Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

बससेवेचे शिवधनुष्य पेलण्यासाठी पालिकेत जोरदार ‘फिल्डिंग’
प्रतिनिधी / नाशिक

एखाद्या काडी पैलवानाने थेट महामेरू आपल्या शिरावर घेऊन भीम पराक्रम गाजविण्याचा प्रयत्न केल्यास त्याची अवस्था काय होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपल्या क्षमतेचा विचार न करता कुणीही केलेले असे दुसाहस केवळ अंगलटच येत नाही तर ते एखाद्याच्या जीवावरही बेतणारे ठरू शकते. सध्या नाशिकचे प्रथम नागरिक अर्थात महापौर अन् विरोधी काँग्रेस पक्षातील काही ज्येष्ठ नेतेमंडळी काहिसा असाच खेळ महापालिकेच्या पटलावर खेळण्यास सरसावली आहेत. निमित्त आहे,

नाशिक बाजार समितीला बरखास्तीची नोटीस
प्रतिनिधी / नाशिक

कोटय़वधी रूपयांचे कर्ज आणि आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरल्याच्या कारणास्तव जिल्हा उपनिबंधकांनी अखेर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीसाठी कलम ४५ अन्वये नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या अधिपत्याखालील बाजार समितीची बरखास्तीची प्रक्रिया सुरू झाल्याने सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बाजार समिती बचाव समितीने केलेला पाठपुरावा व बुधवारच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते.

यादवी, ‘ध’ चा ‘मा’ अन् प्रश्नचिन्हांनी हैराण शिवसैनिक
नाशिक / खास प्रतिनिधी

शिवसेनेच्या दोन गटातील संघर्ष पराकोटीला जाऊन पोहचल्यानंतर शांततेचा सुवर्णमध्य साधण्यासाठी थेट ‘मातोश्री’च्या आदेशानुसार ‘शांतीदूत’ म्हणून आलेल्या भाईंच्याच सूचनावजा सल्ल्याचा ‘ध’ चा ‘मा’ असा अन्वयार्थ काढला गेला. परिणामी, पेटलेली आग शमविण्यासाठी येणाऱ्या बंबात पाण्याऐवजी घासलेट आले अन् त्यातूनच मग आगीने अधिकच रौद्ररुप धारण केले.

सूचीकार!
कुठल्याही प्रकारची सूची बनवणे म्हणजे अत्यंत किचकट, खरे तर रटाळ अथवा कंटाळवाणे काम. त्यात ती सूची अत्यंत नावाजलेल्या साहित्यिकांच्या वाङ्मय संपदेची असेल; तर जिकीरी आणि जबाबदारी दोन्ही प्रचंड वाढणार. बरे, सूची म्हणजे केवळ नामावली नव्हे, तर त्या त्या लेखकाची जडणघडण, मिळालेले पुरस्कार, मानसन्मान, अप्रकाशित वा दुर्मिळ साहित्य अशा विविध बाबींचा अंतर्भाव करून ग्रंथसूचीचे संदर्भमूल्य वाढवायचे, ती अधिकाधिक समृद्ध आणि परिपूर्ण करायची, तर सूचीकारही लेखकाप्रमाणेच चतुरस्र असावा लागतो.

वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव पाटीलच्या मालमत्तेचा लिलाव होणार
जिल्हा कृती समितीची माहिती
प्रतिनिधी / नाशिक
महापालिकेच्या घंटागाडी कामगारांच्या नावावर बोगस कर्ज घेणाऱ्या रामराव पाटील या ठेकेदाराची सुमारे चार कोटींची मालमत्ता लिलावाने विक्री केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृती समितीच्या बैठकीत देण्यात आली. पालिकेतील घंटागाडी कामगारांची फसवणूक करून त्यांच्या नावे घंटागाड्या खरेदीसाठी बेमालूमपणे १० कोटीचे कर्ज रामराव पाटीलने उचलल्याचा खळबळजनक प्रकार अलिकडेच उघडकीस आला आहे.

मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकू नका -अ‍ॅड.अविनाश भिडे
नाशिक / प्रतिनिधी

पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकू नये, त्यांची आवड, कल व त्यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना त्या त्या क्षेत्रात पुढे जाऊ द्यावे, सर्वच क्षेत्रांत गुणवंतांना उत्तम संधी असते, असे प्रतिपादन अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी केले. येथे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे इंदिरानगर विभागात आयोजित गुणवंत विद्यार्थी, तसेच कला-क्रीडा व अन्य क्षेत्रातील १५० गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. विवेकानंद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे अ‍ॅड. भिडे बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक सतीश कुलकर्णी, राजन कुलकर्णी, सुभाष भागवत, अनिता कुलकर्णी, वैशाली खांडेकर, माधुरी कुलकर्णी, प्रदीप पेशकार आदींचा विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल होते. प्रास्तविक जयश्री शौचे यांनी केले. आभार रवींद्र भोसे यांनी मानले. सूत्रसंचालन अ‍ॅड. भानुदास शौचे, भूषण शुक्ल यांनी केले.

जिव्हेश्वर मंडळातर्फे गुणगौरव सोहळा
नाशिक / प्रतिनिधी

नवीन नाशिक येथील श्री जिव्हेश्वर प्रबोधन मंडळाच्या वतीने साळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये ८० टक्के गुण प्राप्त केलेले विद्यार्थी आणि सहावी ते बारावीमध्ये ७० टक्के गुण व कोणत्याही शाखेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांनी गुणपत्रके सादर करावीत. अधिक माहितीसाठी ९९२३१७५९०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.