Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

रक्षाबंधन विशेष
ऋजुता देशमुख

मी आणि माझा भाऊ चैतन्य- आम्हा दोघांमध्ये एक अनोखं नातं आहे. आम्हा दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर; त्यामुळे आमच्यात फारशी भांडणं झाली नाहीत. कारण तो नेहमीच वडीलकीच्या नात्याने माझ्याशी वागत असे. अर्थात कधी कधी छोटी-छोटी भांडणं झाली, पण हमरीतुमरी करण्याइतपत वेळ आली नाही. आमच्या नात्यातली घट्ट वीण बांधली गेलीय ती लहानपणापासूनच. बालकलाकार म्हणून मी तीन मराठी चित्रपटांमध्ये कामं केली.

‘गोविंदा’चे ‘धम्मक लाडू’
सिद्धार्थ जाधव

गोविंदा म्हणजे मौज, मजा आणि धम्माल.. यामुळेच लहानपणीपासून गोविंदा मला आवडतो. गोपाळकाल्याशी निगडीत अनेक आठवणी मी जपल्या आहेत. शिवडीच्या झोपडपट्टीत माझं बालपण गेलं. मंडळाचा स्टॅम्प असलेली सॅण्डो बनियन घालून मिरविण्याचा आनंद वेगळाच असायचा. पण बनियन खरेदी करण्यासाठी पैसे हवे असायचे. मग त्यासाठी घरातच डल्ला मारावा लागायचा आणि हौजी खेळून साठवलेले पैसेही दिमतीला असायचे.

प्रायोजकच नसल्याने गोविंदा अडचणीत!
मंदीच्या फेऱ्यामुळे अनेकांचा आखडता हात

प्रसाद रावकर

गोपाळकाल्याचा उत्सव नऊ दिवसांवर येऊन ठेपला असला तरी अद्याप मुंबईमध्ये दहीकाल्याचा ज्वर चढलेला नाही. गिरगाव, लालबाग, परळ, वरळी, दादर इत्यादी परिसरांतील गोविंदा पथके रात्र जागवून मानवी मनोरे रचण्याचा सराव जोमाने करीत असली तरी दहीहंडी उत्सवाला लाभणारे पुरस्कर्ते मात्र यंदा मूग गिळून गप्प बसले आहेत. गोविंदा पथकांना सढळहस्ते मदत करणाऱ्या बडय़ा कंपन्या आर्थिक मंदीमुळे अडचणीत आल्या आहेत, तर गोविंदा पथकांच्या खर्चात खारीचा वाटा उचलणाऱ्यांनीही हात आखडता घेतला आहे.

नितीन देसाई साकारणार कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती
प्रतिनिधी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाला अर्पण करण्यात येणाऱ्या दागिन्यांचा लिलाव केला जातो, त्यावेळी गणेशमूर्तीचा स्पर्श असलेला दागिना आपल्या घरी असावा म्हणून तो घेण्यासाठी भाविकांची चढाओढ लागते. पण प्रत्यक्ष मूर्तीच्या घडणावळीत घरातील साहित्याचा समावेश असेल तर? ..‘बिग एफएम’ रेडियो वाहिनी आणि अनिरुद्ध उपासना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमात कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती तयार करण्यात येणार असून गणेशमूर्तीसाठी लागणारा कागद भाविकांच्या घरातून जमा करण्यात येणार आहे.

तक्रार थोडक्यात आणि नेमक्या शब्दांत मांडा
मुंबईकरांच्या दैनंदिनीतील असंख्य अडचणींना वाचा फोडण्यासाठी अद्ययावत तक्रार निवारण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. 1916 या दूरध्वनी क्रमांकावर केवळ एक फोन करून आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा मुंबईकरांना अक्षरश ‘बारा महिने तेरा काळ’ उपलब्ध आहे. परंतु, या यंत्रणेबाबत प्रचार आणि प्रसार झाला; तर महापालिकेची अकार्यक्षमता आणि कारभारातील त्रुटी उघड होतील, या भीतीपोटीच की काय या यंत्रणेला पालिकेने प्रसिद्धी दिलेली नाही. पालिकेच्या कारभारात ‘पारदर्शकता’ आणण्यासाठी ‘रामबाण’ ठरू शकेल अशा या यंत्रणेचे महत्त्व सुधीर बावकर यांनी ओळखले.

सीमेवरील ‘रक्षा’बंधन..
१५ आणि १६ ऑगस्ट २००८ एकत्र साजरा करण्यासाठी आम्ही लेह- लडाखला निघालो. आदल्या दिवशी टी. व्ही.वर तापलेले श्रीनगर सारखे दाखवत होते, पण आमचा निश्चय कायम होता. हा दुग्धशर्करायोग आम्हाला सोडायचा नव्हता. आम्ही १० ऑगस्टला सकाळच्या विमानाने निघालो. कारगील, लेहचा परिसर निरनिराळ्या रंगांच्या डोंगरांनी भरलेला प्रवास. डोळ्यांचे पारणे फिटले. १५ ऑगस्टला आम्ही पहिल्या रांगेतले पाहुणे होतो.

मल्हारच्या वर्कफोर्सनी केले वृक्षारोपण!
प्रतिनिधी

‘मल्हार’ हा फेस्टिवल फक्त गंमतीसाठी किंवा फक्त मौज-मजा करण्यासाठी नसून विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून दरवर्षी किमान एक उपक्रम राबवला जातो. या वर्षी ‘मल्हार’मध्ये तीन सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी दोन उपक्रम वर्कफोर्सच्या पुढाकाराने राबविण्यात आले. यावर्षी ‘मल्हार’च्या इतिहासात प्रथमच वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.

शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देखणा सोहळा
प्रतिनिधी

तमाशा लावणी, पोवाडे, शाहिरी यासारखे लोकनाटय़ प्रकार. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते ५३ वर्षांपूर्वीच्या संयुक्त महाराष्ट्र लढय़ात समाजप्रबोधनाचे, लोकांना एकत्र आणण्याचे काम या लोककला प्रकारांनी केले आणि आजतागायत ते होत आहे.

पर्यावरणस्नेही उपक्रमांचे दशक
विकासाच्या प्रक्रियेत बहुतेक ठिकाणी प्रगती आणि पर्यावरण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. याबाबतीत दोन्ही बाजूंकडून अभिव्यक्त होणारी टोकाची भूमिका टाळूनही रचनात्मक काम करता येते, हे ठाणे शहरात पर्यावरण दक्षता मंच या संस्थेने दाखवून दिले आहे. गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीत विविध निसर्गस्नेही उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेत प्रगतीला पर्यावरणीय चेहरा देण्याचा प्रयत्न या संस्थेने केला.

अस्मिता संस्थेची विशेष राखी कार्डे
प्रतिनिधी

जोगेश्वरी (पूर्व) येथील अस्मिता संस्थेच्या जमनाधर अग्रवाल शाळेतर्फे दरवर्षी रक्षाबंधन सामाजिकतेचे भान ठेवून साजरे केले जाते. शाळा स्वत:चे राखी शुभेच्छा कार्ड तयार करते. यामध्ये प्रचलित विषयांवर उद्बोधन केले जाते. शाळेच्या परिसरातील हजारो नागरिकांपर्यंत पोहोचून या राख्या बांधल्या जातात. यंदा राज्याच्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून अस्मिताने ‘महाराष्ट्र खडम्गहस्त भारतभूचा’ हा गौरव सुवर्णमहोत्सवाचा’ या संकल्पनेवर राखीचे शुभेच्छा कार्ड तयार केले आहे.