Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

पुणे - साताऱ्यात साथ नियंत्रण कायदा लागू
राज्यात ‘स्वाइन फ्लू’ चे १५७ रुग्ण, पुण्यात सर्वाधिक
पुणे, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’ने देशातील पहिला बळी पुण्यातील शाळकरी मुलीचा गेल्याने राज्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांत ‘साथरोग नियंत्रण कायदा’ लागू करण्याचा निर्णय आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी जाहीर केला.

‘रिदा शेखचा मृत्यू निष्काळजीपणामुळेच’
‘आमची मुलगी तर आम्ही गमावली आहे. पण अन्य कुणालाही असा त्रास होऊ नये, यासाठी आम्ही जहांगीर, रुबी या रुग्णालयांना आता धडा शिकविणार आहोत..’’ असा निर्धार रिदाच्या काकी आयेशा शेख यांनी या वेळी व्यक्त केला. स्वाइन फ्लूने पुण्यातील सेंट अ‍ॅन्स शाळेतील नववीतील रिदा साजीद शेख हिला काल प्राण गमवावे लागले. त्या पाश्र्वभूमीवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

खासगी रुग्णालयांवर खटला - आझाद
नवी दिल्ली ४ ऑगस्ट/पीटीआय
उशिरा करण्यात आलेल्या निदानामुळे पुण्यात देशातील स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेला असे केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज सांगितले. आरोग्य मंत्रालय स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करील, असेही ते म्हणाले. काल पुण्यात रिदा शेख या चौदा वर्षांच्या मुलीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता, त्या मुलीला जेथे दाखल केले होते त्या खासगी रूग्णालयावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात येईल,

कृत्रिम पावसाचा प्रयोगही लांबणीवर
पाणीटंचाईचे संकट वाढले

मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट वाढण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या २३ जुलै रोजी मोडकसागर तलाव पूर्ण भरला होता. मात्र इतर तलावांत फारसा पाऊस झालेला नाही. आता मोडकसारगमधील साठाही कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गेटवे ऑफ इंडिया, झवेरी बाजार स्फोटप्रकरण
शिक्षा उद्या सुनावणार
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे २५ ऑगस्ट २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आग्रही मागणी आज अभियोग पक्षाच्या वतीने पोटा न्यायालयात करण्यात आली. दरम्यान, येत्या गुरुवारी म्हणजे ६ ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. एका दाम्पत्यासह तीन आरोपींना न्यायालयाने या बॉम्बस्फोटप्रकरणी गेल्या आठवडय़ात दोषी ठरविले होते. या स्फोटांप्रकरणी हनीफ सय्यद अनिस, त्याची पत्नी फहमिदा आणि अर्षद अन्सारी यांना पोटा न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

‘आरे’ ची ‘एनर्जी’ संपविण्याचे उद्योग!
संदीप आचार्य ,मुंबई, ४ ऑगस्ट

राज्याच्या पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘आरे सरिता’च्या दोन स्टॉल्सवर तब्बल १५ पीसीओ लावलेले दिसतील. या ठिकाणी तुम्हाला ‘आरे’चे एनर्जी अथवा अन्य दुग्धउत्पादने औषधालाही सापडणार नाहीत. असाच काहीसा प्रकार मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील ‘आरे’च्या अनेक स्टॉल्सवर दिसून येईल. ‘आरे’च्या उत्पादनाव्यतिरिक्त या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात चायनीज खाद्यपदार्थापासून पान-तंबाखुपर्यंतची विक्री होताना दिसते.

देशात दुष्काळ अटळ!
अभिजित घोरपडे ,पुणे, ४ ऑगस्ट

या पुढील काळात सामान्य पाऊस पडेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येत असला, तरी जुलैअखेपर्यंतच्या पावसाची स्थिती पाहता या वर्षी देशात दुष्काळ अटळ आहे. पावसाच्या शंभर वर्षांच्या इतिहासानुसार, जुलैअखेर पावसाचे प्रमाण सरासरीच्या १५-१६ टक्के कमी असेल. हंगाम संपेपर्यंत ही तूट भरून निघालेली नाही. या वर्षी आतापर्यंत पावसाची तूट तब्बल २१ टक्के इतकी जास्त आहे. त्यामुळे काही चमत्कार झाला तरच दुष्काळी स्थिती बदलून ती सामान्य होऊ शकेल, असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘विर्क यांची मुदतवाढ वा रॉय यांच्या नियुक्तीशी पवार यांचा संबंध नाही’
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
राज्याचे पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांना दिलेल्या मुदतवाढीविरोधात याचिका करणारे मुंबई पोलीस दलातील निरीक्षक सर्जेराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पािठबा असल्याचे पोलीस दलात बोलले जात असले तरी प्रत्यक्षात या याचिकेत अनामी रॉय यांना महासंचालकपदी नेमू नये, अशी विनंती न्यायालयाला केल्याचे दिसून येते. अशा वेळी रॉय यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील मंडळींनी शिंदे यांना याचिका दाखल करायला लावली, असे म्हणणे हास्यापद आहे.

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा
राम प्रधान समिती अहवाल न्यायालयापुढे ठेवण्याच्या आदेशास मनाई
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/पीटीआय

मुंबईवर गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीचा अहवाल न्यायालयापुढे सादर करावा, या मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशास आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.याच संदर्भात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखांनी ६ ऑगस्टपूर्वी स्वत: न्यायालयात हजर राहावे. तसेच एटीएसला बुलेटप्रूफ जाकिटे व अन्य उपकरणे पुरेशा प्रमाणात पुरविण्यात आली होती की नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर करावे या आदेशांही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या उपरोल्लेखित आदेशास स्थगिती द्यावी, अशी याचिका महाराष्ट्र सरकारतर्फे गेल्या २३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. आज सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या आदेशाला स्थगिती दिली.

 

प्रत्येक शुक्रवारी