Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

‘दहीहंडीची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी’
संजय नार्वेकर

मी सातवीत असल्यापासून विक्रोळीतील व्यायामशाळेच्या ओमकार गोविंदा पथकासोबत हंडी फोडण्यास जात होतो. मी उंचीने लहान असल्याने नेहमी मला वरच्या थरावर जाण्याची संधी मिळायची. आम्ही हंडीला साधारणत: चार-साडेचार थर उभारायचो. एका वर्षी मी नेहमीप्रमाणे सर्वात वरच्या थरावर हंडी फोडायला चढलो. दहीहंडीची दोरी मी धरली आणि नेमके त्याच वेळेस खालचे थर गडगडले. मी दोरीलाच लटकून राहिलो.

ब्रेल लिपीतील पुस्तकांबद्दल शासन ‘आंधळे’च!
शेखर जोशी

काही महिन्यांच्या मंत्रीपदासाठी मिळालेल्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणावर लाखो कोटी रुपये उधळणारे मंत्री आणि कोकण व नाशिक महसूल विभागासाठी कोटय़वधी रुपयांचे पॅकेज जाहीर करणारे राज्यकर्ते ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या छपाईसाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) या संस्थेच्या अनुदान शिफारसींबाबत मात्र ‘आंधळे’ झाले आहे.

नॅशनल पार्कमधील ‘सिटीवॉक’ लोकसत्ता व बहिशाल शिक्षण विभागातर्फे सुरू..
रानवाटा जाग्या झाल्या..
प्रतिनिधी
मुंबईत फारसा पाऊस नसला आणि उकाडा पराकोटीचा जाणवत असला तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला एक फेरफटका आपल्याला सारा शीण आणि ताणतणाव विसरायला लावतो. नॅशनल पार्कमध्ये प्रवेश करताच हिरवाई नजरेस पडते.. स्वागताला असतात जंगली द्राक्षांचे घड मिरवणारी तोरणे आणि असंख्य फुलपाखरे.. अधुनमधून नजरेस पडणारी हरणे क्वचित काळवीटेही..

पाठपुराव्याकरिता तक्रार क्रमांक उपयुक्त
मुंबईकरांच्या दैनंदिनीतील असंख्य अडचणींना वाचा फोडण्यासाठी अद्ययावत तक्रार निवारण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. 1916 या दूरध्वनी क्रमांकावर केवळ एक फोन करून आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा मुंबईकरांना अक्षरश ‘बारा महिने तेरा काळ’ उपलब्ध आहे. परंतु, या यंत्रणेबाबत प्रचार आणि प्रसार झाला तर महापालिकेची अकार्यक्षमता आणि कारभारातील त्रुटी उघड होतील, या भीतीपोटीच की काय या यंत्रणेला पालिकेने प्रसिद्धी दिलेली नाही.

ही कोंडी फुटणार कशी!
एकेकाळी दादर ते भायखळा या पट्टय़ात अनेक कापड गिरण्या होत्या. त्यामुळे गिरणगाव अशी या परिसराची ओळख बनली होती. मात्र गेल्या दशकात या भागाची ही ओळख जवळपास पुसली गेली आहे. गगनचुंबी इमारती, शॉपिंग मॉल आणि बडय़ा कंपन्यांच्या कार्यालयांनी बहुतांश गिरण्यांच्या जमिनी आता व्यापल्या आहेत. त्यामुळे गिरणगावचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. त्याचबरोबर गिरणगावातील वाहतुकीच्या परिस्थितीतही आमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते.

‘पालिका शाळांतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च महापालिका उचलणार’
प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धापरीक्षांद्वारे करिअरच्या चांगल्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी त्यांच्या शिक्षणाचा खर्च महापालिका करणार असल्याचे महापौर डॉ.शुभा राऊळ यांनी माटुंगा येथे नुकतेच जाहीर केले. महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने त्यासाठी ३० ऑगस्टपासून विद्यार्थ्यांचे शनिवार व रविवार असे अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने २००८-२००९ या शैक्षणिक वर्षांत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या गुणगौरव सोहळा माटुंगा पूर्व भागातील महेश्वरी उद्यानाजवळील म्हैसूर संघ सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

सहभागी लहान मुलांची काळजी गोविंदा पथकांनीच घ्यावी
समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी
दहीहंडी फोडण्यासाठी वरच्या थरावर चढणाऱ्या लहान मुलांच्या रक्षणाची काळजी गोविंदा पथकाने घेतलीच पाहिजे. तसेच पालकांची परवानगी घेऊनच लहान मुलांना गोविंदा पथकामध्ये सहभागी करावे, असे आज परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, क्रिकेट, कबड्डी, खो खो यासारख्या स्पर्धाप्रमाणेच दहीहंडीची स्पर्धा वर्षभर घेण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘मल्हार’च्या निमित्ताने चौपाटी झाली ‘चकाचक’!
प्रतिनिधी

‘मल्हार’ची प्राथमिक फेरी ९ ऑगस्ट रोजी आहे. असे असले तरी ‘मल्हार’ला सुरुवात झाली आहे. ‘मल्हार’ अंतर्गत ३ ऑगस्ट २००९ रोजी ‘चकाचक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम दरवर्षी खूप उत्साहाने पार पडतो. ‘चकाचक’ दोन भागात आयोजित करण्यात येतो. एका भागात ‘मल्हार’चा संपूर्ण वर्कफोर्स सहभागी होतो व दुसऱ्या भागात सर्व कॉलेजेसची मुले भाग घेतात. यात जिंकणाऱ्या टीमला गुण दिले जातात. या वर्षी ३ ऑगस्ट रोजी दादर चौपाटी येथे ‘चकाचक’चे आयोजन करण्यात आले होते. ‘मल्हार’च्या वर्कफोर्समधील सिक्युरिटी आणि असिस्टंटस् हे डिपार्टमेंटस्चे आयोजन करतात.

आता दहीहंडी स्पर्धा वर्षभर
प्रतिनिधी

दहीहंडी फोडण्यासाठी वरच्या थरावर चढणाऱ्या लहान मुलांच्या रक्षणाची काळजी गोविंदा पथकाने घेतलीच पाहिजे. तसेच पालकांची परवानगी घेऊनच लहान मुलांना गोविंदा पथकामध्ये सहभागी करावे, असे आज परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, क्रिकेट, कबड्डी, खो खो यासारख्या स्पर्धाप्रमाणेच दहीहंडीची स्पर्धा वर्षभर घेण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

आहे ‘मनोहर’ तरी..
प्रेस क्लब मुंबईतर्फे फक्त शिसपेन्सिलचा वापर करून काढलेल्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन १९९६ साली भरले होते. उद्घाटनाला सुप्रसिद्ध गायिका आशाताई भोसले आल्या होत्या. प्रत्येक चित्र निरखून बघताना त्या एका चित्रासमोर थबकल्या. ‘‘काळ्या पेन्सिलने चित्र काढताना पांढरा केस तुम्ही कसा हो काढता ?’’ त्यांच्या मनातली उत्सुकता ओठावर आली. अशा रीतीने बघणाऱ्याला कोडय़ात टाकणारे ते चित्रकार होते, रामचंद्र गजानन मनोहर!

विश्ववेधी वैज्ञानिक डॉ. अजित केंभावी
विद्यापीठ अनुदान मंडळाने १९८९ मध्ये पुणे विद्यापीठ परिसरात एका महत्त्वपूर्ण केंद्राची स्थापना केली. ‘आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र’ (आयुका) असे त्याचे नामकरण करण्यात आले. डॉ. जयंत नारळीकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या केंद्राने अगदी थोडय़ा कालावधीत आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केली आहे. आयुकाच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. अजित केंभावी यांची या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे विद्यापीठ अनुदान मंडळाने अलीकडेच जाहीर केले आहे.

पहिल्या झेन गार्डनचे आज उद्घाटन
प्रतिनिधी

नैसर्गिक अशा काळ्याकभिन्न शिलाखंडांच्या सौंदर्याचा वापर करीत दहिसर पश्चिमेकडे साकारलेल्या उद्यानाचे उद्घाटन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. दहिसर स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले हे दुसरे उद्यान असून प्रसिद्ध उद्यानतज्ज्ञ सुहास जोशी यांनी झेन या संकल्पनेवर आधारित या उद्यानात विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. या उद्यानात विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासिका, कलावंतांच्या कलाकृती प्रदर्शनासाठी कक्ष, चालण्याच्या व्यायामासाठी चालपट्टी, नैसर्गिक वाटावा असा धबधबा, पक्षी निरीक्षणासाठी मचाण आदी सुविधा आहेत. उद्घाटनाला महापौर शुभा राऊळ, आ. सुभाष देसाई, गजानन किर्तीकर, भाजपा मुंबई अध्यक्ष गोपाळ शेट्टी आदी उपस्थित राहतील, अशी माहिती दहिसर स्पोर्टस् फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी दिली.