Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

ओपन फोरम
स्टायलिश आणि स्मार्ट कपडय़ांबरोबरच त्याला सूट होणाऱ्या बॅगा व पर्स यंगस्टर्सच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनल्या आहेत. या बॅगा आणि पर्स खूप वेगवेगळ्या रंगांत व आकारांमध्ये मिळतात. काय असतं या पर्स आणि बॅगांमध्ये?

बॅग / पर्स मध्ये काय असतं?
अवधूत साळुंखे (हॉटेल मॅनेजमेंट)
माझ्या बॅगेत किचनकीट असतं कारण मी हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. अॅप्रन, अनेक प्रकारच्या सुऱ्या,

 

जर्नल याच गोष्टींचं वजन इतकं असतं की, मला माझ्या आवडीच्या वस्तू म्हणजे कंगवा, जेल, क्रीम वगैरे बॅगेत ठेवताच येत नाहीत. त्यामुळे या गोष्टी मी कधीतरी मित्रांकडून घेतो. पण हल्ली मुलांच्या बॅगेत याहीपेक्षा जास्त वस्तू असतात.

जितेंद्र जाधव (इव्हेंट मॅनेजमेंट)
मुलांकडे बॅग असलेली मी कधीच पाहिलेली नाही. आम्हाला त्याची गरज भासत नाही. कॉलेजमध्ये असताना मी एकदाही बॅग घेतली नाही. उलट माझ्या वह्य़ा, पुस्तकं मी मित्रांच्या किंवा मैत्रिणींच्या बॅगेत ठेवायचो. पण माझ्या मैत्रिणींच्या बॅगेत मात्र सनस्क्रीनपासून स्कार्फपर्यंत खूप गोष्टी असतात.

सोनू कवाड(मॉडेल.)
मी राहते जोगेश्वरीला आणि कामानिमित्ताने टाऊनमध्ये जाते. त्यामुळे माझ्या बॅगेत खाण्याचे सामान असतं. मला बाहेरचं खायला आवडत नाही. पाण्याची मोठी बाटली तर असतेच. शिवाय मला टेडी बेअर आणि चॉकलेट्स आवडतात. तेही माझ्या बॅगेत असतात.

मीनल असुर्लेकर (एस.वाय.बी.एस.सी.)
सगळ्यांचा असा गैरसमज असतो की मुलींच्या बॅगेत फक्त मेकअपचं सामान असतं. पण मुलांच्याही बॅगेत बऱ्याच गोष्टी असतात. मला वाचनाची फार आवड आहे. त्यामुळे नेहमी माझ्या बॅगेत पुस्तकं असतात. मी झपाटल्यासारखी पुस्तकं वाचते.

अंकिता हिरे (एस.वाय.जेसी.)
खरं तर माझ्या बॅगेत माझा सगळा संसारच असतो. मला वेगवेगळ्या प्रकारचे कानातले, अँकलेट्स घालायला आवडतात. त्याचे बरेच प्रकार माझ्या बॅगेत असतात. तसंच मेकअपचं सामान, डिओ क्वचित कधीतरी एखादा टी-शर्टही असतो. पावसाळ्याच्या दिवसांत तर हे सगळं असायलाच हवं! मेकअप ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं.