Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

रंगनृत्यशैलीचा प्रणेता
शास्त्रीय नृत्यशैलीनाटकाला काय देऊ शकते? आणि नाटक शास्त्रीय नृत्यशैलीला कशा प्रकारे समृद्ध करू शकते? याबद्दलच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या उद्देशाने आम्ही चेतन दातार, वैभव आरेकर आणि मी एकत्र आलो. मी आणि वैभव आरेकर नृत्याच्या क्षेत्रात जवळजवळ १५-१६ वर्षे एकत्र काम करीत होतो. नेहरू सेंटरच्या एका नाटय़ महोत्सवामध्ये आमची चेतनशी कोणीतरी ओळख करून दिली. पुढच्याच आठवडय़ात आमच्या ‘नाचू कीर्तनाचे रंगी’चा शिवाजी मंदिरात प्रयोग होता. मी चेतनला ‘वेळ असल्यास नक्की बघायला ये,’ असं म्हटलं. चेतन आला. नंतर पृथ्वी थिएटरमध्ये चेनतच्या ‘फॅमिली ड्रामा’ नाटकाचं नाटय़वाचन होणार होतं. (हेच नाटक पुढे ‘राधा वजा रानडे’ या नावाने रंगमंचावर आलं) ते नाटय़वाचन ऐकायला आम्ही गेलो होतो. त्याच्या वाचनातून नाटकातलं प्रत्येक पात्र माझ्या डोळ्यांसमोर जिवंत होत होतं.

‘पचौली’ची लागवड
आपण रोज निरनिराळी सौदर्यप्रसाधने वापरतो, त्यातील बहुतांशी उत्पादनांना एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. हा सुगंध पचौली ऑइलचा असतो. जगभरात बनविण्यात येणाऱ्या बहुतांश सौंदर्यप्रसाधनांमध्ये पचौली ऑइलचा वापर करण्यात येतो. यामुळे या तेलाला जगभरात मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. भारत, चीन, ब्राझील, मलेशिया आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये पचौली ऑइलचे उत्पादन करण्यात येत असून त्यात भारत अग्रेसर आहे. जगातील पचौली ऑइलच्या मागणीतील निम्मा हिस्सा भारताकडून पुरविला जातो. पचौली रोपाच्या वाळलेल्या पानांपासून पचौली ऑइल बनविण्यात येते. पचौलीचे वैज्ञानिक नाव ‘पोगोस्टेमॉन कॅब्लिन’ असे आहे. पण हे रोप पचौली या नावानेच रुढ आहे. इंडोनेशिया, मलेशियातील बेटांवर या रोपांची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जात असे. पण १९९६ च्या सुमारास येथील सारावाक प्रांतात रबराच्या झाडांच्या लागवडीवरून मोठा वाद झाला.

नेहरू सेंटरतर्फे नाटय़निर्मितीभिमुख कार्यशाळा
यंदाच्या जागतिक खगोल वर्षांनिमित्ताने नेहरू सेंटरतर्फे बटरेल्ट ब्रेख्तकृत ‘गॅलिलिओ’ या हिंदी नाटकाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यासाठी नाटय़निर्मितीभिमुख अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १६ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान रोज सायं. ६ ते रात्री ९ या वेळात होईल.१ ऑगस्टपासून या नाटकाच्या प्राथमिक तालमी दुपारी २ ते रात्री ९ या वेळात सुरू झाल्या आहेत. ३० सप्टेंबरला सायं. ६.३० वा. ‘गॅलिलिओ’चा प्रयोग नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये सादर होणार आहे. या नाटकाचं दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी शिवदास घोडके हे करणार असून, तेच या कार्यशाळेलाही मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा विनामूल्य आहे. या नाटकाच्या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी- संचालक, नेहरू सेंटर सांस्कृतिक विभाग, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- ४०००१८ यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

‘आधी बसा, मग हसा’
प्राची थिएटर्सतर्फे ‘वात्रट मेले’ या नाटकाच्या प्रचंड यशानंतर डॉ. विजय देशमुख लिखित-दिग्दर्शित ‘आधी बसा, मग हसा’ हे नवे विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. त्यात सुनील अष्टेकर व दिगंबर नाईक हे विनोदवीर एकत्र येत आहेत.

‘ज्ञानोबा माझा’साठी कलावंत हवेत..
श्री. द. (मामा) देशपांडे लिखित ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकात काम करण्याकरिता कलावंत हवे आहेत. श्री संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित या नाटकाची रंगावृत्ती नाटककार अशोक समेळ यांनी तयार केली असून, श्रीपाद सेवा मंडळ निर्मित व ऋग्वेद प्रकाशित या नाटकाचा शुभारंभ २८ सप्टेंबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार आहे. तेव्हा १० ते १४ वयोगटातील इच्छुक कलाकारांनी मोबाइल क्र. ९७७३५३७५७८ किंवा ९८६७७९९७३२ वर संपर्क साधावा.

‘तिसरी घंटा’

विराज थिएटर, मुंबईनिर्मित ‘तिसरी घंटा’ हे कय्युम काझी लिखित/ दिग्दर्शित नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. सिने-दिग्दर्शक संजय सावित्री मुहूर्ताला उपस्थित होते. त्यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या. नंतर कलाकार अजित भगत व सतीश तारे यांनी नाटकातील एक प्रवेश वाचून दाखविला. गत रंगभूमी व आधुनिक रंगभूमी यांच्यावर प्रकाश टाकणारं हे नाटक! १८ ऑगस्टला दुपारी ४ वा. दीनानाथ नाटय़गृहात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

अभिनय कार्यशाळा
कलाघर संस्था आयोजित वर्षभर चालणारी अभिनय कार्यशाळा दर रविवारी दुपारी ४ ते ७ या वेळेत अंधेरी येथे लिंक प्लाझा, ३ रा माळा, रूम नं. १०८, श्रीजी हॉटेलच्या वर, ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ तसेच दर शनिवारी दुपारी ३ ते ८ या वेळेत सहयोग मंदिर, राम-मारुती रोड, ठाणे येथे घेण्यात येणार आहे. वयोगट ४ ते १५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटामधील इच्छुकांनी रामनाथ थरवळ यांच्याशी ९८२१३३०९६३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.