Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

लोकहितासाठी झटणारा शिवसैनिक
कमलाकर हणवंते

जिल्हाप्रमुख असताना निर्माण केलेला मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्य, लोकोपयोगी कार्याची तळमळ आणि राजकारणापेक्षा समाजोपयोगी कार्यास प्रश्नधान्य दिल्याने संजय राठोड यांनी जनतेच्या मनावर वेगळा ठसा उमटवला आहे.
जाती, धर्म आणि पक्षाचा विचार न करता जनतेच्या समस्या आणि खोळंबलेली कामे समजून घेणे आणि त्यासाठी लढणे हाच ध्यास आमदार संजय राठोडांनी घेतला आहे. लढवय्या शिवसैनिक म्हणून संपादन केलेल्या विश्वासामुळेच पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांनीसुद्धा काँग्रेसचा गड असलेल्या दारव्हा मतदारसंघातील मागील २० वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढून पक्षाचा विश्वास सार्थ ठरविला.
वृद्ध, विधवा महिला, गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळ, विजेचे भारनियमन, पाणी, रस्ते, विद्यार्थी-पालकांच्या समस्या, अन्याय, अत्याचार, दारिद्रय़ रेषेखालील

 

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी पाठपुरावा केला.
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असलेले मानसिक दडपण, प्रसंगी जनहिता खातर जशास तसे मार्गाचा अवलंब करून गाव तिथे विहीर, पाण्याची टाकी, रस्ते, क्रीडा संकुल, शहर सौंदर्यीकरण, तीर्थक्षेत्र विकास, जलसिंचन आदी कामाकरिता शक्य तेवढा निधी उपलब्ध करून देऊन बरीचशी कामे मार्गी लावली आहेत. गरीब, शेतकरी, विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, असाध्य रोगपीडित रुग्णांना मदत अशा लोकोपयोगी कार्यावर ४ कोटी ४० लाख रुपये आमदार निधी खर्च केला आहे.
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मोर्चा, आंदोलने या मार्गाचा अवलंब करणे हा त्यांच्या कामाचा भाग बनला आहे. ऊस उत्पादकांनी बोदेगाव येथील साखर कारखान्यात केलेले आंदोलन, लष्करी अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी दिलेला लढा, शेतकरी ते सर्वसामान्य विद्युत ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ‘महावितरण’च्या उपविभागीय कार्यालयासमोर केलेले बेमुदत उपोषण, विभागातील मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले आंदोलन, हंटर आंदोलन, मुंबईत विधानसभेसमोर केलेले कंदील आंदोलन, पॅकेज अंतर्गत निष्कृष्ट साहित्य वाटपाबद्दल नागपूर येथे विधानसभा भवनासमोर केलेले प्रदर्शन, दारव्हा शहरालगत असलेल्या नवीन वसाहतीत राहणाऱ्या जनतेच्या समस्येकरिता विधानसभेत उठविलेला आवाज, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेंतर्गत दारव्हा-नेर तालुक्यातील ७०० विधवा महिलांना ७० लाख रुपयांची मदत, वृद्ध श्रावणबाळ योजना, संजय निराधार योजना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना साडी-चोळी वाटप, शेतात वृक्षारोपण, धामणगाव (देव) येथे भक्तनिवास, याचबरोबर धार्मिक कार्यातील त्यांचा पुढाकार, घोषणा व आश्वासनांचा मुळीच आधार न घेता कर्तव्यपूर्तीस प्रश्नधान्य दिले.
वन्यप्रश्नण्यांमुळे पिकांच्या नुकसान भरपाईचा निधी जिल्ह्य़ात सर्वात जास्त मिळवून देणारा आमदार व पूरग्रस्तांना न्याय मिळवून देणारा असाही लौकिकी आमदार संजय राठोड यांनी मिळवला. विधानसभा फेररचनेमध्ये दारव्हा-नेर तालुके आणि दिग्रस शहरासह काही खेडी जोडून दिग्रस विधानसभा मतदारसंघ झाला आहे.
मार्गी लागलेली कामे
दारव्हा-नेर शहरांचे सौंदर्यीकरण, मुख्य रस्त्याचे द्विभागीकरण व पथदिवे.
पाणी टंचाईग्रस्त कोहळा, धामणगाव, करजगाव, रामगाव आणि गोरेगाव खेडय़ातील जनतेसाठी ९ कोटी रुपयांची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाच्या मार्गावर.
तीर्थक्षेत्र विकास निधीतून दारव्हा-नेर तालुक्यातील प्रश्नचीन मंदिराचा जीर्णोद्धार धामणगाव (देव) कोलवाई, डोल्हारी (देवी), पाथड्रदेवी, तरनोळी, देऊळगाव वळसा येथील तीर्थस्थानाचा विकास.
गाव तिथे विहीर आणि पाण्याची टाकी.
आंतरगाव लघुसिंचन प्रकल्प.
रस्त्यांची अपूर्ण कामे डांबरीकरणासह पूर्ण जवळा- ब्राम्हनाथ, डोल्हारी, भोपापूर, धुळापूर, कुऱ्हाड, दत्तपूर आदी.
दारव्हा उपजिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालय बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर.
अपूर्ण राहिलेली कामे
दारव्हा येथे उपजिल्हा न्यायालय इमारतीचे बांधकाम.
अडाण धरण पाणीपुरवठय़ाचे उद्दिष्टय़.
डोल्हारी येथील लघुसिंचन प्रकल्प.
मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न
पाण्याचे दुर्भिक्ष्य.
शेतमाल प्रक्रिया उद्योग विकास.
पदवीत्तर शिक्षण असुविधा.
पुन्हा निवडून आल्यास -
दारव्हा शहराकरिता कायमस्वरूपी नवीन पाणीपुरवठा योजना, दारव्हा-दिग्रस-नेर औद्योगिक वसाहतींमध्ये सुशिक्षित बेरोजागारांकरिता प्रकल्प उभारणी, दारव्हा-दिग्रस-नेर तालुक्यातील खेडी मुख्य रस्त्यांशी जोडणे, बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण आर्थिक विकास ही कामे करणार आहे.