Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अण्णाभाऊ साठेंना विविध संघटनांची आदरांजली
नागपूर, २ जुलै /प्रतिनिधी

सहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांतर्फे कार्यक्रम करून

 

त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, अशोक मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी बी.एस घाटे आदी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रवेश काँग्रेस कमिटीतर्फे सचिव प्रमोद दरणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या दीक्षाभूमीतील पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. प्रमोद दरणे म्हणाले, लावणी, पोवाडे व लोकनाटय़ातून भारतभर फिरून शोषित , दलित पीडित समाजाचे दुख समाजासमोर मांडून जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे मोठे साहित्यिक होते. यावेळी सीताराम लोखंडे, विष्णुपंत ठाकरे, सुरेश मुरकुटे, प्रश्न. बाबुराव मते, विजय राजणेकर, अॅड संदीप उमरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंचातर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. भीमराव फुसे, अॅड सुरेश घाटे, सुधीर लांडगे, वंदना भगत, रत्ना मेंढे, सुनंदा रामटेके, जया पानतावणे, नंदा गोडघाटे, सविता पाटील, अरुणा शेंडे, चंद्रकला शेळके, अरविंद खोब्रागडे उपस्थित होते. भारतीय नागरिक संघर्ष मंचातर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोहर फूकट, ओमप्रकाश सोमकुवर, रविंद्र मानकर, मनोहर शहाणे, नरेश जांभुळकर, विराज मुडे, अतुल गोंडाणे उपस्थित होते.
संगमेश्वर बालगणेश समाज मंडळातर्फे विजय सुयर्ंवंशी यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले. यावेळी गोविंद मुदलीयार, भैय्यासाहेब शंभरकर, संजय गोडबोले, अशोक कांबळे उपस्थित होते. यावेळी कन्हैयालाल कुर्वाने, मोतीलाल कुर्यवंशी, बाबुलाल चौरसिया, अमर सुर्यवंशी, अजय बावने, रविबाबू जोशी या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. संजय कुर्यवंशी यांनी संचालन केले. भारतीय बौद्ध महासभा, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवा प्रतिष्ठान, दलित आदिवासी मुक्ती मोर्चातर्फे अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली.