Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

लक्ष्मण नारखेडे, विलास डांगरे, गिरीश गांधी जीवनसाधना पुरस्कारान सन्मानित
नागपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सदैव दुसऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर राहणारे सेवाव्रती लक्ष्मण मारुती नारखेडे, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. विलास डांगरे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित केले. विद्यापीठाच्या ८६ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम गुरुनानक भवन येथे आयोजित करण्यात आला. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते पुष्पहार, श्रीफळ, मानचिन्ह, मानपत्र, ग्रामगीता देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले.

विद्वेष बाजूला सारण्याचा लक्ष्मण नारखेडेंचा सल्ला
नागपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

समाजात पसरलेला विद्वेष बाजूला सारून देशाला पुढे नेण्यास प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक व तुकडोजी महाराजांचे निस्सीम भक्त लक्ष्मण मारुती नारखेडे यांनी कार्यक्रमात केले.

विघ्नहर्त्यांवरही संकट
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

संकटे, अडचणी आल्या की हमखास आठवण होते ती गणपतीबाप्पांची. सुखकर्ता, दु:खहर्ता अशी ख्याती असलेले बाप्पादेखील या वर्षी महागाईच्या संकटात सापडलेले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस, माती, तणस, लाकूड, रंग, नारळ, काथ्या व अन्य वस्तूंचे भाव कडाडल्याने या वर्षीचा गणेश उत्सव जनसामान्यांना महागलेल्या गणेशमूर्ती घेऊनच साजरा करावा लागणार आहे.

विमानतळ हस्तांतरणाचा मुहूर्त पुन्हा टळला
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या आश्वासनानंतर विमानतळ हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असली तरी अद्याप त्यास मुहूर्त मिळालेला नाही. विमानतळ प्रश्नधिकरणाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिलेल्या यादीनुसार तपासणी केल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसात हस्तांतरणाचा मुहूर्त निघेल. गेल्या अनेक वर्षापासून विमानतळ हस्तांतरणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्री सुरू आहे.

काळानुरूप बदलले रक्षाबंधनाचे संदर्भ
राम भाकरे, नागपूर, ४ ऑगस्ट

कुटुंबसंस्था प्रमाण मानणाऱ्या आपल्या समाजात नात्यागोत्याचं महत्त्व खूपच आहे. ही नाती कशी बनत गेली, यातून मार्ग काढणे कठीण आहे. पण आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग त्यांनी व्यापलेला आहे, हे मात्र खरे. प्रत्येक नात्याला जोडून येणाऱ्या भावना वेगळय़ा, जबाबदाऱ्या वेगळय़ा, हेही अगदी ठरूनच गेल्यासारखे आहे. परंपरांनी पक्क्या केलेल्या या नात्यांपैकी एक नाते बहीण- भावाचेही आहे.

‘ये शाम मस्तानी’
आर.डी. बर्मन आणि किशोरकुमार-एक स्मरण
डॉ. सुलभा पंडित
‘सुर-संगम’ संस्थेचे नाव संगीत वर्तुळात आता चांगलेच स्थिरावले आहे. सचिन- सुरभी ढोमणे आणि त्यांचे सहकारी गायक वादक कलावंत, यांच्या कार्यक्रमाचा दर्जा आणि सांगीतिक गुणवत्ता वादातीत आहे. त्यामुळे त्यांचा कोणताही कार्यक्रम असला तरी तो श्रवणीयच असणार याची हमी श्रोत्यांना असते. ‘ये शाम मस्तानी’ हा कार्यक्रमही याच परंपरेत बसणारा होता.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी
संप सत्र सुरूच; उद्यापासून बँक कर्मचाऱ्यांचा संप
नागपूर , ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

असंघटित शेतकरी, कामगार वर्ग एकीक डे महागाई आणि नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असतानाच संघटित शक्तीच्या जोरावर हवे ते पदरीपाडून घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे अस्त्र उपसले आहे. निवासी डॉक्टर, वीज कर्मचारी, सरकारी डॉक्टर, प्रश्नध्यापक, राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता गुरुवार, सहा ऑगस्टपासून बँक कर्मचारी संपावर जात आहेत.

माहिती अधिकार कायद्याची जरब वाढली
कागदपत्रे भ्रष्टाचाराच्या पुराव्यासाठी ग्राह्य़ धरणार
नागपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

एखाद्या गैरव्यवहार प्रकरणात माहिती अधिकाराखाली मिळवलेली माहिती आता अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पुरावे म्हणून ग्राह्य़ धरण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक वेळेत न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनाही कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकताच यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे माहिती अधिकार कायद्याची जरब वाढणार आहे.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य सेनेची मोहीम
महागाईच्या तुलनेत दारिद्रय़ रेषेची मर्यादा अत्यल्प
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
महागाईच्या तुलनेत दारिद्रय़ रेषेखालील कष्टक ऱ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा फारच कमी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दारिद्रय़ रेषेची व्याख्या बदलणे, महागाई नियंत्रणात आणणे आणि कार्यक्षम रेशनिंग व्यवस्था उभारण्यास सरकारला भाग पाडणे यासाठी आरोग्य सेनेने देशव्यापी मोहीम सुरू केली असल्याची माहिती आरोग्य सेनेचे प्रमुख अभिजित वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागमंदिरात महाप्रसादाचे वाटप
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

इतवारी वॉर्ड क्रमांक ६३ येथील नागमंदिरात नागपंचमीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमात किशोर पराते, नगरसेवक विकास खोब्रागडे, राजू पंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अरविंद सावरकर, विवेक महाजन, आशीष सावरकर, आनंद केळवदकर, रवींद्र घुमडे,सचिन भरघडे, दिनेश देशमुख यांनी कार्यक्रम आयोजित केला.

जिव्हेश्वर जन्मोत्सव; आज रथयात्रेचे आयोजन
नागपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

स्वकुळ साळी समाजातर्फे आद्यदैवत वेदमूर्ती, वस्त्रनिर्मितीचे जनक भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव उद्या, बुधवारी माता अनसूया सभागृह, नंदनवन येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता रथयात्रा काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष सुभाष बेलेकर (इचलकरंजी), बाळासाहेब कांबळे (अहमदनगर), संस्थेचे अखिल भारतीय सचिव मोहन एकबोटे (हुबळी), जिव्हेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर बारगजे (पुणे) आणि दिनकरराव कांबळे (ठाणे) उपस्थित राहतील. कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी हजर रहावे, असे आवाहन स्वकुळ साळी समाज नागपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व मोरोणे गुणवत्ता यादीत १९ वा
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

महापालिकेच्या धरमपेठ झोनचे सहआयुक्त महेश मोरोणे यांचा मुलगा व सोमलवार निकालासचा विद्यार्थी महेश मोरोणे हा महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत १८ वा आला आहे. अ‍ॅबॅकस एज्यूकेशनल फाऊंडेशन पुणेतर्फे घेण्यात आलेल्या गणिताच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही अथर्व राज्यातून २९ वा आला आहे.

मेयोतील कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी उपोषणावर बसलेल्या मेयो इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे आदोलन सोमवारी मागे घेतले. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेने (इंटक) त्यांच्या मागण्यासाठी उपोषण सुरू केले होते. मुंबईत गृहराज्य मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत संघटनेचे पदाधिकारी त्रिशरण सहारे यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने उपोषण मागे घेण्यात आल्याचे सहारे यांनी कळविले आहे. कर्मचाऱ्यांना १२ वर्षाची कालबद्ध पदोन्नती त्वरित देण्याचे निर्देश राऊत यांनी संबंधितांना दिले.

तिरपुडे इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफीमध्ये प्रवेश सुरू
नागपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

युगांतर शिक्षण संस्थेतर्फे संचालित तिरपुडे इंस्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफीमध्ये प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दहावी, बारावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. अधिक माहिती करिता महाविद्यालयाशी संपर्क साधावा (दुरध्वनी क्रमांक ९४२२१२७४९७) असे आवाहन संस्थेने केले आहे.

नगरसेवकांसाठी ‘सवरेत्कृष्ट वक्ता’ पुरस्कार
नागपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

कलारंजन बहुउद्देशीय संस्थेतर्फे नगरसेवकांसाठी ‘सवरेत्कृष्ट वक्ता’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी एका नगरसेवकाला हा पुरस्कार देण्यात येईल, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. दहा वर्षे नगरसेवक राहीलेल्यांचाच या पुरस्कारासाठी विचार होणार आहे. पात्र नगरसेवकांनी सभागृहात केलेल्या भाषणाचे उतारे कलारंजन बहुउद्देशीय संस्था, गुप्ता टॉवर, हनुमान गल्ली येथे १० ऑगस्टपर्यंत पाठवावे, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने कमला मोहता सन्मानित
नागपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने नागपूर शहर काँग्रेस समितीच्या सचिव कमला मोहता यांना सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मोहता यांना जगजीवनराम कला संस्कृती व साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. एन.एस. खोबा यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दत्ता मेघे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

नगर युवक शिक्षण संस्थेच्या दत्ता मेघे तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) या वर्षीपासून दत्ता मेघे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मान्यता राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेने (एनसीव्हीटी) दिली आहे. नागपूर जिल्ह्य़ातील प्रथमच तंत्रनिकेतनमध्ये औद्योगिक केंद्र सुरू झाले आहे. या औद्योगिक केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रश्नेग्रॅम असिस्टंट (कोपा), मेकॅनिक कॉम्प्युटर हार्डवेअर, आय.टी. अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटनन्स अ‍ॅण्ड आर्किटेक्चर असिस्टंट हे चार विषय शिकवले जाणार आहेत. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाचे शुल्क शासनाने निश्चित केल्याप्रमाणे राहील. सदर अभ्यासक्रम रोजगारभिमुख असून औद्योगिक क्षेत्रातील लोकांना या तांत्रिक व्यवसायाची आवश्यकता आहे. भविष्यात मिहान प्रकल्पामध्ये या लोकांना फार मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ज्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे. प्रवेशाकरता दत्ता मेघे तंत्रनिकेतन, वानाडोंगरी येथे पी.पी. कोंबे यांच्याही संपर्क साधता येईल.

वाठोडा परिसरात ४० वीज ग्राहकांना मीटर
नागपूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या नंदनवन उपविभागातर्फे वाठोडा परिसरातील ४० वीज ग्राहकांना प्रश्नदेशिक कार्यकारी संचालक अनिल खापर्डे यांच्या हस्ते वीजजोडण्या देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्य अभियंता डी.एस. तलवारे, अधीक्षक अभियंता एम.एस. केळे, ग्राहक तक्रार मंचच्या सदस्य गौरी चांद्रायण, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दोनोलीकर हे प्रश्नमुख्याने उपस्थित होते. हुक टाकून वीज वापर केल्यास चोरीचा गुन्हा दाखल होऊन मोठय़ा प्रमाणावर दंड आकारण्यात येतो. हे टाळण्यासाठी अधिकृत वीजजोडणी घेऊन सन्मानाने वीज ग्राहक व्हा, असे आवाहन अनिल खापर्डे यांनी यावेळी केले. शहरातील कोणत्याही परिसरात ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन डी.एस. तलवारे यांनी दिले. प्रश्नस्ताविक उप कार्यकारी अभियंता अनिलकुमार श्रीवास्तव यांनी केले तर संचालन बबलू गाडवे यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता अरविंद भादीकर, डी.बी. अंबादे, चंद्रकांत देशमुख, डी.ए. हिवरकर, दीपाली माडेलवार, आर.आर. मेश्राम आणि वीज ग्राहक उपस्थित होते.

चांप्यात कारगिल शहिदांना आदरांजली
नागपूर,४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

उमरेड मार्गावरील चांपा येथे डॉ. विठ्ठल खोब्रागडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कारगिलमधील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. विठ्ठल खोब्रागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समाजसेवक रमेश नांदे यांनी कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन योगेंद्र, कॅप्टन मनोजकुमार पांडे, कॅप्टन संजयकुमार, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन विजयंत थापर यांच्या शौर्याबाबत माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे यांनी विजयदिनाप्रित्यर्थ महाविद्यालयात ‘रोजगारभिमुख प्रकल्प’ राबवण्यात येणार असून ७ ऑक्टोबरपासून या प्रकल्पांतर्गत सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले. संचालन नितीन भागवत यांनी केले. सुरेश मोहरकर यांनी आभार मानले. प्रणिता मानापुरे, जयश्री टुले, डॉ. प्रज्ञा खंडाईत, अशोक वनमाळी, धर्मराज रोकडे, डॉ. कमलाकर राडे, अनिल गभने आणि अनिल ढोबळे उपस्थित होते.