Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

संगीतकार अशोक पत्की सादर करणार ‘सप्तसूर माझे’
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वरवेध संस्थेतर्फे प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा ‘सप्तसूर माझे’

 

हा मराठी- हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अशोक पत्की रसिकांशी संवाद साधणार आहे.
वसंतराव देशपांडे सभागृहात रात्री ८ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली बहारदार भावगीते, मालिका गीते, नाटय़गीते सादर करण्यात येणार आहेत. कार्यक्रमात सादर करण्यात आलेली गीताची माहिती देऊन अनेक मान्यवर गायकांनी ती कशी सादर केली आणि त्यावेळेच्या काही आठवणी ते या कार्यक्रमात सांगणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना अॅड. भानुदास कुळकर्णी यांची आहे.
या कार्यक्रमात अनिरुद्ध जोशी, निरंजन बोबडे, रसिका चाटी आणि आश्लेषा साल्पेकरही गीते सादर करणार आहेत. रेणुका देशकर या कार्यक्रमाचे संचालन करतील. मोरेश्वर दहासहस्त्र, अॅड भानुदास कुळकर्णी, आनंद मास्टे, महेंद्र ढोले, श्याम ओझा, अरविंद उपाध्ये, नंदू गोहणे, अमर शएंडेस, प्रसन्न वानखेडे, प्रवीण लिहितकर, नितीन चिमोटे आणि गजानन रानडे साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम रसिकांसाठी निशुल्क असला तरी प्रवेशपत्रिकेशिवाय रसिकांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेत्रपत्र अॅड. भानुदास कुळकर्णी,जे- ६ महर्षी कार्तिकेय, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे मिळतील, असे स्वरवेधतर्फे कळविण्यात आले आहे.