Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा
नागपूर २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू

 

करण्यात याव्या अन्यथा, केंद्रातील कर्मचारी ७ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करतील, असा इशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी दिला.
देशाच्या सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाचे योगदान देऊन कार्य करणाऱ्या या केंद्राचे अध्यक्ष राज्यपाल आहेत. देशातील सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राचे नियम, कर्मचारी, अधिकारी यात तफावत आहे. प्रत्येक वेळी केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले पण, त्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रात सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या असून नागपुरातील केंद्रात केंद्राचे संचालक वगळता अन्य एकाही कर्मचारी व अधिकाऱ्याला लागू झाला नाही.
येत्या ४ सप्टेंबपर्यंत सहाव्या वेतन आयोगाबाबत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही तर येत्या ७ सप्टेंबरपासून कर्मचारी कामबंद आंदोलन करतील अशा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.