Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

स्मार्ट बाय
हर्षेज चॉकलेट सिरप

हर्षेजने चॉकलेट सिरप बाजारात आणले आहे. आईस्क्रिम, केक, कुकीज, फळं, फ्रुट सॅलड, मॉकटेल्स अशा कोणत्याही पदार्थावर हे सिरप घालून त्याची लज्जत वाढवता येईल. ४०० व ६० ग्रॅमच्या पॅकमध्ये हे सिरप उपलब्ध आहे.

कॅम्लिनचे बॉल पेन

 

कॅम्लिनने लिझो हे बॉल पेन बाजारात आणले आहे. पाच रुपये किंमतीत हे पेन बाजारात उपलब्ध आहेत.

कर्ल ऑन
कर्ल ऑनने लक्झरी मालिके अंतर्गत मॅट्रेसेस आणि पिलो बाजारात आणल्या आहेत. सहा वेगवेगळ्या प्रकारात ही उत्पादने उपलब्ध आहेत. या मॅट्रेस मेमरी फोम, लॅटेक्स, स्प्रिंग आणि रबराईझ्ड कॉयर यासारख्या नाविन्यपूर्ण साहित्याने तयार करण्यात आल्या आहेत.

अॅलर्गन
अॅलर्गन इंडियाने डर्मल फिल्टर बाजारात आणले आहेत. चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी या फिल्टरचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हे उपकरण ब्युटी क्लिनिकमध्ये वापरलं जातं. डर्मल फिल्टरच्या उद्घाटनाला माजी जगत्सुंदरी डायना हेडन उपस्थित होती. वाढत्या वयाबरोबर पुरुष व स्त्रियांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढत जातात. डोळ्याखालची त्वचा, गाल, ओठ हे सैल होत जातात.पस्तिशी-चाळिशीपासूनच त्वचेतील हा बदल जाणवू लागतो. यावरच उपाय म्हणून हे उपकरण फिजिशीअन कडून वापरले जाते. जुवेडर्म अल्ट्रा आणि अल्ट्रा प्लस असे दोन प्रकार यात उपलब्ध आहेत.

शॉपर्स स्टॉपमध्ये ‘लव आज कल’!!
दोन नशीबवान विजेत्यांना लव आज कल मध्ये सैफ आणि दीपिकाचे ओरिजिनल ड्रेस मिळण्याची ऑफर शॉपर्स स्टॉपने आणली आहे. आय जीन्स वेअर व हॉट करी या कंपन्यांचे ३००० रुपयांपर्यंतच कपडे खरेदी केल्यास लव आज कलची सीडी मोफत मिळण्याची ऑफरही यात समाविष्ट आहे.