Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आवक वाढल्याने कांदा दरात घसरण
लासलगाव / वार्ताहर

 

मागील सप्ताहात पावसाने उघडीप दिल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारात कांद्याच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. परिणामी कांद्याचे भाव घसरले आहेत. सप्ताहात कांद्यास कोलकाता, पाटणा, गोहाटी येथून तर विदेशातून दुबई, कोलंबो, बांगलादेश, येथून मागणी होती.
कांदा - एकूण आवक ७४,२६० क्विंटल. सर्व कांदा व्यापारी वर्गाने २०१ ते ६८१ क्विंटल दराने खरेदी केला. सरासरी भाव ५९९ प्रती क्विंटल.
गहू - एकूण आवक ५९३ क्विंटल. भाव १,१०० ते १,३९५ पर्यंत. सरासरी भाव १,२६०.
बाजरी - एकूण आवक ६८८ क्विंटल. स्थानिक भाव ८३० ते १,०६८ पर्यंत. सरासरी भाव ९४५. संकरीतचे भाव ७५१ ते ९५० क्विंटल. सरासरी भाव ८७५.
हरभरा - एकूण आवक १४५ क्विंटल. स्थानिक भाव १,४५२ ते २,६३० क्विंटल. सरासरी भाव २,१८२. जंबुसार भाव १,७०० ते २,४४० क्विंटल. सरासरी भाव २,२६५.
सोयाबीन - एकूण आवक ७८१ क्विंटल. भाव १,७०० ते २,२०० क्विंटल. सरासरी भाव २,१२०.
मका - एकूण आवक २१४ क्विंटल. भाव ७२० ते ९९० क्विंटल. सरासरी भाव ९६८.
ज्वारी - एकूण आवक ८३ क्विंटल. स्थानिक भाव ८२२ ते ९८० क्विंटल. सरासरी भाव ९४९. संकरीतचे भाव ७५१ ते ८४० क्विंटल. सरासरी भाव ७९६.
शेंगा - एकूण आवक २७ क्विंटल. शेंग सुकी भाव १,४०० ते २,५३३ क्विंटल. सरासरी भाव २,३३४.
निफाड उपबाजार आवार
निफाड उपबाजार आवारावर सप्ताहात कांद्याची एकूण आवक २४,५६५ क्विंटल. भाव २५० ते ६३० क्विंटल. सरासरी भाव ५७५. गहू आवक २६५ क्विंटल. भाव १,१५१ ते १,३५६ क्विंटल. सरासरी भाव १,२३६. मक्याची एकूण आवक २५ क्विंटल. भाव ९०० ते ९५६ क्विंटल. सरासरी भाव ९४०. सोयाबीनची एकूण आवक २४२ क्विंटल. भाव १,९५१ ते २,१४० क्विंटल. सरासरी भाव २,१२०.
उपबाजार आवार विंचूर
विंचूर उपबाजार आवारावर सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक ४६९ क्विंटल. भाव ९०० ते २,२२३९ क्विंटल. सरासरी भाव २,१४२. गहू एकूण आवक ९० क्विंटल. भाव १,१३१ ते १,३४० क्विंटल. सरासरी भाव १,१८४. मक्याची एकूण आवक ९ क्विंटल. भाव ७०० ते ९५१ क्विंटल. सरासरी भाव ८९६ पर्यंत.