Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

घाई
सजण दारी उभा, काय आता करू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?

सुरेश भटांची यशवंत देवांनी सजवलेली सुंदर कविता! माझ्या मनात ‘गोड घाईचं’ प्रतिकच होऊन बसलेली! गाणं ऐकताना पापणी मिटली-रे मिटली की त्या निमिषार्धातसुद्धा तारांबळ उडालेली ‘ती’ सजणी डोळ्यासमोर उभी राहते. तिची उडालेली गडबड, आवरलेल्या घरातसुद्धा तिला दिसणारा गोंधळ, मनात उचंबळणारं प्रेम! सगळं काही!
वैद्यकीय शिक्षण घेत असताना एक नाटक ‘बसवत’ होतो. एका सीनमध्ये लगीनघाई स्टेजवर दाखवायची होती. वैद्यकीय कॉलेजातील उत्साही नाटय़कर्मीना काही केल्या ‘घाई’ दाखवता येत नव्हती.

राष्ट्रवादीला सेनेचा शह..
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने बुलढाणा जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजप या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या सात मतदारसंघांपैकी बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा व खामगाव हे सहा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा तर, मलकापूर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात आहे. यापूर्वी २००४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २००९ ची विधानसभा निवडणूक वर्षांनुवर्षे सत्ता भोगणाऱ्या प्रस्थापित आमदारांसाठी राजकीय अस्तित्वाचा रणसंग्राम ठरणारी असेल. सध्या जिल्ह्य़ातील सात आमदारांपैकी शिवसेनेकडे दोन, भाजपकडे तीन, काँग्रेसकडे एक तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे.

कुरघोडीच्या राजकारणाला वेग
दोन दशकापूर्वी काँग्रेसची पकड असलेल्या अकोला जिल्ह्य़ाचे आताचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. भाजप-सेना युतीची जोरदार मुसंडी आणि भारिपबमसंच्या वाढत्या प्रभावामुळे येथील काँग्रेसच्या अस्तित्वालाच ग्रहण लागले आहे. गमावलेली सत्तासूत्रे पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी कंबर कसून कामाला लागली आहे. अकोला जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर आणि मूर्तीजापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. परिसीमन आयोगाने केलेल्या बदलानंतर बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघ अकोला पूर्वमध्ये सहभागी करून घेण्यात आला आहे.

शाळेत असताना मराठीच्या पाठय़पुस्तकातील कविता अभ्यासताना त्यांनी आपल्याशी कधी गट्टी केली आपल्याला कळलेही नाही. अभ्यास करताना कवितेची लागलेली ही गोडी पुढे वाढत राहिली. कविता वाचायला, म्हणायला आणि करायलाही आवडू लागल्या. मराठी साहित्यात कविता हा काव्यप्रकार अनेक नामवंतांनी लोकप्रिय केला आहे. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांनी तर महाराष्ट्रात गावोगावी कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम करुन मराठी कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. तर अलिकडच्या काळात प्रा. विसुभाऊ बापट हे ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाद्वारे तसेच डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी कविता लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे काम करत आहेत.
मराठी साहित्याला प्राचीन आणि अर्वाचीन अभिजात कवितेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. काव्य/ कवितांचे स्वरुप काळानुरुप बदलत गेले तरी मनातील भावनांना व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम ही कवितेची ओळख कायम राहिली आहे. मराठी कवितेच्या परंपरेत त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी, कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत आणि कवीवर्य भा. रा. तांबे यांनी आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हे कवी म्हणजे कवितेची विद्यापीठे आहेत. केशवसुत यांना तर आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाते. संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक वामन देशपांडे यांनी या कवींच्या काही निवडक कवितांचे संकलन-संपादन ‘निवडक केशवसुत’, ‘निवडक बालकवी’ आणि ‘निवडक भा. रा. तांबे’ केले असून ही पुस्तके मनोरमा प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. अभ्यासक, मराठी कवितेचे रसिक आणि काव्यप्रेमींसाठी ही तीनही पुस्तके संग्राह्य झाली आहेत. ‘निवडक केशवसुत’ या पुस्तकात केशवसुतांच्या १९ कवितांचा समावेश असून त्यात त्यांच्या आम्ही कोण, तुतारी, नवा शिपाई, झपुर्झा या गाजलेल्या कवितांसह अन्य कवितांचा समावेश आहे. कवितेच्या सुरुवातीला प्रत्येक कवितेची थोडक्यात माहिती देण्यात आली असून ती सुद्धा उपयुक्त अशी आहे. ‘निवडक बालकवी’ या पुस्तकात निसर्ग कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालकवींच्या २६ कविता असून पुस्तकाच्या अखेरीस विविध मान्यवरांनी बालकवींच्या कवितांबद्दल व्यक्त केलेली मते देण्यात आली आहेत. कवी भा. रा. तांबे यांच्या अनेक कविता या आज लोकप्रिय गाणी म्हणून आपल्या ओळखीची आहेत. या पुस्तकात त्यांच्या २६ कविता देण्यात आल्या आहेत. डोळे हे जुलमी गडे, तीन्ही सांजा सखे मिळाल्या, घन तमी शुक्र बघ राज्य करी, जन पळभर म्हणतील हाय हाय, नववधू प्रिया मी बावरते अशी अनेक लोकप्रिय झालेली गाणी ज्या मूळ तांबे यांच्या कविता रुपात आहेत, ती या पुस्तकात वाचायला मिळतात.
निवडक केशवसुत, बालकवी आणि भा. रा. तांबे या पुस्तकांमुळे या कवींच्या निवडक कविता एकत्र वाचण्याची आणि अभ्यास करण्याची मोठी सोय वामन देशपांडे आणि मनोरमा प्रकाशनाने उपलब्ध करुन दिली आहे.
शेखर जोशी
shejo66@gmail.com