Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार
खामगाव, ५ ऑगस्ट / वार्ताहर

बुलढाणा जिल्ह्य़ातील विविध नगरपालिकांवर अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तींना नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान करून काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांक समाजाचा सन्मान वाढविला आहे,

 

असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी केले.
जिया कॉलनी भागात २० लाख रुपये खर्चाच्या मुस्लिमासाठी समाजभवनाचे भूमिपूजन काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार सोहोळा नुकताच झाला. खामगाव शहरातील जिया कॉलनीमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद न.प. उर्दू शाळा क्र.४ च्या प्रश्नंगणात २० लक्ष रुपये खर्च करून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी बांधण्यात येणाऱ्या समाजभवनाचे भूमिपूजन व जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार सोहोळा व जाहीर सभा पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सानंदा होते. याप्रसंगी व्यासपीठावर बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर, बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष डॉ. तबस्सुम हुसेन, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशोक नागरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार, खामगावचे प्रथम नागरिक अशोक सानंदा, मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. मजीद कुरेशी, शेगावच्या नगराध्यक्ष जैबुन्निसा समशोद्दीन जमादार, खामगावच्या उपाध्यक्ष सईदाबानो इब्राहीम खान, देऊळगाव राजा नगर परिषदचे उपाध्यक्ष इकबाल कोटकर, माजी उपाध्यक्ष हारूण सदर, माजी नगरसेवक कमरू जम्मा, माजी नगरसेवक अ. समद जमादार, डॉ. एम.आय. साजीद, बांधकाम सभापती प्रवीण कदम, नगरसेविका गौकर्णा पाटील, हुसेन मौलाना, हाजी अ. रसीद खामगावच्या माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेविका सरस्वती खासने, शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बुडू जमादार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष व नगरसेवक सै. गणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता वैभव, नगरसेवक रहेमान बाबा, अंजुमन हायस्कूलचे माजी प्रश्नचार्य बह्रुद्दीन अंसार, राहुल गांधी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निक्की बोहरा, शिक्षण सभापती दिनेश अग्रवाल, नगरसेवक सुनील लाहुडकार, माटरगाव बु.चे सरपंच इनायतखाँ, शेगाव तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष नियाज अहमदखाँ, लाखनवाडाचे सरपंच अजीजखाँ आदी उपस्थित होते.