Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

अकरावी प्रवेश समितीच्या बरखास्तीने दलालांचे उखळ पांढरे
ज्योती तिरपुडे

अकरावी केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त होऊन मुख्याध्यापकांना प्रवेश देण्याचे अधिकार नुकतेच देण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर नको ही केंद्रीय प्रवेश समिती, असा सूर काही महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि पालक आळवत आहेत. समिती बरखास्त होऊनही धनवटे नॅशनल महाविद्यालयात पालक जातात आणि मुलाला प्रवेश मिळाला नाही म्हणून समिती सदस्यांना अद्वातद्वा बोलतात.

राजकीय वारसा नसलेला नेता
राजेश गांजेगावकर

घरातील कुणीही ग्रामपंचायतीची देखील निवडणूक लढविलेली नाही. पोलीस दलाच्या नोकरीचा राजीनामा देऊन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर उत्तमराव इंगळे यांनी विधानसभा गाठली. सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा निर्माण केली. २००४ मध्ये त्यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली.उमरखेड मतदारसंघात महागाव तालुक्याचा समावेश होतो. मतदारसंघात रस्त्याची समस्या अधिक बिकट होती. रस्ते विकासाचे जाळे विणण्याच्या कामाला उत्तमरावांनी प्रश्नधान्य दिले. त्यामुळेच जवळपास ८० टक्के खेडय़ांना पक्के रस्ते झाल्याचे चित्र आज मतदारसंघात दिसत आहे.

गडचिरोली जिल्हा न्यायालयात सुविधा केंद्राचे उद्घाटन
गडचिरोली, २ ऑगस्ट / वार्ताहर

अमेरिकासारख्या देशात मधस्थी समुपदेशनाची संकल्पना लोकप्रिय आणि लाभदायक ठरली असून ही संकल्पना देशात सध्या कार्यान्वित करण्यात आली आहे. गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या मध्यस्थी समुपदेशन केंद्र तसेच सुविधा केंद्राचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.आर. डोणगावकर यांनी केले.गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधि सेवा प्रश्नधिकरण मध्यस्थी समुपदेशन केंद्र आणि सुविधा केंद्राचे उद्घाटन डोणगावकर यांनी केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

सर्पमित्रांनी दिले शेकडो सापांना जीवदान
भंडारा, २ ऑगस्ट / वार्ताहर

लाखनी येथील ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब, साकोली येथील ग्लोबल व चातक नेचर क्लब तसेच हरितसेना या माध्यमातून काम करणाऱ्या सर्पमित्र स्वयंसेवकांनी जून आणि जुलै महिन्यात शेकडो सापांना जीवदान दिले. शिवाय लोकांना प्रबोधन देत ‘साप मानवाचे शत्रू नव्हेत,’ ही भावना रुजवण्यात काही अंशी यश मिळवले. ‘नागपंचमी’ सण सर्पमित्रांनी अभिनवरीत्या साजरा केला. ग्रीन फेंड्स नेचर क्लबचे संघटक प्रश्न. अशोक गायधने मोठय़ा संख्येत लाखनी आणि साकोली तालुक्यात सर्पमित्र कार्यकर्ते तयार करण्यात यशस्वी झाले आहेत.

देवरीतील सालासर ट्रेडर्सवर कृषी विभाग भरारी पथकाचा छापा
गोंदिया, २ ऑगस्ट / वार्ताहर

मिश्र खतासोबत सुजला १९:१९:१९ चे ७० ग्रॅमचे पाकीट तयार करून अधिक किमतीत विकून शेतकऱ्यांची लूट करणारे सालासर ट्रेडर्स, देवरीचे मालक राम अवतार मोहनलाल अग्रवाल यांच्याविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा घालून कार्यवाही केली.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ; ‘श्रेणी सुधार योजने’चा शेकडोंना लाभ
यवतमाळ, २ ऑगस्ट / वार्ताहर
पदव्युत्तर पदवी श्रेणी सुधार योजनेचा लाभ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शेकडो पदवीधारकांनी घेतला असून विद्यापीठाने आपल्या अध्यादेशात केलेल्या बदलामुळे अनेकांच्या अंध:कारमय जीवनात यशाचा प्रकाश आला असल्याची उच्च शैक्षणिक वर्तुळात प्रतिक्रिया आहे.

‘शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याची गरज’
उमरखेड, २ ऑगस्ट / वार्ताहर

कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यांची माहिती विविध प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना दिली गेली तर त्यांच्या शेतीच्या उत्पादनात विशेष भर पडेल, असा विश्वास उमरखेड पंचायत समिती सभापती रंजना बेडंके यांनी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषिदिन कार्यक्रमात व्यक्त केला.

शेतकऱ्यांना पीक विम्याचे लाभ घेण्याचे आवाहन
खामगाव, २ ऑगस्ट / वार्ताहर

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी पीक योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील सूचना करण्यात आल्या आहेत. या योजनेत अन्नधान्य खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, गळीत धान्य सोयाबीन, तीळ व नगदी पिके कापूस आदी प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा विमा हप्ता ठरवण्यात आलेला आहे. अल्प व अत्यल्प भूधारकासाठी पीक विमा हप्ता रकमेत कापूस पिकाकरिता ७५ टक्के व इतर पिकाकरिता ५० टक्के सूट राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी जे.एन. ठेंग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माळी समाजातील गुणवंतांचा सत्कार
खामगाव, २ ऑगस्ट / वार्ताहर

स्थानिक माळी सेवा मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील गुणवंत विद्यार्थी, पुरस्कारप्रश्नप्त व्यक्ती व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार नुकताच माळी भवन येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव इंगळे होते. या समारंभात इयत्ता ४ थी, ७वी, १०वी, १२वी तसेच पीएमटी, सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा संघटक हा पुरस्कार प्रश्नप्त झाल्याबद्दल सीताराम तायडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच मेहकर नगरपरिषदच्या नगराध्यक्ष सुमन तायडे, नांदुरा नगरपरिषदचे उपाध्यक्ष अनिल सपकाळ, साहित्यिक सदानंद शिनगारे, क्रांती युवा मंचचे संतोष निलेखन, जे.पी. चोपडे, विनायक जुमळे, गजानन क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अरविंद शिंगाडे, प्रश्नस्ताविक अजय तायडे व आभार प्रदीप सातव यांनी मानले.

स्टेट बँक शाखेचा वर्धापन दिन साजरा, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
मोर्शी, २ ऑगस्ट / वार्ताहर

भारतीय स्टेट बँक शाखा मोर्शीतर्फे ग्राहक दिन, खरीप महोत्सव व बँकेचा वर्धापन दिन शिवाजी रंगमंदिरात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक अ.मा. कांबळे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जी.सी. बिऱ्हाडे, प्रश्नचार्य डॉ. उईके, रूपराव बंकाडे उपस्थित होते. यावेळी पाच दत्तक मुली व पंधरा गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व गणवेषांचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयीन गुणवत्ता प्रश्नप्त ३० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. दहा बचत गटांना कर्जमंजुरी पत्र, पाच उत्कृष्ट गटांना स्मृतीचिन्ह तसेच पंधरा उत्कृष्ट ग्राहक, तीन एस.बी.आय. लाईफचे ग्राहक, निवृत्तीधारकांचा सत्कार घेण्यात आला. वाघ यांच्या समाजसेवेच्या कार्याबद्दल यांनाही सन्मानित करण्यात आले. शाखेच्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा प्रदानासाठी गौरविण्यात आले. संचालन अतुल काळे यांनी तर प्रश्नस्ताविक राजेश खिल्लारे यांनी केले. आभार धनश्री वानखेडेने मानले.

विवेकानंद मानवसेवा संस्थेची वर्धा-मुंबई एड्स जनजागृती यात्रा
वर्धा, २ ऑगस्ट / प्रतिनिधी
विवेकानंद मानवसेवा संस्थेतर्फे वर्धा ते मुंबई एड्स जनजागृती यात्रेस प्रश्नरंभ झाला. वर्धा, अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक अशा मुख्य मार्गावरून चालणाऱ्या या यात्रेद्वारे गावोगावी विविध जनजागृतीपर उपक्रमात पथनाटय़, रोड शो, जागृतीपर साहित्याचे वाटप, मार्गदर्शन शिबिरे, शाळा महाविद्यालयात प्रबोधनात्मक व्याख्यान असे व अन्य कार्यक्रम यात्रे दरम्यान होणार असल्याची माहिती संयोजक प्रश्न.मोहनी सवाई यांनी दिली. यात्रेत संस्थेचे वशिष्ठ भगत, योगेंद्र कोलते, राजू वानखेडे, प्रदीप शेंडे, हिरालाल अडकिणे, पपीता मून, शारदा पेटकर यांचा सहभाग आहे. यात्रेच्या प्रश्नरंभी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीकांत साटोणे, नीरज नखाते, अरुण कांबळे, प्रश्न. प्रवीण वानखेडे प्रश्नमुख्याने उपस्थित होते.

जिल्हा स्तरीय झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा
गोंदिया, २ ऑगस्ट / वार्ताहर

देवाजी बुद्धे मेमोरियल शारीरिक शिक्षण महाविद्यालय व अर्जुन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा पातळीवरील झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा १२ ते २१ ऑगस्टदरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी संघांनी अर्ज १० ऑगस्टच्या पूर्वी डी.बी.एम. शारीरिक शिक्षण महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष अमित बुद्धे यांनी केले आहे. विजयी संघाला दहा हजार व दोन हजार अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रश्न. अमित बुद्धे, प्रश्न. अनिल बुद्धे, संजय यादव, महेश करियार, लालचंद पारधी, सुषमा गौर, किशोर पटले, किशोर कनोजिया, त्रिलोक तुरकर यांच्याशी संपर्क साधता येईल.

४ जुगाऱ्यांना अटक
वरूड, २ ऑगस्ट / वार्ताहर

पांढुर्णा चौकात जुगार खेळणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आली. प्रकाश पाटील, पिरु खाँ, ताजु खाँ, पठाण, महेश ठाकरे, मुन्ना चव्हाण यांना रंगेहात अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जनाबाई कव्हर यांचे निधन
वाशीम, २ ऑगस्ट /वार्ताहर

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांच्या आजी जनाबाई गोविंदराव कव्हर यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या.

मोर्शीत वृक्षारोपण
मोर्शी, २ ऑगस्ट / वार्ताहर

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने गांधी मार्केट येथे वृक्षारोपण करण्यात आले. शाखा व्यवस्थापक अ.मा. कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. यावेळी मालटे, शेख यांना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, पर्यावरण जोपासण्याबद्दल सन्मानित केले.

बसपचा तहसील कार्यालयावर मोर्चा
मोर्शी, २ ऑगस्ट / वार्ताहर

बहुजन समाज पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर विविध मागणी संदर्भात मोर्चा नेण्यात आला. मोर्शी व वरूड परिसरातील दारिद्रय़ रेषेंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना बी.पी.एल. देण्याबाबत, पेट्रोल, डिझेलची भाववाढ कमी करणे, कापसाला प्रति क्विंटल ४ हजार रुपये हमी भाव, सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमी भाव, पंचायत समिती विशेष घटक योजनाचे धनादेश देण्यात यावे, रेशन कार्डाचे त्वरित वितरण, बेनोडा येथे अतिसाराने मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत, डोमक, आष्टोली, तरोडा, रायपूर, रिद्धपूर गारपीटग्रस्तांना मदत व संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई, खताचा तुटवडा दूर करावा, निराधारांना त्वरित मदत, वरूड येथे गॅस एजन्सी देण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी बिराडे यांना देण्यात आले. डॉ. वसंत लुंगे, अ‍ॅड. नागले, संजय पाटील, हरले, सियाले, झाडोदे, शिंगरवाडे, डवरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा
गोंदिया, २ ऑगस्ट / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षकि सर्वसाधारण सभा गुर्जर क्षत्रिय समाजवादी रेलटोली गोंदिया येथे एम.आर. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली अधीक्षक अभियंता पी.एम. माटे, कार्यकारी अभियंता सी.एम. खंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. व्यासपीठावर पाहुणे म्हणून विभागीय सचिव एस.एस. फुंडे, एम.एस.ई. वर्कर्स फेडरेशनचे विभागीय सचिव बी.ए. पठाण, देवरी, विभागीय सचिव वाय.आर. गाते प्रश्नमुख्याने उपस्थित होते. फुंडे, खंडाळकर, विशाल ढोले, हौसलाल रहांगडाले यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. सभेत सेवानिवृत्त सभासदांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. सभासदांच्या मुला-मुलींना शैक्षणिक प्रश्नेत्साहन बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.

पर्यवेक्षिकेचा प्रश्नमाणिकपणा; बँकेला दहा हजार रुपये परत
नेरपरसोपंत, २ ऑगस्ट/ वार्ताहर

आजही जगात प्रश्नमाणिकपणा जिवंत आहे, याचा प्रत्यय येत असतो. अशीच घटना नेरमध्ये गुरुवारी घडली. शोभा पारधी यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेकडून चुकीने आलेली दहा हजारांची रक्कम बँकेला परत केली. शोभा पारधी या बालविकास सेवा पंचायत समिती अंतर्गत माणिकवाडा प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात पर्यवेक्षिका आहेत. गुरुवारी मध्यवर्ती सहकारी बँकेतून खात्यातून पैसे काढल्यानंतर घरी पोहोचल्यावर उशिरा संध्याकाळी त्यांच्या लक्षात आले की, रोखपालकडून १० हजार रुपये जास्त मिळाले आहेत. तोपर्यंत बँक बंद झाली होती म्हणून दुसऱ्या दिवशी ही जास्त आलेली रक्कम त्यांनी संबंधित बँकेचे कर्मचारी एस.एन. खोब्रागडे आणि पी.पी. लावरे यांना परत केली. यावेळी नेर पालिकेचे नगराध्यक्ष सत्यविजय गुल्हाने, उपाध्यक्ष उमरशहा तुराबशहा, नगरसेवक विलास मते, बाशीत खान तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. चिन्नावार यांना राष्ट्रीय समता पुरस्कार
उमरखेड, २ ऑगस्ट/ वार्ताहर

येथील समाजसेवी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेचे अध्यक्ष डॉ. एम.एम. चिन्नावार यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विशेष समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे समता साहित्य अकादमी या संस्थेच्यावतीने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते डॉ. चिन्नावार यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रतनलाल सोनाग्रा, माजी आमदार रामदास तडस, संस्थेचे अध्यक्ष देवानंद तांडेकर प्रश्नमुख्याने उपस्थित होते.

बंजारा क्रांतीदल जिल्हाध्यक्षपदी उत्तम जाधव
उमरखेड, २ ऑगस्ट/ वार्ताहर

तालुक्यातील राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाचे सक्रिय कार्यकर्ते उत्तमराव जाधव यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांतीदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ही नियुक्ती केली आहे. जाधव हे यापूर्वी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कार्यरत होते. या पदाच्या अल्पावधीतच बंजारा क्रांतीदलाच्या माध्यमातून त्यांनी जनहिताच्या अनेक समस्यांवर विविध स्वरूपाची आंदोलने करून त्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले व शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांची थेट जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

८७८ शेतकऱ्यांच्या जमिनीवर वृक्षलागवड
भंडारा, २ ऑगस्ट/ वार्ताहर
जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १ कोटी १० लाख ३० हजार २७ रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या मान्यताप्रश्नप्त कामातून ८७८ शेतकऱ्यांच्या जमिनीवर वृक्षलागवड करण्यात येणार असून त्याकरिता शिवणीबांध येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत २५ हजार विविध रोपे तयार केली जातील. वृक्षारोपण शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर तसेच बांधावर केले जाईल.

वाशीममध्ये वृक्षारोपण
वाशीम, २ ऑगस्ट / वार्ताहर

शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाशीम शहर शिवसेनेच्यावतीने येथील पुसद नाका परिसरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले. शिवसेनेच्या शहर शाखेच्यावतीने शहर प्रमुख कैलास गोरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागात व पुसद नाका परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा प्रमुख सुधीर कव्हर, अ‍ॅड. संतोष मालस, तालुका प्रमुख वाघजी सुर्वे, यांच्या हस्ते नागरिकांना फराळी खिचडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शहर प्रमुख कैलास गोरे, उपतालुका प्रमुख रामा इंगळे, माणिक देशमुख, उपजिल्हा प्रमुख सुरेश कदम, दिलीप काष्टे, अविनाश गव्हाणकर, नगरसेवक राजू भांदुर्गे, लखमीचंद केसवाणी, अविनाश चव्हाण, केशव दुबे, बाळू धामणे, बंडू शिंदे, राजू कल्ले, विजय शेळके, श्याम खंदारकर, निलेश देशमुख आदी पदाधिकाऱ्यांसह टॅक्सी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

घरासाठी चक्क ‘फोर फेज’ची जोडणी
पुसद, २ ऑगस्ट / वार्ताहर

येथील श्रीनगर परिसरातील संदीप जाधव यांनी त्यांच्या घरातून चक्क ‘फोर फेज’ प्रवाहित विद्युत तारा घेतल्यामुळे वीज चोरीबद्दल महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घरमालकास बेचाळीस हजार रुपयांचा दंड ठोकला आहे. परंतु, नगरपालिकेने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.
दोन वर्षापूर्वी येथील बसस्थानकासमोरील अ‍ॅड. भंडारी यांच्या संकुलावरून अशाच विद्युत प्रवाहित तारा गेल्या असता बांधकामावर पाणी टाकणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाला होता. अतिक्रमण करणे, शासकीय जागेवर कूळ करणे, वीज चोरणे अशी अवैध कामे येथील नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पथदिवे दुरुस्त करून घेण्याचे आदेश देताच काही दिवसानंतर पुसद शहरातील पथदिवे दिवसासुद्धा सुरू राहिले. हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी जनतेची मागणी आहे.

ओबीसी संघर्ष समितीचा रास्ता रोकोचा इशारा
चंद्रपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे, अन्यथा उद्या, ३ ऑगस्टला रास्ता रोको करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांनी दिला. मूल तालुक्यातील चांदापूर, फिस्कुटी, गवराळा, राजगड, बोरचांदली, विरई, गडिसुर्ला, जुनासुर्ला या गावांना हरणघाट उपसा जलसिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे, यासंदर्भात १ ऑगस्टला जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांच्यासोबत महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, राजेंद्र खांडेकर, शेतकरी आनंदराव तिवाडे, रवी चिंचोलकर, गणपतराव पाल, खुशाल शेरकी, भाऊ देशमुख, गजानन नागरकर, दिलीप पाल, अजय गुन्नुलवार, वासुदेव समर्थ यांची बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी काळभोर यांनी लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी खापेकर यांना पाणी सोडण्याचे निर्देश दिले. मात्र अजूनही पाणी सोडण्यात आले नाही.