Leading International Marathi News Daily
रविवार, २ ऑगस्ट २००९

परिश्रमातून आनंद
गुरू, राहूचं सहकार्य शनिवारच्या बुध, शुक्र शुभयोगापर्यंत मिळत राहणार असल्याने सत्कारणी परिश्रमाचा आनंद लाभणारा आहे. व्यवहाराची गाडी रुळावर येईल. कल्पना कृतीत येतील. संपर्क, चर्चा, बैठकी यातून नवी कार्ये उभी करता येतील. अर्थशक्ती मजबूत करता येईल, परंतु रवी, केतू सहयोग चतुर्थात असेपर्यंत प्रपंचातील शांती विचलीत होऊ नये आणि प्रकृतीने त्रास देऊ नये एवढी काळजी घ्यावी. या काळात परमेश्वरी प्रश्नर्थना खूप उपयुक्त ठरेल. मन शांत ठेवा.
दिनांक- ३ ते ७ शुभकाळ.
महिलांना- संसारात संयम ठेवा

प्रवास सफल होईल
राशिस्थानी मंगळ, मिथुन शुक्र, भाग्यात गुरू-राहू प्रयत्न, कार्य, कृतीच्या समन्वयातून सुरू राहणारा प्रवास शनिवारच्या बुध- शुक्र शुभयोगापर्यंत अंतिम टप्प्यापर्यंत सहज पोहोचणार आहे. प्रश्नरंभीच्या समस्या नारळी पौर्णिमेपासून अचानक सुटू लागतील. त्यामुळे नाहक चिंता करण्याचे कारण नाही. शेती, व्यापार, राजकारण, अर्थप्रश्नप्ती यामध्ये स्थिर होता येईल. चतुर्थात बुध- शनी सहयोग असेपर्यंत प्रपंचातील शांती कल्पकतेने सांभाळावी लागेल. देवधर्माचा आधार मिळेल. देवावर श्रद्धा ठेवा.
दिनांक- ५ ते ८ शुभकाळ.
महिलांना- देवावर विश्वास ठेवा, प्रयत्न करा. मन शांत ठेवा.

भक्तीमधील शक्ती यश देईल
राशिस्थानी शुक्र, पराक्रमी बुध, शनी शनिवारी होत असलेला बुध-शुक्र शुभयोग यातूनच काही प्रकरणे मार्गी लावता येतील. नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील, परंतु साहस करू नका. नियम सांभाळा, आश्वासनावर विसंबू नका आणि हवामानावर लक्ष ठेवा. आष्टमातील गुरू- राहू व्ययस्थानी मंगळ असेपर्यंत केव्हा कसे अडवतील याचा भरवसा नाही. पथ्य ठेवा, पुढे चला. भक्तीमधून मिळणारी शक्ती समस्यांवर विजय मिळवून देऊ शकेल, याचा प्रत्यय येईल
दिनांक- ३, ४, ७, ८ या वेळी येईल.
महिलांना- प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.

घाईगर्दीत कृती नको
साडेसाती, सूर्य- केतू सहयोग, व्ययस्थानी शुक्र यांच्यातून नवे नवे प्रश्न समोर येत राहतील आणि संभ्रम वाढतील. कोणत्याही प्रकारची घाईगर्दी न करता चित्र स्पष्ट होईपर्यंत कृती करायची नाही, एवढे पक्के ठरवून टाका. आणि जमतील तेवढे उद्योग सुरू ठेवा. पैशाची देवघेव, विश्वासातील मंडळी, प्रकृतीच्या तक्रारी यामध्ये सतर्क राहणे फायद्याचे ठरणार आहे. श्री मारुतीची उपासना, आराधना साडेसातीची तीव्रता कमी करील.
दिनांक- ३, ४, ७, ८ सतर्क राहा.
महिलांना- संसारात लक्ष ठेवा. समाजकार्यात सावध राहा. कोणत्याही प्रसंगावर शांतपणे विचार करून निर्णय घ्या.

आधाराने गाडी पुढे सरकेल
साडेसाती पर्वामध्ये गुरू, राहू, केतू यांचे अशुभ परिणाम सुरू झाले म्हणजे व्यवहाराची गाडी अडचणीत येते. त्यातून आर्थिक दडपण, आरोग्याच्या तक्रारी, प्रश्नपंचिक तणाव अशा समस्या निर्माण होतात. शुक्र-मंगळाच्या आधाराने प्रतिष्ठा सांभाळता येईल. श्री मारुतीची उपासना, आराधना मन:शांती देईल. आणि बुध- शुक्र शुभयोगामुळे समस्यांची सामना करणारा उत्साह मिळेल. यातूनच शनिवापर्यंत उद्योगी प्रवास सुरू ठेवता येईल. नवीन उपक्रम मात्र कृतीत आणू नका.
दिनांक- ३, ४, ७, ८ शुभकाळ.
महिलांना- प्रसंग पाहून निर्णय व कृती करा.

संधीचा फायदा उठवा
पंचमात गुरू, राहू आणि शुक्र, मंगळाचं सहकार्य या काळात साडेसातीच्या परिणामांची तीव्रता कमी होते. झटपट निर्णयातून कृती यश देते. त्यातून संरक्षण मजबूत करता येईल. याच संधीचा फायदा कन्या व्यक्तींनी व्यापार, शेती, राजकारण, कलाप्रश्नंत, शिक्षण क्षेत्र यामध्ये करून घेणे आवश्यक आहे. बुध- शुक्र शुभ योगातील काही युक्ती, तंत्र नवा उत्साह देतील. आर्थिक प्रगतीसाठी त्याचा उपयोग होईल. धावपळीत आरोग्याच्या तक्रारींवर दुर्लक्ष नको. नामस्मरणातून आनंद मिळेल.
दिनांक- ३, ४, ७, ८ सतर्क राहा.
महिलांना- प्रयत्नाने कार्यभाग साधता येईल. यश मिळेल.

लक्ष ठेवा, पुढे चला
भाग्यात शुक्र, लाभात बुध-शनी आणि बुध- शुक्राचा शुभयोग यांचा उपयोग कार्यभाग साधणे, प्रतिष्ठा सांभाळणे एवढय़ासाठी करून घेता येणार असला, तरी गुरू-राहू चतुर्थात, मंगळ अष्टमात यांच्या अनिष्ट परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. शब्द-वेळ-कृती यांच्या समन्वयासाठी सूचकता उपयोगात आणली तर शनिवापर्यंतचा कार्यपथावरील प्रवास बराचसा सफल होणारा आहे. नारळी पौर्णिमा दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरेल. शुभवार्ता समजतील.
दिनांक : ३, ४, ७, ८ शुभ काळ.
महिलांना : हुशारीने मार्ग शोधून परिश्रमातून यश मिळवता येईल.

श्रेष्ठत्व सिद्ध होईल
पराक्रमी गुरू, राहू, सप्तमांत मंगळ, दशमांत शनी, बुध अवघड कार्यातील यश, नवीन क्षेत्रातील प्रवेश, बौद्धिक वर्तुळातील शोध, व्यवसायाची ठरणारी आधुनिक रूपरेखा यातून वृश्चिक व्यक्तींचे श्रेष्ठत्व सिद्ध होत राहणार आहे. अष्टमातील शुक्र काही प्रश्नपंचिक समस्या निर्माण करतो. रवी-केतू सहयोगातून आरोग्य आणि अधिकाराचे प्रश्न निर्माण होतात, परंतु यावर संयम-हुशारीने बाजी मारून पुढे सरकता येणार आहे. प्रवास होतील. शुभकार्ये ठरतील. जागेचा प्रश्न सुटेल. नवीन परिचय उपयुक्त ठरतील.
दिनांक : २ ते ६ शुभ काळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यशस्वी व्हाल. कार्यभाग साध्य होईल.

संधीचा लाभ उठवा
गुरूची कृपा, राहूचे सहकार्य, भाग्यात बुध, शनी आणि शत्रूंचा बंदोबस्त करणारा षष्ठातील मंगळ एवढय़ा अनुकूल शक्तीवर धनू व्यक्तींना अनेक क्षेत्रांत संधीचा लाभ उठवता येईल. त्यातून अर्थप्रश्नप्ती मजबूत होईल, संकल्प सिद्धीने नवे आधार सापडतील. महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावता येतील. शनिवारच्या बुध-शुक्र शुभयोगापर्यंत धनू व्यक्ती-कला-साहित्य-शिक्षण व्यापार यांत नवी आघाडी घेऊ शकतील. रवी-केतू सहयोगांत शत्रूपासून सावध राहावे लागते.
दिनांक : ३ ते ७ शुभ काळ.
महिलांना : राखी पौर्णिमा शुभ घटनांची ठरून दीर्घकाळ स्मरणात राहील.

प्रबलता उपयुक्त ठरेल
राशिस्थानी गुरू-राहू, पंचमात मंगळ यांच्यातून आपणास मिळणारी प्रबलता, अनिष्ट शनी, बुधाशी सामना करताना यशासाठी उपयुक्त ठरणार आहे. चुका आणि मस्ती यापासून मात्र शनिवारच्या बुध-शुक्र शुभयोगापासून दूर राहिलात तर कार्यचित्र आकर्षक करता येऊ शकेल. नारळी पौर्णिमा अभिनव उपक्रमास शुभ आहे. प्रवास होतील. संपर्क-चर्चा लाभ देतील. अर्थप्रश्नप्ती वाढेल, प्रपंच-शत्रुत्व-खरेदी-विक्री यासंबंधात सतर्क राहणे आवश्यक राहील.
दिनांक : ५ ते ८ शुभ काळ.
महिलांना : नारळी पौर्णिमेच्या आसपास प्रसन्न घटनांची संख्या वाढतच राहणार आहे. आनंदाचा काळ आहे.

निर्णय-कृतीत सावध राहा
व्ययस्थानी गुरू, राहूची तीव्र अनिष्टता, चतुर्थात मंगळ आणि रवी-केतू सहयोग संपेपर्यंत सुरूच राहणार असल्याने प्रत्येक निर्णय कृतीमध्ये सावध राहणे आवश्यक ठरणार आहे. शनिवारच्या बुध-शुक्र शुभयोगाच्या आसपास काही अनपेक्षित प्रकरणांना मार्ग सापडतील. सावधपणे केलेल्या कृती यश मिळवून प्रतिष्ठा सांभाळतील. नारळी पौर्णिमा धर्मकार्यातून आणि आप्त परिवारामधून आनंद देणारी आहे. कुंभ कलावंतांना प्रगतीच्या संधी सापडतील, प्रवास कराल.
दिनांक : ३, ४, ७, ८ शुभ काळ.
महिलांना : रागरंग पाहून शब्दांचा उपयोग करा, प्रयत्नांचा वेग वाढवा, यश मिळेल.

समन्वय साधता येईल
पराक्रमी मंगळ, चतुर्थात शुक्र, लाभात गुरू, राहू याच ग्रहांचे प्रतिसाद प्रयत्न-प्रगतीच्या समन्वयासाठी मीन व्यक्तींना लाभदायक ठरणार आहेत. नवा उत्साह, नवीन कल्पना, नवे संपर्क नारळी पौर्णिमेच्या आसपास अपूर्व यश देणारे ठरतील. षष्ठातील शनी शत्रू आणि आरोग्य यांच्यातून व्यत्यय निर्माण करू शकेल; परंतु निर्धार आणि कल्पकता बुध-शुक्र शुभयोगातून प्रभाव निर्माण करणारी सफलता देऊ शकतात. यात भक्तिमार्ग आधार देईल.
दिनांक : २ ते ६ शुभ काळ.
महिलांना : सामना यशस्वी ठरेल, प्रतिमा उजळेल. मन प्रसन्न राहील.