूत करण्याचे सामथ्र्य या प्रगतिशील लेखक-विचारवंतांच्या अभिव्यक्तीत असते, याबाबत दृढ विश्वास बाळगण्याची गरज आहे. डॉ. प्रवीण बन्सोड यांनी वर्तमानातील सामाजिक आणि सांस्कृतिक पाश्र्वभूमी सांगून प्रगतिशील वैचारिक भूमिका मांडली.
यवतमाळ जिल्हा प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा निमंत्रक म्हणून याप्रसंगी प्रसिद्ध लेखक विनय मिरासे यांची निवडही करण्यात आली. यावेळी मिरासे म्हणाले, बहुजनांच्या चळवळीच्या नावाखाली आत्मस्तुती व स्वार्थाची बजबजपुरी माजवणाऱ्यांपासून सावध करण्याची गरज असून ‘बोले तैसा चाले’ या वचनाप्रमाणे ‘करणी आणि कथनीत’ फरक नसणाऱ्या लेखक कार्यकर्त्यांची समाजाला फार गरज आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील सर्व १६ तालुक्यातील प्रत्येकी एका प्रतिनिधीला यवतमाळ जिल्हा प्रगतिशील लेखक संघात स्थान दिले जाणार असून हे प्रतिनिधी त्या त्या तालुक्याचे प्रगतिशील लेखक संघाच्या शाखेचे निमंत्रक राहतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
प्रगतिशील लेखक संघाच्या यवतमाळ शाखेच्या निमित्ताने यवतमाळला प्रथमच एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील लेखकांच्या संस्थेच्या नकाशावर स्थान मिळाले आहे, असे अरुण जवके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळवले आहे. कार्यक्रमाला नामदेवराव राजगुरे, मधुकर शूरपाटणे, हिंमत पाटमासे, अरुण जवके, हरिहर जोशी, दिवाकर नागपुरे, विनय मिरासे, निरंजन गोंधळेकर, अलिम सौदागर, नाना उईके, शंभरकर, गजानन बोदे आदी उपस्थित होते.