Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गुणवंतांच्या कौतुकातूनच शैक्षणिक विकास’
पांढरकवडा, ५ ऑगस्ट / वार्ताहर

शहरातील विविध शाळा- महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहोळा नगर परिषद शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भाऊराव मरापे होते तर

 

प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती देवानंद पवार, प्रकल्प अधिकारी सारंग कोडोलकर, तर प्रमुख उपस्थितीत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय पाटील चालबर्डीकर, श्री जगदंबा संस्थानाचे अध्यक्ष प्रेमराव वखरे, ज्येष्ठ नागरिक किसनराव राशतवार, खरेदी विक्री संघाचे संचालक मदनराव जिड्डेवार, नगर परिषद उपाध्यक्ष शंकर बडे, शिक्षण सभापती मनोज भोयर, बांधकाम सभापती नासिर शेख, आरोग्य सभापती राजू मुप्पीडवार, महिला व बालकल्याण सभापती जहिरा विराणी, ज्येष्ठ नगरसेवक बाबाराव परचाके, मुख्याधिकारी डॉ. विजय दासे, नगरसेवक भावेश बोरेले, शब्बीर बेग, करीम, राम कुमरे, अंकितराव नैताम, कल्पना मंडाले, सुरताना पोसवाल, वंदना रॉय, सीमा दिघाडे, जंगल कामगार संस्था अध्यक्ष वामनराव सिडाम आदी व्यासपीठावर होते.
नगरपालिका दरवर्षी जुलै महिन्यात शहरातील गुणवंतांचा सत्कार करून त्यांना पुढील जीवनातील शिक्षणाकरिता प्रश्नेत्साहित करणे म्हणजेच शहराच्या सर्वागीण विकासासोबतच शहरातील गुणवत्ताप्रश्नप्त गुणवंतांचा सत्कार करून शैक्षणिक विकासच साधत आहे. या सत्कारामुळे ही गुणवंत विद्यार्थी पुढे जातात त्यासोबतच त्यांच्या नंतरच्या बॅचचे विद्यार्थीसुद्धा भविष्यात आपला सुद्धा असा सत्कार झाला पाहिजे म्हणून अभ्यासात झटतात. मेहनत व अभ्यासाचा मेळ बसवून गुणवत्तेची झळाळी वाढवितात, म्हणून गुणवंतांच्या गुणवत्तेचे कौतुक करण्याचा हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असल्याचेही माजी मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले.
या सत्कार सोहोळ्यात गुणवंत विद्यार्थी अनुप दादाराव आत्राम, विशाखा विनायक हुगेवार, प्रतीक महादेव भोंगे, अनिकेत विनायक वद्देवार, अमेय राम देवघरे, रोशनी किशोर पंधरे, शुभम प्रकाश ताडपेल्लीवार आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवानंद पवार, नगर परिषद उपाध्यक्ष शंकर बडे, विजय पाटील आदी मान्यवरांची भाषणे झाली. तर सत्कारमूर्ती डॉ. सचिन भूत, राहुल आत्राम, विशाखा उग्गेवार या गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या सर्व विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.