Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
जोपर्यंत पाणी जपून वापरायची सवय लागत नाही तोपर्यंत कितीही पाणी साठवलं तरी ते कमीच पडणार! ३० टक्के, ४० टक्के पाणीकपात असेल तेव्हा लोक निमूटपणे कमीत कमी पाणी वापरतातच की, पण ते कायमस्वरूपी सवय म्हणून होत नाही. (जसं १० दिवसांच्या ऐवजी ‘चार दिवसांत प्रश्नेजेक्ट पूर्ण करा’ असं सांगितलं गेलं असतं तर आम्ही ते केलंच असतं. पण जेव्हा १० दिवसांचा अवधी असेल तेव्हा कुणीच आटापिटा करून चार दिवसांत ते पूर्ण करणार नाही) आधीच पाणी वाट्टेल तसं वापरायची, वाया घालवायची सगळ्यांना सवय आहे. त्यात अजून पावसाचं पाणी साठवलं तर काय ‘भरपूर पाणी आहे’ म्हणून लोकं पुन्हा त्याची उधळपट्टीच जास्त करतील.
कीर्ती
शेवटी ९०:१०च्या जोडीला आपली कमाल दाखवायची संधी मिळालीच नाही. म्हणजे आता आमचं भाकित खरं ठरणार..

 

इजा-बिजाची वाट लागली, आता पुढच्या वर्षी कुठला तिजा शोधतात ते बघायचं!
दरम्यान शाळेत आमची युनिट टेस्ट पार पडली. पाठोपाठ दरवर्षीप्रमाणे पावसावरचा एक निबंध आम्हाला लिहायला सांगण्यात आलेला आहे. आजकाल पावसाळा ‘नेमेचि’ येईनासा झालाय पण या निबंधाचा मात्र नेम काही चुकत नाही. तसा या वेळेला अगदीच निबंध एके निबंध लिहायचा नाहीये म्हणा.. आम्हाला समाजशास्त्राचा एक प्रश्नेजेक्ट करायचाय-‘पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल’ या विषयावर आणि त्याचाच एक भाग म्हणून तो निबंध लिहायचा आहे.
आचरेकर बाईंनी वर्गात प्रश्नेजेक्टचा हा विषय जाहीर केल्यावर प्रज्ञा बधीर चेहऱ्यानं आमच्याकडे बघायला लागली. तिला त्याचा अर्थच कळला नाही.
‘अगं, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंऽऽग..’ तिला मागच्या बेंचवरून मराठी अस्मितानं इतक्या जोरात सांगितलं की ते अख्ख्या वर्गाला ऐकू गेलं.. आणि बाईंना सुद्धा!
मग काय, प्रश्नेजेक्टचा मूळ विषय राहिला बाजूला आणि बाईंनी आमचं बौद्धिक घ्यायलाच सुरुवात केली-आजकालच्या पिढीला इंग्रजीचा अट्टाहासच कसा असतो, मराठी बोलायची तुम्हाला लाजच का वाटावी वगैरे वगैरे! बोलता बोलता बाई मध्येच मराठी अस्मिताकडे बघून आणि तिलाच उद्देशून एक-दोन वाक्यं बोलायच्या. ती तरी नेमकी आचरेकर बाईंच्याच तावडीत कशी सापडते नेहमी कोण जाणे! तिचा चेहरा बघूनच आम्हाला जाम हसू येत होतं..
शेवटी तास संपला पण बाईंची लेक्चरबाजी संपली नाही. दहा दिवसांत प्रश्नेजेक्ट पूर्ण करायचाय असं जाहीर करून बाई निघून गेल्या.
खरं म्हणजे, ‘पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग’ यापेक्षा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हे ऐकल्यावरच प्रश्नेजेक्टचा विषय पूर्णपणे लक्षात आला आमच्या.. आता याला आम्ही तरी काय करणार? आजकाल हे असेच तर शब्दप्रयोग सतत कानावर पडत असतात! मी शंभर टक्के सांगू शकते-बाईंनीही त्यांच्या नोट्समध्ये आधी तसंच लिहून घेतलं असणार; आम्हाला सांगताना मात्र मराठीत भाषांतर करून सांगितलं आणि वर भाषणही दिलं!
आधी प्रश्नेजेक्ट वगैरे म्हटलं की मला टेन्शनच यायचं. त्यात नक्की काय काय करायचं असतं तेच माहीत नव्हतं. मागच्या वर्षी ‘ऊर्जेची बचत’ या विषयावर आम्ही केलं होतं ते आमचा आयुष्यातला पहिलावहिला प्रश्नेजेक्ट. ‘प्रश्नेजेक्ट म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं काम’ असंच वाटायचं तोपर्यंत; पण आता नाही. आता याच प्रश्नेजेक्टचं बघा ना-निबंध लिहायचाय, तो तर झालाच; शिवाय पेपरमधली बारा-पंधरा कात्रणं चिकटवायची.. (पेपरमध्ये आठवडय़ातून एकदा पर्यावरणाशी संबंधित एक सदर येतं-मला बघितल्याचं आठवतंय. त्यात या विषयावर कधी ना कधीतरी नक्की काहीतरी आलेलं असणार); शिवाय चार-पाच आकृत्या काढायच्या.. अशी आठ-दहा पानं भरली की सगळं जरा रंगरंगोटी करून सुशोभित करायचं की झालं! आहे काय अन् नाही काय! त्यालाच प्रश्नेजेक्ट-प्रेझेंटेशन म्हणतात असं सुजीच्या दादानं आम्हाला एकदा सांगितलं होतं. परीक्षेत काही मार्क्स त्याच्यासाठीही राखून ठेवलेले असतात म्हणे.)
प्रेझेंटेशनवरून आठवलं-प्रश्नेजेक्टची रंगरंगोटी करावी तर ती प्रज्ञानं! त्या बाबतीत मात्र तिचं डोकं अफलातून चालतं! तिचं ड्रॉईंग असलं सॉल्लिड आहे ना की काय सांगू! तिनं काढलेली चित्रं, आकृत्या केवळ अफ्फाट असतात! त्यासमोर आमच्या चित्रकलेच्या वह्य़ा किंवा सायन्सची जर्नल्स म्हणजे अगदीच लिंबूटिंबू वाटतात. त्यात माझा नंबर तर पहिला! माझी चित्रकलेची वगैरे सगळी बोंब आहे!! चित्रकलेच्या पेपरलाही माझी गाडी कशीबशी ५०-५५ मार्कापर्यंत पोहोचते! आता या प्रश्नेजेक्टसाठीही प्रज्ञाकडूनच काहीतरी आयडिया घ्यायला पाहिजे.
पण प्रेझेंटेशन वगैरे सगळं नंतर, आधी आज अभ्यास झाल्यावर रद्दी काढून जुने पेपर धुंडाळले पाहिजेत. कीर्ती मॅडम, चला, कामाला लागा!
आजकाल मी पेपरमध्ये डोकं घालून बसलेली दिसले की बाबा लगेच ओळखतात की शाळेतून काहीतरी काम मिळालेलं आहे! आई तर आताशा मला विचारल्याशिवाय रद्दीही देत नाही! तेव्हा, आज दुपारपासून ‘ऑपरेशन कात्रणं!!’
सुजाता
माझ्या दादाचं तर मला काही कळतच नाही! इतर वेळेला इतका माझ्याशी भांडत असतो, कॉलेजगिरी गाजवत असतो, पण परवा आम्हाला प्रश्नेजेक्ट करायचा हे कळल्यावर मला किती मदत केली त्यानं! रात्रीचा त्याचा कॉम्प्युटर टाइम त्यानं चक्क मला देऊ केला. नेटवरून माहिती शोधून देतो म्हणाला, ती माहिती तशी मलाही शोधता आली असती म्हणा- ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हे शब्द गुगलायचे की झालं! (हा दादाचाच शब्द आहे. गुगल सर्च करण्याला तो नुसतं गुगलणं म्हणतो!) पण म्हटलं, कधी नव्हे ते दादासाहेब मदत करायचं म्हणतात तर करू देत. मी नुसती त्याच्या शेजारी बसून राहिले. अध्र्या तासात त्यानं भराभर माहिती गोळा केली. त्याची पीडीएफ फाईल बनवली. पेन ड्राईव्हवर कॉपी केली आणि दुसऱ्या दिवशी प्रिंटआऊटस् काढून आणण्यासाठी म्हणून पेन ड्राईव्ह चक्क माझ्या ताब्यात दिला. (इतर वेळेला त्याच्या सॅकमधल्या साध्या पेन्सिलीलाही तो मला हात लावू देत नाही) दादात हा असा अचानक बदल कसा घडला याचा शोध घेतला पाहिजे..
या प्रिंट आऊटस्पैकी काही ‘की’ला द्यायच्या आहेत. तिच्या घरी नेट कनेक्शन नाहीये. मग मी तिला म्हटलं की, मी देईन म्हणून. तिनंही जुन्या पेपरमधली बरीच माहिती शोधून ठेवली आहे. (आचरेकरबाईंच्या तासाला प्रिंट आऊटस्, नेट कनेक्शन आणि पेपर यांच्या जागी छापील प्रती, महाजाल जोडणी आणि वर्तमानपत्र असे शब्द टाकून ही वाक्यं बोलावी लागतील.)
तरी अजून त्या निबंधाचं लफडं आहेच! दादा दहावीत असताना त्याच्या सरावासाठी आईनं एक मराठी निबंधाचं पुस्तक आणलं होतं. ते तिनं अजून जपून ठेवलंय. मला त्याचा अनेकदा उपयोग होतो. सोमवारी तेच पुस्तक आणि प्रिंट आऊटस् घेऊन मी संध्याकाळी ‘की’च्या घरी गेले. पण त्या पुस्तकात या विषयावर फारसं काही सापडलं नाही आम्हाला. (कदाचित दादा दहावीला असताना म्हणजे तीन-चार वर्षापूर्वी पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा याची कुणालाच गरज वाटली नसेल किंवा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचायला हवा असं कुणाला वाटलंच नसेल!!) ‘पुस्तकाची मदत हवी कशाला? पावसाच्या पाण्याचा उपयोग आणि एकंदरच पाण्याची बचत यावर तुम्हीच विचार करा ना जरा..’ सविता मावशीनं (म्हणजे ‘की’च्या आईनं) सुचवलं. हे बाकी खरंय. कुठलंही प्रश्नेजेक्ट करताना विद्यार्थ्यांनी त्या विषयावर स्वत: विचार करणं अपेक्षित असतं असं आचरेकरबाईंनी त्यांच्या अगणित भाषणांपैकी एकात आम्हाला सांगितल्याचं मलाही आठवतंय! (‘जागतिक बदलाचे वारे’वर पण आम्ही असाच आमचा आम्ही विचार नव्हता का केला. पण आता निव्वळ टिंगल करून चालणार नाही. प्रश्न प्रश्नेजेक्टचा आहे!)
इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीत घरांच्या छपरांवर, इमारतीच्या गच्च्यांवर पडणारं पावसाचं पाणी साठवण्याचे किती तरी सोपे सोपे उपाय सांगितलेले आहेत. मोठय़ा शहरात आता नव्यानं उभारण्यात येणाऱ्या इमारतीत पावसाचं पाणी साठवण्याची सोय अनिवार्य करण्यात आली आहे असंही ‘की’नं काढलेल्या कात्रणात लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे लोक आपापल्या घरात, इमारतीत कदाचित करतीलही तशा सोयी. पण जोपर्यंत पाणी जपून वापरायची सवय लागत नाही तोपर्यंत कितीही पाणी साठवलं तरी ते कमीच पडणार! ३० टक्के, ४० टक्के पाणीकपात असेल तेव्हा लोक निमूटपणे कमीत कमी पाणी वापरतातच की, पण ते कायमस्वरूपी सवय म्हणून होत नाही. (जसं १० दिवसांच्या ऐवजी ‘चार दिवसांत प्रश्नेजेक्ट पूर्ण करा’ असं सांगितलं गेलं असतं तर आम्ही ते केलंच असतं. पण जेव्हा १० दिवसांचा अवधी असेल तेव्हा कुणीच आटापिटा करून चार दिवसांत ते पूर्ण करणार नाही) आधीच पाणी वाट्टेल तसं वापरायची, वाया घालवायची सगळ्यांना सवय आहे. त्यात अजून पावसाचं पाणी साठवलं तर काय ‘भरपूर पाणी आहे’ म्हणून लोकं पुन्हा त्याची उधळपट्टीच जास्त करतील. हे सगळं मी एका दमात सवितामावशीला बोलून दाखवलं. तशी ‘की’ माझ्याकडे डोळे विस्फारून बघायला लागली. माझ्याच नकळत मी त्या विषयावर विचार करायला लागले होते हे मलाही एकदम जाणवलं!
‘हॅलोऽऽ! तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना?’ कीचे डोळे अजूनही विस्फारलेलेच होते.
‘..हे सगळं तू त्या निबंधात लिहिणार आहेस की काय? मग मराठी अस्मितेला सोडून आचरेकरबाई तुला पकडतील. बघ हं.’ रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी गच्चीवर पोहोचलेल्या मला तिनं धाडकन जमिनीवर आणलं!
सवितामावशी मात्र माझ्याकडे कौतुकानं पाहत होती.
‘सुजे गधडे! आमच्या माताजीवर तू एकदम जोरदार इंप मारलंस हं!’
‘गप्प गं! तसलं काही नाही आणि अशी डोळे फाडून बघू नकोस माझ्याकडे, तुला कुठले कुठले प्रिंट आऊटस् हवे आहेत ते काढून घे यातून..’ मी ‘की’च्या त्या वाक्याकडे दुर्लक्ष करीत तिला म्हटलं. पण आचरेकरबाईंवरून तिनं केलेला विनोद मात्र खरा होता. त्यात पुन्हा आमच्या दोघींच्या प्रश्नेजेक्टच्या मजकुरात थोडंही साम्य दिसता कामा नये बाईंना. नाही तर लगेच ‘एकमेकींचं कॉपी केलंत का?’ म्हणून खडसावतील. (इंग्रजी शब्द वापरावरून आम्हाला बोलताना स्वत: ते वापरू नयेत हे मात्र लक्षात येत नाही त्यांच्या) ‘की’कडून त्या दिवशी घरी परत यायला तसा उशीरच झाला मला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तोंड धुताना आपसूकच बेसिनचा नळ रोजच्यापेक्षा हळू सोडला गेला. हे तीन-चार दिवस होईल. कदाचित प्रश्नेजेक्ट सबमिट करेपर्यंत.. पण नंतर? पाण्याच्या बचतीची कायम स्वरूपी सवय लावून घेणं जमेल..?? ’
p.pacpac@gmail.com