Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

गाजराची पुंगी..
चांगल्या पायाभूत सुविधा ही सगळ्याच देशांची आणि तीही सार्वकालीक स्वरूपाची अशी गरज असते. आणि म्हणूनच हे क्षेत्र म्हणजे गुंतवणुकीची सदाहरीत संधी अशा अर्थाने मार्केट मेकर असते. आजकालच्या मंदीच्या अर्थकारणात तर अशा बाबींवर भर देण्यामागे अतिशय प्रबळ असे राजकीय आणि सामाजिक उपयुक्ततेचे गणित असते. या गणिताकडे कानाडोळा करूनही (आणि न करूनही) त्याचे आर्थिक महत्त्व अढळ, अटळ, अबाधित असते ही तर गंमतीचीच बाब आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार अशांसारखे सामाजिक संरचना (सोशल इन्फ्रास्ट्रक्चर), रस्ते, बंदरे, विमानतळ, दळणवळणाची साधने अशी भौतिक स्वरूपाची पायाभूत संरचना (फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर), बँका, विमाकंपन्या, भांडवल आणि वस्तुविनिमय बाजार अशांसारखी वित्तीय संरचना (फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर) अशांचाही आजकाल त्यात समावेश करावा लागतो.

गटबाजी रोखली तरच काँग्रेसची शक्यता
मतदारसंघाच्या फेरबदलानंतर विधानसभेची होणारी पहिली निवडणूक प्रस्थापितांना धक्के देणारी ठरेल, असे चित्र या जिल्हय़ात नाही. पुर्नरचनेत चंद्रपूर जिल्हय़ातील सहा पैकी एकही मतदार संघ कमी झाला नसला तरी सावलीचे बल्लारपूर म्हणून झालेले नामकरण व चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने यंदा प्रस्थापितांना बराच घाम गाळावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाडापाडीच्या राजकारणाचा खेळ बराच गाजला.

शिवसेनेचा पुसदवर डोळा
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहाच्या सहा जागा आम्ही पटकवू, असा विश्वास शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, अशा चारही पक्षांच्या नेत्यांना आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, पुसद, दारव्हा-दिग्रस, राळेगाव हे यवतमाळ जिल्ह्य़ातील चार आणि वाशीम व कारंजा हे वाशीम जिल्ह्य़ातील दोन, असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. राळेगाव हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी तर, वाशीम अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

‘काय रे बाबल्या? लगीनाक गेल्लय की नाय?’
‘कोणाचा लगीन, हो तात्यानुं?’
‘सध्या फक्त एकाच लगीनाची चर्चा देशभर चलल्लीसा. ती म्हणजे राखी सावंतच्या लगीनाची’
‘मीया नव्हतय लगीनाक जावक. मीया गेलल्लयं स्वयंवराक’
‘ताच रे, लगीन आणि स्वयंवरात काय फरक नाय’
‘तसा नाय तात्यानू, स्वयंवर आणि लगीनात फरक आसा. स्वयंवर झाल्यानी म्हणान लगीन जातलाच असा समजू नकात.’
‘असा कसा. एवढय़ा देशाच्या साक्षीन आता स्वयंवर झालासा. आता लगीन जावचाच नाय असा कसा म्हणतात तुमी?’
‘मीया परत-परत सांगतसय. स्वयंवर आणि लगीनात बराच अंतर असता. तुमका मागच्या पिढीतल्या लोकांक या अंतर किती मोठा आसा ता समजाचा नाय.’
‘स्वयंवरात राखीन निवड केलल्ललो नवरो हो कॅनडाचो आसा. उद्या राखी कॅनडाक जावन थय रवन पाहुणचार घेवन येत. पण त्येच्याशी लगीन करीत असा नाय. कदाचीत आज तो पसंत पडलो म्हणान सा म्हयन्यांन तीच पसंती कायम रवात असा ना.’
‘अरे, मी कितकी लग्ना बघली. चार्ल्स-डायनाचा लगीन टी.वी.र बघला. रामायण सिरियलमधला शीतेचा स्वयंवर बघल्यानी. अगदी त्याच धर्तीर या आधुनिक शीतेचा म्हणजे आमच्या मराठमोठय़ा राखी सावंतचा स्वयंवर झाला. अरे, गेल्या कित्येक वर्षांत असो टी.वी.र शो जावक नाय. स्वयंवराच्या शेवटच्या दिवशी तर रस्ते ओस पडलल्ले. जे कोण कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलले ते सगळे नऊच्या आत घरात परतल्यांनी आणि टीवी पुढे बसले. बघल्यातना राखीची लोकप्रियता.’
‘प्रश्न राखीच्या लोकप्रियतेचो नाय आसा. लोकांक काय तरी नवीन नवीन बघूची इच्छा आसा. त्यात राखीचा स्वयंवर हो पहिलोच प्रयोग. त्यामुळे तेका चांगल्याच संख्येन प्रेक्षक गावलो.’
‘टीवीचो प्रेक्षक रोजच्यो त्योच-त्योच सिरियल बघान पकलेसत. त्यांका राखीन एक चांगलो नवीन शो दिलो या खराच आसा. पण येचो अर्थ असो अजाबात नाय की राखीन त्याच मुलाशी लगीन करुचा.’
‘असा कसा, मग लोकांचो टीवीवरचो इश्वासच उडून जायत.’
‘अरे बाबा, लोकांचो टीवीवर विश्वास आसाच खय. लोक त्या कार्यक्रमांकडे एक मनोरंजन म्हणान बघतत. त्यामुळे राखीचा या स्वयंवर म्हणजे एक शोच होतो.’
‘काय बाबा, तुमच्या या नवीन पिढीची इचार करण्याची काय दृष्टीच येगळी आसा.’
‘म्हणान तर मीया म्हणतय राखीचा स्वयंवर आणि लगीन यात जमीन आसमान एवढा अंतर आसा.’
‘म्हणजे तुका काय म्हणाचा आसा उद्या याच नवऱ्याबरोबर राखी काय लगीन करुची नाय काय?’
‘नाय म्हणजे त्याच नवऱ्यावांगडा राखी लगीन करीत याची खात्री आपण दिव शकणोव नाय. आणि खात्री तरी कित्याक दिवची. टीवीचो शो जो झालो तो काय वास्तवातला नव्हतो. तो एक शोच होतो. त्येचेत जो नवरो ठरलो तो काय कायमचोच असात म्हणान सांगूक येवचा नाय. आणि प्रेक्षकान तरी तसो आग्रह धरु नये. त्यांची गेलो म्हयनाभर करमणूक झाली मॉ, बस तर त्याशिवाय पुढे तुमी आणखी काय अपेक्षा धरु नये.’
‘असा कया म्हणतस रे बाबल्या. मग राखीच्या लगीनाचा काय?’
‘राखीच्या लगीनाचा काय म्हणजे काय? आता पुढच्या वर्षांपर्यंत पुना वाट बघा.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे काय? यंदाचो नवरो पसंत पडूक नाय, म्हणान राखीच्या स्वयंवराचो दुसरो भाग पुढच्या वर्षी..’
‘म्हणजे, ‘राखीका स्वयंवर भाग दोन’ की काय?’
‘मग त्यात काय नवल? हो शो पूर्णपणे बदलून पुना पुढच्या वर्षांक येयत. ‘कौन बनेगा करोडपती दोन’ कसो आयल्लो तसोच राखीच्या स्वयंवराचो शो येतलो बघ.’
‘असा कसा जायत?’ असा बडबडत बाबल्या डोक्या खाजवीत गर्दीतसून निघान गेलो..
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com