Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत
दोन्ही पॅनलला सारख्याच जागा
तुमसर, ५ ऑगस्ट / वार्ताहर

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सहकार व शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना समसमान यश प्रश्नप्त झाले तर किसान विकास आघाडीला फक्त खाते उघडता आले. बाजार समितीचे संस्थापक माजी सभापती व माजी आमदार ईश्वर दयाल पटले यांना दारुण पराभवाला

 

सामोरे जावे लागले.
निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सहकार व शेतकरी पॅनलचे प्रत्येकी सात व आठ उमेदवार विजयी झाले. शेतकरी आघाडीचे रामदयाल पारधी, विश्वनाथ कुकडे, जगदीश कोरडे, किसनाबाई तुरकर, वीणा धुर्वे, दिवांजी पटले, देवेंद्र अवथरे, राजकुमार माटे हे विजयी झाले. सहकार पॅनलचे मनोहर कहाळकर, किरण अतकारी, युवराज आगाशे, भाऊराव तुमसरे, सुनील गिरीपुंजे, विनोद बुराडे, वीरेंद्र रंगारी यांचा विजय झाला. किसान विकास आघाडीचे खुशाल पुष्पतोडे तर अपक्ष अरविंद कारेमोरे, हरिशंकर समरित व सहादेव लांजेवार विजयी झाले.
निवडणुकीत पैसा आणि दारू कुठेही कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अप्रत्यक्ष भाग असल्याने आर्थिक संपन्नता देणारी निवडणूक ठरली. जेवणावळी याही निवडणुकीत होत्या. ही लोकशाही प्रक्रियेची विटंबना असल्याचे राजकीय विशेषज्ञांनी म्हटले आहे. सभापती निवडणुकीसाठी घोडेबाजार आजपासूनच वधारला आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी निवडणूक भ्रष्टाचार संपवणार कसा? असा प्रश्न बाजार समिती प्रश्नंगणात विचारला जात होता.
बाजार समितीचे संस्थापक माजी सभापती, माजी आमदार व तालुका खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष ईश्वरदयाल पटले यांनी कोणत्याही अवैध मार्गाचा अवलंब केला नसल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. तालुका सहकारी देखरेख संघाचे अध्यक्ष रविदयाल पटले हे पराभूत झाले. भ्रष्टाचार ते शिष्टाचार उलगडून दाखवणारी ही निवडणूक ठरली. मतमोजणीप्रसंगी मतमोजणी अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने लागलीच गाशा गुंडाळावा लागला.