Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुनगंटीवारांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. ४८ मंदिरांमध्ये महापूजा, महाभिषेक,महाप्रसादाचे वितरण व

 

रक्तदान शिबीर घेण्यात आले.
शहराचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, बालाजी मंदिर, गणपती मंदिर, बाबुपेठेतील महादेव मंदिर, बंगाली कॅम्प परिसरातील दुर्गा मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा, मोरवा, लखमापूर, आरवट, मारडा, वेंडली, पिपरी आदी गावातील मंदिरांमध्येसुद्धा महापूजा करण्यात आली.
येथील गिरनार चौकात भाजपच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे नेते किशोर जोरगेवार यांनी रक्तदान करून शिबिराचा प्रश्नरंभ केला. यावेळी नगरसेवक वसंत देशमुख, प्रकाश धारणे, अविनाश राऊत, सुनील खांडरे, पुनम तिवारी, गीता भांडेकर, राजू कामपेल्ली, विलास जोगेकर, विकास राऊत, अरविंद गुज्जेवार, संजय तिवारी, अजय धवने आदींसह ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांसह रक्तसंक्रमण विभागाचे सर्व प्रमुख उपस्थित होते. शिबिरादरम्यान भाजपचे शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वनिता कानडे, अंजली घोटेकर, सुरेश भाकरे, सुभाष कासनगोट्टवार, राजेंद्र खांडेकर, राजेंद्र वैद्य, अशोक मोगरे, रेखा गायकवाड, अश्विनी आवळे, शीला चव्हाण, सूर्यकांत कुचनवार आदी उपस्थित होते. अखिल भारतीय बंगाली उन्नयन समितीच्या वतीने बंगाली कॅम्प परिसरातील सुभाष चौकात समितीचे अध्यक्ष तुषार सोम यांच्या नेतृत्वाखाली भोजनदान करण्यात आले.
जिल्हा शासगकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गांधी, भाजपा नेते किशोर जोरगेवार, भाजपाचे शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, शहर सरचिटणीस सुभाष कासनगोट्टवार, अल्पसंख्याक आघाडीचे नेते सज्जाद अली आदींच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले. भाजप अल्पसंख्याक आघाडीतर्फे तुकूम परिसरात हकीमी कॉन्व्हेंट येथे सुभाष कासनगोट्टवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबूक व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.