Leading International Marathi News Daily

बुधवार , ५ ऑगस्ट २००९

  योगात करिअर
  करिअर सल्ला :
पाईपिंग इंजिनीअरिंगमधील करिअर
  करिअरनामा :
वित्तीय शिक्षण तरतूद
  स्टडी इन न्यूझीलंड
  साहसी उड्डाण
  प्रकाशन व्यवसाय
  स्पर्धा परीक्षांचे जग: रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ऑफिसरपदाची तयारी
  स्वयंरोजगार :
ज्वेलरी डिझायनिंग- कलात्मक करिअर
  क्रिएटिव्ह करिअर
  स्पर्धा परीक्षा- वस्तुनिष्ठ जगाचे सामान्यज्ञान

योगात करिअर
हिमालयाच्या गुहांमध्ये बंदिस्त असलेले योगशास्त्र जनसामान्यांमध्ये पोहोचविण्याचे आणि स्थिर करण्याचे कार्य गेल्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय योगतज्ज्ञांनी केले. विश्वाकडे आणि त्यातील घडामोडींकडे, एक जड वस्तू म्हणून पाहणाऱ्या पदार्थविज्ञानवेत्त्यांसाठी हा नवीन विषय होता. मानवी जीवनातील चढउतारांकडे वैद्यकीयदृष्टय़ा पाहणाऱ्या मानसशास्त्रज्ञांनाही यामुळे एक नवीन दृष्टी लाभली. या योगक्रांतीचे श्रेय योगमहर्षी बी. के. एस. अय्यंगार, बिहार योग विद्यालयाचे संस्थापक आणि वैश्विक योगसंस्कृतीचे जनक परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती, लोणावळ्याच्या कैवल्यधामचे संस्थापक स्वामी कुवलयानंद प्रभृतींकडे जाते. स्वामी सत्यानंदजींनी परदेशात जाऊन वैज्ञानिकांना आवाहन केले आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रयोगशाळांमध्ये योगशास्त्र पोहोचले. या साऱ्या प्रयत्नांचे विश्वरूपदर्शन म्हणजे आज एकटय़ा अमेरिकेतील एक- तृतीयांश नागरिक योगाशी घट्ट जोडले गेले आहेत. युरोप आणि ऑस्ट्रेलियातील मातीत योग रुजला आहे.
विज्ञानाधिष्ठित योगाचा पाया स्वामी सत्यानंदांनी रचला आणि त्याच्या कळसाची उभारणी आज एकविसाव्या शतकात,
 

बंगलोरच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे संस्थापक आणि या योगविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. आर. नागेंद्रजी करीत आहेत. जगातील प्रमुख विद्यापीठांशी संलग्नता, प्रत्येक देशात संस्थेचे केंद्र आणि सुमारे ५० हजार योगशिक्षक घडविण्याचे श्रेय डॉ. नागेंद्र यांना द्यावे लागेल. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत असलेले न्यूक्लिअर फिजिक्सचे शास्त्रज्ञ डॉ. नागेंद्र १९८० च्या सुमारास तेथील सेवा संपवून भारतात परतले. त्यांनी आपले जीवन आणि सेवाकार्यातील सारी पुंजी योगकार्यासाठी समर्पित केली. बंगलोरसारख्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरापासून ३२ कि.मी. अंतरावर, निसर्गरम्य स्थळी शंभर एकरांत ही संस्था स्थापन केली. आज जगातील एकमेव ‘योग विद्यापीठ’ (भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान मंडळाद्वारा मान्यताप्रश्नप्त) म्हणून हे ख्यातनाम आहे.
भारतात प्रमुख चार संस्था विज्ञानाच्या आधारे योगशास्त्र आणि योगोपचार विद्या शिकवितात. लोणावळ्याचे कैवल्यधाम, मुंगेरचे बिहार योग विद्यालय, बंगलोरचे स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था विद्यापीठ (व्यास) आणि हरिद्वार येथील गायत्री परिवाराचे देवसंस्कृती विश्वविद्यालय. यापैकी बिहार योग विद्यालय आणि बंगलोरचे योग विद्यापीठ या दोनच प्रमुख संस्थांना भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाअंतर्गत विद्यापीठ अनुदान मंडळाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या दोनच विद्यापीठांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमांना आणि तेथे प्रशिक्षित झालेल्या योगशिक्षकांना जगभरातील विविध देशांनी अधिकृत म्हणून मान्यता दिली आहे. या दोन संस्थांच्या अविरत प्रयत्नांचा भाग म्हणून आज भारतासह विविध देशांत योगाकडे ‘करिअर’ म्हणून पाहिले जात आहे. अनेक संस्थांमध्ये या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना लठ्ठ पगारावर नियुक्त केले जात आहे. याबाबत भारत ‘महासत्ता’ बनला आहे.
विद्यापीठ अनुदान मंडळाने, योगविज्ञानातील संशोधनाचे यश लक्षात घेऊन, प्रत्येक विद्यापीठाने योग आणि योगोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याची शिफारस चार वर्षापूर्वी केली. त्यानुसार कर्नाटकात धर्मस्थळ येथे असलेले एस.डी.एम. महाविद्यालय, म्हैसूर येथील शासकीय महाविद्यालय, बंगालमधील जाधवपूर विद्यापीठ, तिरुपती विद्यापीठ, केरळमधील कालिकत विद्यापीठ, अजमेर येथील महर्षि दयानंद विद्यापीठ, चेन्नईतील अण्णामलाई विद्यापीठ, आंध्र विद्यापीठ, जबलपूर, भोपाळ, ग्वाल्हेर येथील महाविद्यालये येथे योग आणि योगोपचार हे विषय शिकविले जातात. ही सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी उच्च शिक्षणासाठी बंगलोरच्या विवेकानंद योग विद्यापीठाशी (व्यास) संलग्नता घेतली आहे याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ, रामटेकचे कालिदास विद्यापीठ, नाशिकचे मुक्त विद्यापीठ आणि लोणावळ्याच्या कैवल्यधाममध्ये ‘योग’ हा विषय शिकविला जातो. मात्र येथे पदवी वा पदव्युत्तर शिक्षणाची सोय नाही. ही सारी वास्तवता लक्षात घेऊन योगात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी बंगलोरच्या योग विद्यापीठाकडे वळत आहेत.
स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था या विद्यापीठाला २००२ मध्ये यूजीसीतर्फे अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा बहाल करण्यात आला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि द्रष्टे कुलगुरू डॉ. एच. आर. नागेन्द्र आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी १९८६ पासून परिश्रम घेतले आहेत. मान्यता मिळण्यापूर्वी १५ वर्षे संस्थेतर्फे प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम शिकविले जायचे. २००२ पासून येथे योग इन्स्ट्रक्टर कोर्स, डिप्लोमा इन योगिक सायन्स, बॅचलर ऑफ योगसायन्स, बॅचलर ऑफ वैदिक कल्चर सायन्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी, डॉक्टरांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट योग थेरपी डिप्लोमा, एम. एस्सी. इन योगा, एम. डी. इन योग अ‍ॅण्ड रीहॅबिलिटेशन, हे अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविले जातात. आतापर्यंत विद्यापीठातून २०० पदवीधर, १५० पदव्युत्तर पदवीधर आणि १५ पीएच. डी. घेऊन विद्यार्थी बाहेर पडले असून ते देश-विदेशात योग-सेवा देत आहेत.
भारतासह पूर्वेकडील आध्यात्मिक ज्ञान आणि पश्चिमेकडील वैज्ञानिक संशोधन यांचा अपूर्व समन्वय हे या विद्यापीठाचे वैशिष्टय़ आहे. विद्यापीठाला भारत सरकारचे विज्ञान-तंत्रज्ञानांतर्गत योग संशोधन केंद्र, भारत सरकारची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था (SIRO), कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च इन कॉम्प्लिमेंटरी अ‍ॅण्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन, कर्नाटकातील राजीव गांधी आरोग्य-विज्ञान विद्यापीठाचे योगथेरेपी रिसर्च सेंटर, मंगलोर विद्यापीठाचे पीएच. डी. प्रश्नेग्राम सेंटर, बंगलोर येथील अखिल भारतीय मानसिक आरोग्य संस्थेचे संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. लंडन येथील रॉयल फ्री हॉस्पिटल, मिडल्सबर्ग जनरल हॉस्पिटल, फोर्ट कॉलिन्स चेस्ट क्लिनिक, लॉस एंजेलिस येथील इटिंग डिस्ऑर्डर सेंटर यांसह २६ देशांतील विविध वैद्यकीय संस्था या विद्यापीठाबरोबर योगविषयक संशोधन करीत आहेत. भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे डॉ. नागेन्द्र यांच्या नेतृत्वाखालील डॉ. आर. नागरत्ना (एम.डी.एफ.आर.सी.पी.), प्रश्ने. एन. व्ही. सी. स्वामी (पी. एचडी.), डॉ. शर्ले टेलीस (न्यूरोफिजिओलॉजीन पीएच. डी.), डॉ. रामचंद्र जी. भट, डॉ. आर. वेंकटराम, टी. मोहन, श्रीमती सुभद्रादेवी आणि एन. व्ही. रघुराम या टीमने योगासने, प्रश्नणायाम, रिलॅक्सेशन, तणाव व्यवस्थापन या क्षेत्रात संशोधन करून सुमारे १२५ शोधप्रबंध तयार केले आहेत. ते भारतासह परदेशातील अमेरिकन मेडिकल जर्नल, ब्रिटिश मेडिकल जर्नल, लॅन्सेटसारख्या जगन्मान्य मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. ‘प्रशान्ति कुटीरम्’ या विद्यापीठाच्या १०० एकर परिसरात प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, आरोग्यधाम रुग्णालय, विविध व्याधींवरील संशोधन विभाग, विद्यार्थी वसतिगृहे, क्रीडांगणे, स्वतंत्र निवासगृहे, अध्ययन केंद्रे आहेत. प्रयोगशाळांमध्ये ‘पर्सेप्शन अँड मोटोर पर्फॉर्मन्स.’ ‘कॉग्निटिव्ह न्यूरो-सायकोलॉजी’, ‘क्लिनिफल न्यूरो-फिझिऑलॉजी’ आणि ‘मॉलिक्युलर-बॉयोलॉजी अ‍ॅण्ड इम्युनोलॉजी’ या क्षेत्रात संशोधन सुरू असते. यासाठी गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. योग आणि भौतिकविज्ञान, योग आणि जीवनविज्ञान, योग आणि अध्यात्म, योग आणि व्यवस्थापनशास्त्र, योग आणि मानव्यशास्त्र अशा पाच विभागांद्वारे विद्यापीठाचे कामकाज चालते. या प्रत्येक विषयाचे स्वतंत्र आणि परिपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, ब्रिटन, तुर्कस्थान येथे विद्यापीठाच्या शाखा असून तेथे करण्यात आलेल्या पाहणीनुसार आज एक लाख प्रशिक्षित योग पदवीधरांची तेथे आवश्यकता आहे. (पगार एक लाख ते दहा लाख रुपये). ‘आरोग्यधाम’ या जगातील पहिल्या, २०० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयात अस्थमा, हायपरटेन्शन, होलिस्टिक हेल्थ, अर्थरायटिस, पाठीचे- मानेचे- डोक्याचे विकार, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी व्याधींवर योगोपचार केले जातात. या अनुभवांच्या आधारे विद्यापीठाने या वर्षी ‘स्टॉप डायबिटिस मुव्हमेंट’ हा संशोधन कार्यक्रम हाती घेतला आहे. तो भारतातील ३० प्रमुख शहरांत पाच वर्षे चालेल.
स्वामी विवेकानंद योग अनुसंधान विद्यापीठाने या वर्षी नऊ अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. त्यातील सर्वात क्रांतिकारक अभ्यासक्रम म्हणजे बॅचलर ऑफ नेचरोपॅथी अ‍ॅण्ड योग सायन्स (BNYS) हा होय. एम.बी.बी.एस.च्या धर्तीवरील हा अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा असेल. याला यू.जी.सी. आणि मेडिकल कौन्सिलने मान्यता दिली आहे. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योग यांचा समन्वय यात साधण्यात आला आहे. याशिवाय एम. फिल. (समुपदेशन आणि योगोपचार) दोन वर्षे, बी.एस्सी.एम.एस्सी. आणि एम.फिल. (योग आणि व्यवस्थापनशास्त्र) अनुक्रमे दोन व तीन वर्षे असे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. याशिवाय माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विद्यापीठाने ‘योग, जर्नालिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन’ हा अभ्यासक्रम (बी. ए. आणि एम. ए.) तयार केला आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी (आवेदन पत्र, शुल्क आणि अन्य) www.svyasa.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा किंवा webmaster@svyasa.org करावा. पत्ता : विवेकानंद योग अनुसंधान संस्था, एकनाथ भवन, १९ गावीपुरम् सर्कल, केम्पेगौडा नगर, बंगलोर- ५६००१९. कर्नाटक. फोन : ०८०-२६६१२६६९, ०८०-२६६०८६४५. शेवटी योग विषयातील संधीबद्दल, विविध शासकीय, खासगी रुग्णालये, हेल्थ केअर सेंटर्स, हेल्थ क्लब, हेल्थ स्पा, माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग, मानव संसाधन मंत्रालयाच्या अंतर्गत संस्थांमध्ये प्रशिक्षक, देश-विदेशातील शाळा, महाविद्यालये, मनोविकारावरील संशोधन, व्यवस्थापन संस्था, न्युरोफिजिओलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी इत्यादी संस्थांमध्ये आज प्रशिक्षित, पदवीधर योगशिक्षक हवे आहेत. भारतातील योगशास्त्राचा आणि त्याद्वारे संभाव्य सेवेचा हा विस्तार आहे.
अरुण खोंडे
संपर्क- ९८५०९५२०५३, ०२५३-२५७७१६१

नासा ते व्यासा
हा अध्यात्माचा, निवृत्तीनंतर करावयाचा उद्योग आहे, असा सोवळा दृष्टिकोन ठेवून योगाकडे पाहणाऱ्या भारतीयांना आणि पदार्थविज्ञानात गुंतून पडलेल्या शास्त्रज्ञांना योगाद्वारे नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय विवेकानंद योग अनुसंधान संस्था या जगातील पहिल्या मान्यताप्रश्नप्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र (६६) यांना द्यावे लागेल. डॉ. नागेंद्र यांचा मूळ पिंड वैज्ञानिकाचा. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये एम. ई. आणि पीएच. डी. प्रश्नप्त केलेले डॉ. नागेंद्र यांनी १९६८ ते ७५ पर्यंत बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये अध्यापनाचे कार्य केले. याच काळात ते कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलो होते. काही वर्षे त्यांनी अमेरिकेतील मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर, नासा येथे शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. हार्वर्ड विद्यापीठात ते इंजिनीअरिंग सायन्स लॅबमध्ये कन्सल्टंट होते. लंडनच्या इम्पेरिअल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कॉलेजचे मानद प्रश्नध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली. याच वेळी भारतीय संस्कृतीला विज्ञानाचे आयाम देण्यासाठी, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे जनक
मा. एकनाथजी रानडे यांनी परदेशस्थ भारतीय तरुणांना हाक दिली. डॉ. नागेंद्र १९७५ मध्ये भारतात परतले आणि केंद्राच्या सेवा प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहू लगले. २००० पर्यंत केंद्राचे सेक्रेटरी, योग विभागाचे सेक्रेटरी, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
मानवाच्या सर्वागीण आरोग्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्र अपुरे आहे, त्याला प्रश्नचीन भारतीय योगाची जोड द्यावी लागेल, हा मा. रानडे यांचा संदेश लक्षात घेऊन डॉ. नागेंद्र यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असलेल्या योगसंस्था, आश्रम पालथे घातले आणि त्यातून उभी राहिली विवेकानंद योग अनुसंधान संस्था अर्थात व्यासा! आज ही विज्ञानाधिष्ठित योग चळवळ त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली आहे. अभियांत्रिकीमध्ये त्यांचे ३० आणि योगशास्त्रात ६० शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. योग, प्रश्नणायाम, विविध व्याधी आणि योगोपचार मिळून त्यांचे ३५ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. इंडियन योग कौन्सिल या नव्याने स्थापन झालेल्या आणि प्रमुख योग संस्थांचा समावेश असलेल्या संस्थेचे ते कार्याध्यक्ष आहेत. देश-विदेशातील शासकीय, खासगी अशा अकरा संस्थांचे ते सल्लागार आहेत. १९९७ मध्ये योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी ‘योगश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.