Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

पावसाअभावी पिके हातची जाण्याची भीती
लष्करी अळीच्या प्रकोपाची शक्यता
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

येत्या दहा ऑगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर एक लाख हेक्टरमधील खरिपाची पिके हातची जाण्याची भीती कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही लष्करी अळीचा प्रकोप सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्हय़ात एकदाही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाही. आजवर जो काही पाऊस पडला तो तुरळक स्वरूपाचा होता. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यंदा भाताचे लागवड क्षेत्र एक लाख ४५ हजार हेक्टर आहे.

लोकहितासाठी झटणारा शिवसैनिक
कमलाकर हणवंते

जिल्हाप्रमुख असताना निर्माण केलेला मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्य, लोकोपयोगी कार्याची तळमळ आणि राजकारणापेक्षा समाजोपयोगी कार्यास प्रश्नधान्य दिल्याने संजय राठोड यांनी जनतेच्या मनावर वेगळा ठसा उमटवला आहे. जाती, धर्म आणि पक्षाचा विचार न करता जनतेच्या समस्या आणि खोळंबलेली कामे समजून घेणे आणि त्यासाठी लढणे हाच ध्यास आमदार संजय राठोडांनी घेतला आहे. लढवय्या शिवसैनिक म्हणून संपादन केलेल्या विश्वासामुळेच पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांनीसुद्धा काँग्रेसचा गड असलेल्या दारव्हा मतदारसंघातील मागील २० वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढून पक्षाचा विश्वास सार्थ ठरविला.

दूषित अन्न-पाण्यामुळे होणारे आजार
पावसाळ्यातील आजार भाग- ३

शहरी माणसांचे जीवन घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे पळत असते. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडताना शरीराचा, कपडय़ाचा नीटनीटकेपणा सांभाळणारे आहाराबद्दल किती जागरूक असतात? पोळी-भाजीचा डबा सोबत घेऊन जाण्याची संस्कृती आता बदलतच चालली आहे. ऑफिसच्या बाहेर टपरीवर मिळणारे वडापाव, भेळ, बर्गर आणि सँडविचेस आता बहुसंख्य तरुण-तरुणींचे ‘लंच’ होऊ लागलेत. स्वत:च्या शरीराची, सौंदर्याची, कपडय़ांची इतकी काळजी घेणारी ही पिढी आपल्या खाण्यापिण्याबाबत इतकी उदासीन का?

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार
खामगाव, ५ ऑगस्ट / वार्ताहर

बुलढाणा जिल्ह्य़ातील विविध नगरपालिकांवर अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तींना नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान करून काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांक समाजाचा सन्मान वाढविला आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी केले. जिया कॉलनी भागात २० लाख रुपये खर्चाच्या मुस्लिमासाठी समाजभवनाचे भूमिपूजन काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार सोहोळा नुकताच झाला.

पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचा विशेष सभेला फटका
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका चंद्रपूर पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेला बसला. पालिकेतील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दुपारी एक वाजता आयोजित सभा नगराध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना रद्द करून पुढे ढकलावी लागली. कर्मचारी संपावर असल्याने शहरात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राज्यातील नगर पालिका व महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ३ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला जिल्हय़ात कामगारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २०८० पैकी १९१५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रशंसनीय उपक्रम
बल्लारपूर, ५ ऑगस्ट / वार्ताहर

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके, वह्य़ा, गणवेश वाटप करण्यात येते. संस्थेने कारागृहातील कैद्यांना देखील शिक्षण घेण्यास प्रश्नेत्साहित करून अशाच प्रकारचे सहाय्य केले आहे. शिक्षण घेण्यास प्रश्नेत्साहित करून अशाच प्रकारचे सहाय्य केले आहे. पैकी काहींनी स्नातक पदवी प्रश्नप्त करून संस्थेचा सन्मान राखला आहे. यावर्षीदेखील आमदार मुनगुंटीवारांच्या ४८ व्या वाढदिवशी आईसोबत काम करून शिक्षण घेणाऱ्या रेश्मा डोंगरे, तिच्या मातोश्री सीता डोंगरे, गणेश सैंदाणे यांचा सत्कार करण्यात आला. अभिजित मडकावार, कौसर अंजुम, राजनंदिनी व्यंकटेश्वरलु, नक्का अशोक, शेख सलीम शेख रफीक, शिवकुमार लक्ष्मीचंद, प्रीती मिश्रा, शुभम डोंगरे व ममता डोंगरे यांना साहित्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला तहसीलदार दिलीप फुलसुंगे, अशोक गुप्ता, विनायक साळवे, कृत्तिका सोनटक्के, नरहरी तोटावार आदी उपस्थित होते.

गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची मागणी
गोंदिया, ५ ऑगस्ट / वार्ताहर

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणीची बैठक येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जिल्ह्य़ाचे अध्यक्ष विजय राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत आमदार राजेंद्र जैन, आमदार दिलीप बन्सोड, नागपूर म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुक्याचे अध्यक्ष याशिवाय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत पक्ष सदस्यता अभियान व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली. सभेत पक्षाच्या वतीने सदस्यता अभियानासाठी तालुका स्तरावर देण्यात आलेल्या सदस्यता पुस्तकांचा आढावा घेण्यात आला तातडीने पुस्तके जिल्हा कार्यालयाकडे जमा करण्यात यावे, असे ठरले. विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधाने कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. त्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख मतांचे मताधिक्ये लोकसभा निवडणुकीत मिळाले असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ात देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी एकमुखाने केली. शेवटी हा निर्णय प्रफुल्ल पटेल यांनी घ्यावा, अशी विनंती करण्यात आली. पटेल यांनी घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य राहील, असे विचार सभेत व्यक्त करण्यात आले. सभेला आमदार राजेंद्र जैन, आमदार दिलीप बन्सोड, नरेश माहेश्वरी, विजय राणे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्य़ातील सर्वच तालुका अध्यक्षांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रश्नध्यापकांचा आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
विद्यापीठ प्रश्नधिकरणांच्या कामावरही प्रश्नध्यापकांचा बहिष्कार
यवतमाळ, ५ ऑगस्ट / वार्ताहर

केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा, नेट-सेटग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत इत्यादी ३२ मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रश्नध्यापक महासंघाने (एम.फुक्टो.) केलेल्या आवाहनानुसार राज्यातील १२ विद्यापीठातील ३५ ते ४० हजार प्रश्नध्यापकांनी ‘विद्यापीठ प्रश्नधिकरणावरील कामावर ‘बहिष्कार आंदोलन’ सुरू केले आहे. १४ जुलैपासून प्रश्नध्यापकांचे राज्यभर ‘काम बंद’ आंदोलन सुरू आहे. आता ५ ऑगस्टपासून विद्यापीठ प्रश्नधिकरणाच्या कामावर ‘बहिष्कार’ टाकल्याने विद्यापीठाची सर्व कामे प्रभावित झाली आहेत. अभ्यास मंडळाच्या बैठकी असो, व्यवस्थापन परिषदेची बैठक असो, विद्याशाखेची अथवा कोणत्याही समितीची बैठक असो प्रश्नध्यापकांच्या बहिष्कारामुळे विद्यापीठ कामकाज ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रश्नध्यापकांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यापूर्वी एम.फुक्टो.चे उपाध्यक्ष प्रश्नचार्य एस.टी. सांगळे, सचिव डॉ. प्रवीण रघुवंशी, ‘नुटा’चे अध्यक्ष आमदार प्रश्न. बी.टी. देशमुख यांच्यासह एम.फुक्टो.चे अध्यक्ष प्रश्न. आर.सी. सदाशिवन व सरचिटणीस प्रश्न. डॉ. एकनाथ कठाडे यांनी व्यक्त केला आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशामुळे आनंदी
मूर्तीजापूर, ५ ऑगस्ट / वार्ताहर

२००९ च्या शालान्त परीक्षेत दोन विषयांतर्गत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ द्वारा अकरावी प्रवेशासाठी शासनाने सवलत दिल्यावरून सोमवारपासून प्रवेशास प्रश्नरंभ झाल्यामुळे मूर्तीजापूर तालुक्यातील ३८२ नापास विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही प्रवेशामुळे आनंद फुलला आहे. इयत्ता १० वीत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता ११ वीत प्रवेश मिळत असल्याने प्रवेशासाठी अशा विद्यार्थ्यांनी तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयामधून ३ ऑगस्टपासून प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश घेताना संबंधित माध्यमिक विद्यार्थ्यांना त्याच उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश देण्याबाबत कार्यवाही व्हावी, संबंधित शाळेस उच्च माध्यमिक विद्यालय जोडले नसल्यास नजिकच्या कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करावी, वरील दोन्ही विकल्प उपलब्ध नसल्यास तालुका अथवा जिल्हा स्तरावर प्रवेशासाठी कार्यवाही करून तालुकानिहाय अहवाल माध्यमिक जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात १२ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देशही येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. मार्च २००९ च्या परीक्षेत मूर्तीजापूर तालुक्यातून एक विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांची संख्या १९० असून १९२ विद्यार्थी दोन विषयांमध्ये नापास झाले आहेत. एटीकेटीमुळे आता या विद्यार्थ्यांच्या ११ वीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकवर्गातही आनंद दिसून येत आहे.

सेंट्रल बँकेच्या ‘सेंट किसान गोल्ड कार्ड’ योजनेचा शुभारंभ
अचलपूर, ४ ऑगस्ट / वार्ताहर

येथील नगरपालिकेच्या सभागृहात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने ‘सेंट किसान गोल्ड कार्ड’ योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.व्ही. मेश्राम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एन. वाघूरवाघ, एम.एस. राजू उपस्थित होते. या कार्यक्रमात २५१ लाभार्थीचे १ कोटी ६ लाख रुपयांकरिता ‘गोल्ड कार्ड’ स्वीकृत करण्यात आले. याप्रसंगी आर.व्ही. मेश्राम म्हणाले की, सर सोराबजी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. सेंट किसान ‘गोल्ड कार्ड’ ही अनोखी योजना आहे. या कार्डवर वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आदी शेतकऱ्यांना मिळू शकते. अमरावती जिल्ह्य़ात इयत्ता १० वीला तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली ऋचा पाटसकर व ऋचा सावरकर या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रश्नस्ताविक अचलपूर शाखेचे शाखा प्रबंधक किशोर देहरी यांनी केले. संचालन चारुदत्त चौधरी यांनी केले. आभार पानबुडे यांनी मानले. याप्रसंगी श्रीकांत धामगावकर, निशिकांत वासनिक, रामचंद्र देशमुख, अरुण बिडवाईक, भास्कर कनोजे, विजय उईके, रमेश कर्टजा, सालस ओझा उपस्थित होते.

शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
गोंदिया, ५ ऑगस्ट / वार्ताहर

शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात शेतकरी संघटनेने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मोहफुलावरील बंदी हटवावी, धान उत्पादक शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करावे, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सोय करावी, तलाठय़ांकडून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्र त्याच्या गावातच सुरू करावी, मोफत वीज पुरवठा द्यावा, कामठा व दवनीवाडाला तालुक्याचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रति एकर पीक कर्ज द्यावे, कर्जमाफी व नुकसानभरपाई न देणाऱ्या बँक व्यवस्थापकांना अटक करावी. बिर्सी विमानतळाकरिता व तिरोडातील अदानी प्रकल्पात शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांना २५ लाख रुपये प्रति एकर नुकसानभरपाई द्यावी या मागण्यांना घेऊन शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. गोंदिया जिल्हा शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वीरेंद्र जयस्वाल यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अविनाश झाडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या मोर्चात शेतकरी संघटनेचे लालसिंग पंधरे, प्रभाकर नायडू, प्रश्न. वासुदेव पटले, झनकलाल लिल्हारे, चंद्रशेखर रहमतकर, विनोद येवले, राजकुमार अग्रवाल, देवलाल महारवाडे, तिलक नागपुरे, युवराज सोनवाने, हिवराज सोनवाने, अनिल बावनथडे, ममता टेंभेकर, शांता नेवारे, सुनीता खुडसाम, फुलवंता गजबे, कपिल चव्हाण याचा समावेश होता.

निलंबित अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

अकोला जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे निलंबित प्रभारी कार्यकारी अभियंता दिवाकर पाटील यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाटप समितीच्या बैठकीचा बनावट अभिलेख तयार करणे, काम वाटपाची बनावट यादी तयार करणे असे आरोप दिवाकर पाटील यांच्यावर आहेत. कार्यकारी अभियंता अरुण महाजन यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. काम वाटप समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व काम वाटपाची यादी वारंवार पाटील यांना मागण्यात आली होती. अनेक दिवस टाळाटाळ केल्यानंतर त्यांनी ती सादर केली. त्यामध्ये अनेक कामे अनधिकृतपणे समाविष्ट करण्यात आल्याचे निदर्शनास आले. सुमारे ६२ कामे अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाटील यांना याआधी अनियमिततांच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात खासदार हंसराज अहीर व नगराध्यक्ष मनोहर पाऊणकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेकोलिचे महाव्यवस्थापक डी. सी. गर्ग, नागपूरचे तंत्र संचालक बी. के. सक्सेना, महाव्यवस्थापक यू. एस. तिवारी, महाव्यवस्थापक मुखर्जी, महाव्यवस्थापक खरे, मुख्य खाण अधिकारी एन. के. सिंग, शफीक अहमद, रमेश मामीडवार, प्रशांत पोटदुखे, निनाद गड्डमवार, सुनील पटेल, विनोद दत्तात्रेय, डॉ. देवईकर, डॉ. बांगडे, अशोकसिंह ठाकूर, मधुसूदन रूंगठा, प्रश्नचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित उपस्थित होते. यावेळी डी. सी. गर्ग, खासदार हंसराज अहीर, प्रश्नचार्य कीर्तीवर्धन दीक्षित यांची भाषणे झाली. यंदाच्या विद्यापीठ परीक्षांमध्ये आठ विद्यार्थी गुणवत्तायादीत प्रथम आल्याचे प्रश्नचार्य कीर्तीवर्धन दीक्षित यांनी सांगितले. कार्यक्रमात अंतिम वर्षात विद्यापीठात व महाविद्यालयात प्रथम आलेल्या गुंजन संधू हिचा सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.

बंदरझिरा दग्र्यात उरूस साजरा
भंडारा, ५ ऑगस्ट / वार्ताहर

तुमसर तालुक्यातील अंबागड गावाशेजारी सातपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य तीर्थक्षेत्र बंदरझिरा येथे सैय्यद सिद्धीक शाह बाबांचा उरूस हजारो हिंदू-मुस्लिम भाविकांच्या उपस्थितीत झाला. दग्र्यावर चादर चढविण्याचा सोहोळा मिरानपूर कटरा शरीफ येथील मोहम्मद मुजम्मील कलिमी चिश्ती यांच्या हस्ते झाला. प्रमुख उपस्थितीत मुजीब, ग्रीन हेरिटेजचे मो. सईद शेख, दाजी अमीर अली, इब्राहीम पटेल, शमीम, युसूफ कलिमी, सुलेमान रजा, उस्मान रजा, अक्रम कुरैशी, मोहमूद अली, कलिमी, जावेद रजा, मुकेश मोहळे, लहानू फुलेकर, शंकर कावळे, रमजान शेख, शेख मास्टर, मुन्ना कलिमी आदी उपस्थित होते. या यात्रेत निसर्गसौंदर्याचा आस्वाद ही महत्त्वपूर्ण पर्वणी सर्वाना लाभली.