Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..

माझी मैत्रीण, अंजली, फारच उदास होती. तिचा बॉस तिला वर जायला, तिची प्रगती व्हायला वाव देत नव्हता. त्या बॉसला स्वत:चं कौतुक झालेलं फार आवडायचं. अंजलीचे सगळे सहकारी त्याच्या बॉसवर अक्षरश: स्तुतिसुमनं उधळायचे. पण तो इतक्या लायकीचा आहे असं अंजलीला वाटायचं नाही. त्यामुळे ती त्याचं कधीच कौतुक करायची नाही. आता, जरी अंजली उच्चशिक्षित, अनुभवी असली तरी तिच्या चांगल्या कामाचं श्रेय तिला कधीच मिळत नव्हतं. तिच्या प्रमोशनने तिला हुलकावणी दिली होती आणि बॉससोबत घातलेले वाद तिला संकटात टाकत होते.
मी तिला म्हणालो, ‘एखादी हवी असलेली गोष्ट मिळवणं म्हणजे योग्य वेळी योग्य संवाद साधण्याची कला! कोल्हा आणि कावळ्याच्या गोष्टीची आठवण मी तिला करून दिली. कावळ्याच्या चोचीत पोळीचा तुकडा असतो. तो कावळा झाडावर बसलेला असतो. खालून जाणाऱ्या एका कोल्ह्य़ाला ती पोळी हवी असते. कोल्हा कावळ्याला म्हणतो- ‘तू किती सुंदर पक्षी

 

आहेस! तुझा आवाजपण तितकाच सुंदर असला पाहिजे..’ कावळा गाण्यासाठी लगेच चोच उघडतो आणि पोळीचा तुकडा खाली पडतो. कोल्ह्य़ाला जे हवं असतं ते मिळतं. मी म्हणालो आयुष्यात तुम्हाला जे काही हवं असतं ते मिळवण्यासाठी उत्तम संवाद साधण्याची कला अवगत केली पाहिजे.’ अंजलीने या गोष्टीला विरोध केला, ‘हे खूप खोटं आणि नाटकी वाटतं. आपण का सरळ बोलू शकत नाही? लोकं का जबाबदारीने वागत नाहीत? ज्यांना जे करायचंय ते करू दे. गोष्टी अशा फिरवून फिरवून बोलल्याच पाहिजेत?’
मी तिला विचारलं, ‘समजा, एखाद्या मुलाने ट्रेनच्या गर्दीत किंवा ऑफिसला जाण्याच्या घाईगडबडीत किंवा क्रिकेट खेळायला जाण्याच्या अवतारात तुला लग्नाची मागणी घातली तर तुला आवडेल? की याउलट तुम्ही दोघंही एखाद्या सुंदर बागेत किंवा समुद्रकिनाऱ्यावर, रोमँटिक वातावरणात बसला असाल, दोघंही खूप छान दिसत असाल तेव्हा मागणी घातली तर आवडेल??’
तुम्ही काय बोलता हेच फक्त महत्त्वाचं नसतं. तुम्ही कसं बोलता यालाही खूप महत्त्व आहे. एक माणूस एका पुजाऱ्याकडे जातो आणि विचारतो, ‘प्रश्नर्थना म्हणताना मी दारू, सिगरेट घेतली तर चालेल?’ पुजारी भडकतो आणि त्याला खूप बोलतो. त्या माणसाच्या मित्राला हे कळतं आणि तो प्रश्न कसा विचारावा ते दाखवतो. अत्यंत नम्र आवाजात तो मित्र पुजाऱ्याला म्हणतो, ‘मी सिगरेट ओढताना किंवा दारू पिताना देवाशी बोललं तर चालेल ना?’ तो पुजारी लगेच म्हणतो, ‘देव सर्वव्यापी आहे. देवाला आपली प्रश्नर्थना हवी असते-कधीही आणि कुठेही!’
घरी, बिल्डिंगमध्ये अथवा ऑफिसमध्ये, तुम्हाला हवं ते मिळवण्याची किल्ली म्हणजे संवाद! हे कष्ट करण्याची किंवा त्यासाठी वेळ काढण्याची लाज बाळगू नका, त्यासाठी नाखूश राहू नका आणि आळशीपणाही करू नका, नोकरीसाठी इंटरव्ह्य़ू द्यायला जातो तेव्हा आपण व्यवस्थित कपडे घालतो, वेळेवर जातो आणि नीट बोलतो. का? कारण ती नोकरी आपल्याला हवी असते. नोकरी मिळाल्यावर व्यवस्थित राहण्यापासून आणि चांगल्या सवयी बाळगण्यापासून तुम्हाला काय रोकतं?
शेक्सपियरने म्हटलंय ना, ‘आयुष्य एक रंगमंच आहे. आणि आपण सगळे त्यावरचे नट.’ वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे भाग आपल्याला सादर करावेच लागतात. त्यामुळे त्या त्या ‘सीन’प्रमाणे योग्य ते कपडे घाला, तुमचा रंगमंच नीट तयार करून ठेवा आणि योग्य वेळी योग्य संवाद साधा. मग एक ‘स्टार’ बनायला आणि कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघायला तयार राहा!!
डॉमिनिक कोस्टाबीर
अनुवाद-यशोदा लाटकर
dominiccostabir@yahoo.com