Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

शेतीवाडी

बीटी कापूस लावणारे असमंजस आहेत का?
आज जे लोक कोल्हापुरात जी. एम. मक्याला विरोध करीत आहेत, तेच लोक यापूर्वी जी. एम. कापूस (बी.टी. कापूस) भारतीय शेतकऱ्यांना दिले जाऊ नये म्हणून प्रयत्नशील होते. या लोकांच्या प्रचंड विरोधामुळे आणि दहशतीमुळे बी. टी. कापूस तब्बल ६ वर्षे (१९९६ ते २००२) भारतीय शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. १९९६ मध्येच बी. टी. कापसाची मोठय़ा प्रमाणात चाचणी होऊन त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे स्पष्ट झाले होते. तरीही त्या विरोधात जी. एम. मक्यासारखाच धादांत खोटा, विषारी प्रचार करून काही लोकांनी सदर बियाणे भारतात येऊ देण्यास विरोध केला होता. यवतमाळ जिल्ह्य़ात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बी.टी. कापसाचे चाचणी प्रयोग झाले होते. त्या वेळी यात टर्मिनेटर जनूक असून त्यामुळे आजूबाजूची शेती नष्ट होईल, असा खोटा प्रचार करून शेतकऱ्यांना त्याच्या विरोधात उभे केले गेले. काही आरोळकांनी रानात शिरून बी. टी. कापसाची झाडे उपटली. एका बाजूला चाचणी प्रयोग होऊ द्यायचे नाहीत. नंतर यांची पुरेशी तपासणी झाली नाही म्हणून सदर बियाणे शेतकऱ्यांना दिले जाऊ नये, अशी मागणी करायची हे तंत्र त्यांनी अवलंबले.

शेती मूलोद्योग शाळा
आपल्याकडं तिसेक वर्षांपूर्वी शेती मूलोद्योग शाळा असायची. शाळेची शेती असायची. शाळेच्या शेतीत सारे विद्यार्थी महिना किंवा पंधरवडय़ातून एक दिवस कामाला जायचे. कुठे फळझाडांच्या बागेतलं गवत काढायचं, कुठं पिकातलं तण खुरपून काढायचं. काही वेळ नुसतं फिरायचं त्या शेतातून. शाळेच्या अभ्यासाला बुट्टी म्हटल्यावर पोरांना बरंही वाटायचं. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अशा शाळा होत्या. नंतर काळाच्या ओघात त्या शाळाही नुसत्या शिक्षणांचे, पुस्तकी ज्ञानाचे कारखाने बनल्या. वांग्याचं, टोमॅटोचं झाड फक्त पुस्तकातच पाहायचं. केवळ शहरी दृष्टिकोन ठेवून लिहिलेली ही पुस्तकं घोकंपट्टीतून विद्यार्थी तयार करू लागली.

दुवा
भारतातील शेतीला यंदा पावसाने आधीपासूनच ग्रहण लावले आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडून मुबलक अन्नधान्य साठा करण्याचे अंदाज आता चुकणार असल्याचे साऱ्यांच्याच लक्षात येऊ लागले आहे. एका बाजूला पाण्याची अवस्था बिकट होत असताना महत्त्वाचा खरिपाचा हंगाम फारसा हाताशी येणार नाही, असे दिसते. परिणामी, यंदाचा काळ शेतकऱ्याला फारसा सुखावह नाही. नाही तरी तो क्वचितच व काहीजणांनाच सुखावह असतो. त्यामुळे निसर्गाशी व येईल त्या स्थितीशी सामना करण्यासाठी भारतीय शेतकरी पुन्हा एकदा उभा ठाकणार आहे. त्यात सरकारच्या कुबडय़ा किती हातापर्यंत पोहोचतात, हा नेहमीचा प्रश्न कायमचा आहे.

गवती चहा
सुगंधी तेल वनस्पती- भाग १
जमीन व हवामान - पाण्याचा निचरा होणारी रेताड जमीन या पिकाच्या लागवडीस योग्य आहे. लाल व वालुकामय जमिनीत हे पीक चांगले येते. कारण त्यामध्ये मुळांची वाढ उत्तम होते. कॅल्शियमयुक्त जमिनित, तसेच ज्या ठिकाणी पाणी साचून त्याचा निचरा होत नाही, तिथे हे पीक घेवू नये. गवती चहाला उबदार व उष्ण हवामान मानवते. भरपूर सूर्यप्रकाश व सम प्रमाणात पडणारा पाऊस गवती चहाच्या वाढीस पोषक असतो.
पूर्व मशागत- गवती चहाचे पीक एकदा लागवड केल्यानंतर ४-५ वर्षांपर्यंत जमिनीत रहाते. त्यासाठी लागवडी अगोदर चांगली मशागत करावी. जमिनीची उभी व आडवी नांगरट करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी १२-१५ टन शेणखत/ कंपोस्ट खत मिसळावे.