Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

‘स्वाइन फ्लू’वर लवकरच प्रतिबंधक लस
पुणे, ४ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

येथील सिरम इन्स्टिटय़ूटसह देशातील चार संस्थांमध्ये ‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधक लस तयार करण्याचे काम सुरू झाले असून येत्या पाच-सहा महिन्यांत अशी लस उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. ए. सी. मिश्रा यांनी आज व्यक्त केला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी निदर्शनास आलेल्या ‘स्वाइन फ्लू - एच १ एन १’ या संसर्गजन्य विषाणूमुळे काल एका शाळकरी मुलीचे निधन झाले.

रुग्णालयाकडून महापालिका अहवाल मागवणार
पुणे, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ झालेल्या रुग्ण मुलीची माहिती महापालिकेला न देता तिच्यावर परस्पर उपचार सुरू ठेवल्याबद्दल जहांगीर रुग्णालयावर तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावा, तसेच कठोर कारवाई करा, असा आदेश स्थायी समितीने आज आरोग्य प्रमुखांना दिला. मात्र, कारणे दाखवा नोटीस न बजावता रुग्णालयाला फक्त पत्र देऊन महापालिकेने त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे.‘स्वाइन फ्लू’मुळे शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

‘उपचार, निदानही उशिराच झाल्याने मुलीचा मृत्यू’
पुणे, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

जहांगीर रु ग्णालयातील डॉक्टरांना रिदा शेख या मुलीच्या आजाराचे निदान हे वेळीच झाले नसल्याने औषधोपचार सुध्दा उशिराच झाल्याचे सांगून त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे आज आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी स्पष्ट केले. सध्या ‘स्वाइन फ्लू’ नियंत्रण करणे हेच धोरण आहे. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचा यथावकाश समाचार घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

चूक नसल्याचा ‘रुबी’चा दावा
पुणे, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

जहांगीर रुग्णालयाने आम्हाला चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्यात ‘एच१एन१’ची चाचणी केली नसल्याचे स्पष्ट करीत आमची चूक नाहीच, अशीच भूमिका रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. परवेज ग्रँट यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

पालिकेला ‘त्या’ रुग्णाची माहिती दिल्याचा ‘जहांगीर’चा दावा

तीन रुग्णांची भर, पुण्यात सर्वाधिक १०७ रुग्ण

आंदोलनकर्त्यां प्रश्नध्यापकांना कुलगुरूंचे आवाहन

जब्बालला ताब्यात घेण्यास वसमतचे पथक दाखल

चंदू बोर्डे यांचा ख्राईस्ट चर्चतर्फे सत्कार

सध्या तरी राजकारणाचा विचार नाही- नितेश राणे

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

‘एटीकेटी’च्या केंद्रीय प्रवेशाला गुरुवारपासून प्रश्नरंभ

सासऱ्याने केला सुनेचा गोळ्या घालून खून

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ‘समर्थ महाराष्ट्र अभियान’

प्रश्नधिकरणातील अनधिकृत बांधकामे दंडात्मक आकारणी करून नियमित करण्याचा निर्णय

वार करून लुटणाऱ्या तिघांना अटक

‘आयटी’तील चंगळवादाने गुन्हेगारीत वाढ

बॉश व ब्रेम्बोतील कामगारांचा शुक्रवारी मोर्चा

प्रश्नधिकरणातील शेतक ऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली

जग प्रकाशकांचे
कवयित्री, लेखिका, गीतकार आणि कथाकथनही!

बार्शीसारख्या छोटय़ा गावात राहणाऱ्या एका मुलीची वयाच्या अकराव्या वर्षी ३२ कडव्यांची कविता पुण्यातील ख्यातनाम वृत्तपत्रात प्रसिद्ध होते. हीच मुलगी पुढे लेखिका व प्रकाशिकाही होते. अनेक अडचणी, समस्या पार करीत स्वत:चे उत्तम कार्यालय, चारचाकी गाडी असे भौतिक यश मिळवतेच; पण तीसपेक्षा जास्त पुस्तकांचे लेखनही पूर्ण करते. हे सारे साध्य करणाऱ्या प्रकाशिका म्हणजे डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, अर्थातच ‘नीहारा’ प्रकाशनाच्या सर्वेसर्वा. वडिलांचे निधन लवकर झाल्यामुळे स्नेहसुधाताईंचे बालपण अत्यंत खडतर असेच गेले. पण त्या काळातही शिक्षण आणि कविता करणे सुरूच होते. दैवाने त्यांना मिळालेली प्रतिभा त्यांनी वाचनाने व योग्य ते प्रयत्न करून फुलवली. स्नेहसुधाताईंचे साहित्यावरचे प्रेम विलक्षण असे आहे.

नव्या जाणिवांचे रोपण
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन नुकतेच नगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पार पडले. अनेक दृष्टीने वेगळेपण जपलेल्या या संमेलनाविषयी..
शब्दगंध साहित्य संमेलन ही नगरची नवी ओळख बनली आहे. नगरच्या मातीचा गंध आणि इथल्या संस्कृतीचा स्पर्श असलेला हा उत्सव राज्यभरातील साहित्यिकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे. यंदाचे सातवे संमेलन प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठय़ा दिमाखात पार पडले. अन्य संमेलनात होणारे वाद, संमेलनाध्यक्ष निवडताना होणाऱ्या कुरघोडय़ा यांना फाटा देऊन झालेले हे संमेलन अनेक दृष्टीने वेगळे ठरले.

----------------------------------------------------------------------------

उसन्या पैशाच्या वादावरुन मजुराचा खून
पुणे, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून मजुराचा खून केल्याच्या आरोपावरून येरवडा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. जीवनज्योत रुग्णालयाच्या मागील बाजूस नाल्याजवळ शुक्रवारी (दि. ३१ जुलै) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. गुलजार मोहम्मद कुददुस (वय ३५, रा. येरवडा) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. त्याचा खून केल्याच्या आरोपावरून दिनेशकुमार नागू शर्मा (वय २४, रा. नगर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शेख (वय ३०, रा. येरवडा) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुददुस याने शर्मा याच्याकडून पैसे उसने घेतले होते. हे पैसे परत करीत नसल्याचा राग मनात धरून शर्मा याने कुददुस याचा खून केला.

‘मिळून साऱ्याजणी’च्या कार्यक्रमास मल्लिका साराभाईंचा नृत्यप्रयोग होणार
पुणे, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘मिळून साऱ्याजणी’चा २० वा वाढदिवस येत्या ७ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्त्यां मल्लिका साराभाई ‘सितास् डॉटर’ हा नृत्यप्रयोग सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका १ऑगस्टपासून देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळात मिळतील. तसेच, सात ऑगस्ट रोजी दिवसभर प्रवेशिका मिळणार असून, सायंकाळी ५.३० मिनिटांनी कार्यक्रम सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर राजलक्ष्मी भोसले आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम पत्रकार आणि लेखिका मृणाल पांडे उपस्थित राहणार आहेत.

आंत्रप्रिनर्स क्लबच्या अध्यक्षपदी महेश गजेंद्रगडकर
पुणे, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

आंत्रप्रिनर्स क्लब पुणे फर्स्टच्या अध्यक्षपदी मार्ग रिलेशन्स संस्थेचे प्रमुख महेश गजेंद्रगडकर यांची निवड झाली आहे. उद्योजकता संस्कृती विकसित करणे, उद्योजकांमध्ये समन्वय वाढवणे, अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी आंत्रप्रिनर्स क्लब गेली १६ वर्षे कार्यरत आहे. सन २००९-१० या वर्षासाठी निवड झालेल्या क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये विवेक मेढेकर (उपाध्यक्ष), अमोल जाधव (सेक्रेटरी), सुनील थोरात (खजिनदार), श्रीरंग गोखले (कार्यक्रम संयोजक), सचिन इनामदार, किशोर काळे (कार्यक्रम सहसमन्वयक) यांचा समावेश आहे.

सिद्धेश्वराच्या दर्शनाला गर्दी
आळंदी, ४ ऑगस्ट/वार्ताहर

ज्ञानेश्वरमहाराज मंदिरातील पुरातन सिद्धेश्वरासह इंद्रायणी नदीकाठच्या वैतागेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनास भाविकांनी गर्दी केली. ज्ञानेश्वरमहाराज मंदिरात माउलींच्या समाधिस्थळी जवळच पुरातन शिवपीठ म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. वैतागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने दूध प्रसादाचे वाटप करण्यात आले. बैजू काळे, अतुल लोणकर, कैलास वहिले, सुरेश भारंबे यांनी व्यवस्थापन केले.

पिंपरी - चिंचवडचा नवा आराखडा मंजूर
पिंपरी ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

पिंपरी-चिचवडमध्ये १४ गावांचा समावेश होऊन एक तप लोटल्यानंतर अखेर आज या परिसराचा आराखडा राज्य सरकारने मंजूर केला. दरम्यान , दुर्बल घटकांसाठीच्याा घरांच्या आरक्षित जागा वगळण्यामागे गोलमाल असल्याचे समजले. सुमारे ६४५ आरक्षणासाठी तब्बल १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.