Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

टपाल खात्यातील मनुष्यबळाअभावी सुशिक्षित बेरोजगारांना फटका
मूर्तीजापूर, ५ ऑगस्ट / वार्ताहर

येथील मुख्य टपाल कार्यालयात गेल्या काही वर्षापासून मनुष्यबळ कमी पडू लागल्याने सेवेत कमालीची अनियमितता निर्माण झाली आहे. त्याचा फटका प्रश्नमुख्याने सुशिक्षित बेरोजगारांनाच

 

सर्वाधिक बसतो, असा आरोप केल्या जात आहे.
मूर्तीजापूर टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि परिणामी सेवेतील अनियमिततेने जनतेचे होणारे नुकसान याबाबत येथील नागरिकांनी अनेकदा वरिष्ठस्तरावर तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. दरम्यान, रेल्वे वसाहतीमधील नागरिक व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मुख्य टपाल निरीक्षक, प्रधान टपाल अकोला, मूर्तीजापूरचे तहसीलदार, टपाल निर्देशक यांच्याकडे तक्रारी करून उपविभागीय कार्यालयावर नुकताच मोर्चा नेऊन निवेदनाद्वारे टपाल सेवेबाबत होत असलेली कुचंबना थांबविण्याची विनंती केली आहे.
शासकीय-निमशासकीय व खाजगी कार्यालयांची महत्त्वाची कागदपत्रे प्रश्नमुख्याने टपाल सेवेच्या माध्यमातूनच पाठविली जातात. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या नोकरी संदर्भातील पत्रव्यवहार-मुलाखतपत्रे यासाठी टपाल सेवेवरच अवलंबून राहावे लागते. मात्र टपालसेवेच्या अनियमिततेमुळे अनेकांना फटका बसतो. येथील रेल्वे वसाहतीमध्ये तर पोस्टमनचे दर्शन आठ-आठ दिवस होतच नसल्याच्या तक्रारी आहेत. पोस्टमास्तरांना विचारणा केल्यास कर्मचारीच कमी आहेत, असे सांगून असमर्थता व्यक्त करीत बोळवण केल्या जाते, असेही काही युवक सांगतात.
अनंत बोरकर, गणेश बयस, राहुल शिंदे, प्रवीण मोरे, अमोल नाईक, महेंद्र बलखंडे, विनोद पुडंगे, प्रवीण डोंगरे, योगेश गायकवाड, अन्सार शेख, हेमंत पोतुलकर, नितीन गायकवाड, प्रमोद चनाल, रवी उईके, प्रवीण पोळकर, कुणाल कैथवास, विशाल पोतुलकर, प्रवीण मल्लेश्वर आदी रेल्वे विभाग निवासी युवकांनी टपाल विभागाच्या वरिष्ठाधिकाऱ्यांना सुशिक्षित बेरोजगार तसेच मूर्तीजापूर नागरिकांची टपाल सेवेच्या अनियमिततेतून होणारी कुचंबणा थांबविण्याची मागणी केली आहे.