Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग

‘श्यामराव विठ्ठल’,‘अपना’ ठरल्या सवरेत्कृष्ट सहकारी बँका
व्यापार प्रतिनिधी: श्यामराव विठ्ठल सहकारी बँक लि. ही बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘सवरेत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ ठरली. रुपये १००० कोटींच्या खालील खेळते भांडवल असलेल्या गटात सलग तिसऱ्यांदा अपना सहकारी बँकेने सवरेत्कृष्टतेचा पुरस्कार पटकावला आहे. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन ही, मुंबईतील नागरी सहकारी बँकांची संघटना असून दरवर्षी, नागरी सहकारी बँकांचे वार्षिक अहवाल आणि वर्षातील प्रगतीच्या वाटचालीसंबंधी स्पर्धा घेण्यात येते. चार्टर्ड अकौंटंट, एस. एस. राणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे नागरी बँक विभागाचे व्यवस्थापक के. के. कापसे आणि मुंबै बँकेचे मुख्याधिकारी पाटणकर यांच्या निवड समितीने निवड केलेल्या बँकांना ३१ जुलै, २००९ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असोसिएशनचे अध्यक्ष नागेश फोवकार यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

जकातविरोधात व्यापाऱ्यांचे राज्यभर आंदोलन
रविवारपासून व्यापारी वाहतूक बेमुदत बंद

व्यापार प्रतिनिधी: राज्यातील जकातीविरुद्ध र्सवकष लढा म्हणून व्यापारी व वाहतूकदारांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाला प्रश्नरंभ करण्यात येणार आहे. या आंदोलनांतर्गत उद्यापासून राज्यातील ड वर्ग महापालिका क्षेत्रातील व्यापारी व वाहतूकदार काळ्या फिती लावून आंदोलनाला प्रश्नरंभ करणार असून टप्प्याटप्प्याने व्याप्ती वाढविण्यात येणाऱ्या या आंदोलनामध्ये राज्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर १९ ऑगस्ट रोजी व्यापारी व वाहतूकदारांचे प्रतिनिधी मुंबईत मंत्रालयासमोर आत्मदहनाने या आंदोलनाचा शेवट करतील असा इशारा देण्यात आला आहे.

यंदाच्या २६ व्या ‘आयआयजेएस’ प्रदर्शनाला विक्रमी गर्दी अपेक्षित
व्यापार प्रतिनिधी: आशिया खंडातील सर्वात मोठय़ा आभूषणांचे प्रदर्शन म्हणून ख्याती असलेल्या २६ व्या ‘इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो’चे गोरेगाव येथील एनएसई संकुलात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष वसंत मेहता यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटीही दिल्या. भारतासह दुबई, इस्रायल, तुर्कस्तान, थायलंड, बेल्जियम, इटली या देशातील ७०४ प्रदर्शकांचे १५५३ स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले असून, तयार आभूषणे, मौल्यवान रत्न, खडे, पूरक सामग्री व मशिनरी या ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात लोकांना पाहता येईल.

आभूषणांचा असाही विक्रम!
‘आयआयजेएस’ या आभूषणांच्या प्रदर्शनात कोलकात्याच्या ‘श्री गणेश ज्वेलरी’ कंपनीने जागतिक विक्रम म्हणून नोंद झालेले काही खास दागिने प्रस्तुत केले आहेत. त्यात पाच फूट लांबीचे व साडे सहा किलो वजनाचे २२ कॅरेटचे गळ्यातील नेकलेस, दीड किलो वजनाच्या सँडल्स, ८०० गॅ्रम वजनाची सोन्याची कॉलर व टाय आदींचा समावेश आहे. येत्या ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात ही व अन्य वैशिष्टय़पूर्ण आभूषणे लोकांना पाहता येतील.

‘टीबीझेड’चा
‘बँगल व चेन’ महोत्सव

व्यापार प्रतिनिधी: त्रिभुवनदास भीमजी झवेरी अर्थात ‘टीबीझेड- द ओरिजिनल’ या सर्वात जुन्या जवाहिराच्या ब्रॅण्डने येऊ घातलेल्या लग्न हंगामासाठी ग्राहकांच्या सुसज्जतेला साजेशा ठरेल असा ‘बँगल आणि चेन फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या विक्री महोत्सवात सहभागी होणाऱ्या ग्राहकांना खरेदीसोबत मिळणाऱ्या स्क्रॅच कार्डद्वारे १०० टक्के खरेदी रक्कम परत मिळविण्याची (कॅश बॅक) संधीही प्रदान करण्यात आली आहे. भारतीय परंपरेत हातातील कंकण आणि गळ्यातील आभूषणांच्या विविध प्रकारांबाबत खास आकर्षण राहिले आहे, हे जाणूनच या महोत्सवात अशा सोन्याच्या दागिन्यांचे खास कलेक्शन प्रस्तुत केले जाणार आहे. टीबीझे- द ओरिजिनलच्या झवेरी बाजार, बोरिवली, सांताक्रुझ, घाटकोपर आणि ठाणे येथील शोरूम्समध्ये हा विक्री महोत्सव सुरू राहणार आहे.

मर्केटोर लाइन्सची भरीव कामगिरी
व्यापार प्रतिनिधी:
जहाज वाहतूक उद्योगातील खासगी क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी मर्केटोर लाईन्स लि. ने जून ०९ रोजी संपलेल्या तिमाहीत भरीव कामगिरी केली आहे. या काळात कंपनीचे उत्पन्न ४९३ कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न नऊ टक्क्यांनी कमी आहे.
मात्र कंपनीचा एकूण नफा सात टक्क्यांनी वधारुन २१९ कोटी रुपये झाले. या तिमाहीत कंपनीने काही मोठय़ा बल्क कॅरियरचे रुपांतर अन्य कॅरियरमध्ये करुन त्याचा ताबा आपल्या सिंगापूरच्या उपकंपनीकडे दिला. त्याचबरोबर कंपनीने पॅनॅमॅक्स जहाज घेतले. गेल्या १८ महिन्यांत कंपनीने खनिज तेल व वायू उत्खनन क्षेत्रात पाऊल टाकून यातील प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.

मिरॅ अॅसेटला ‘एशियन इन्व्हेस्टर’तर्फे सर्वोत्तम फंड हाऊस पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी:
सेऊल स्थित मिरॅ अॅसेट ग्लोबल फंड हाऊसला ‘एमर्जिग मार्केट इक्विटी’ व ‘बेस्ट कोरिया ऑनशोअर फंड हाऊस’ अशा दोन गटांत सर्वोत्तम फंड म्हणून पुरस्कार देण्यात आले आहेत. ‘एशियन इन्व्हेस्टर’ या मॅगझिनतर्फे अलीकडेच हे पुरस्कार देऊन मिरॅ अॅसेटचा गौरव करण्यात आला आहे. मिरॅ अॅसेटला हे पुरस्कार अलीकडेच कोरियात फंड व्यवस्थापनासाठी संपन्न झालेल्या ‘२००९ इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स अॅवॉर्ड’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रदान करण्यात आले आहेत. मिरॅ अॅसेट ग्लोबल इन्व्हेस्टमेंट (इंडिया) प्रश्न. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम घोष या पुरस्काराबाबत भाष्य करताना म्हणाले, ‘‘आमच्या निष्णांत गुंतवणूक कौशल्याची भारतात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. मिरॅ अॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंड आणि मिरॅ अॅसेट ग्लोबल कमोडिटी स्टॉक फंड या दोन्ही योजनांनी उत्तम कामगिरी करून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

‘ब्रिजस्टोन इंडिया’ची विस्तार योजना
व्यापार प्रतिनिधी:
टायर आणि रबर उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या ‘ब्रिजस्टोन इंडिया’ कंपनीने व्यवसाय विस्तार योजना जाहीर केली आहे. कंपनीच्या इंदूर येथील कारखान्यात २५९ कोटी रुपयांची गुंतवणूक करून, दर दिवशी ४५०० टायर्सचे अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीची उत्पादन क्षमता ४० टक्क्यांनी वाढणार असून, ३०० जणांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. ही माहिती कंपनीच्या व्यापार आणि रोजगार विभागाचे प्रधान सचिव सत्य प्रकाश यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

एगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सकडून ४५ कोटींची भांडवलवृद्धी
व्यापार प्रतिनिधी:
एगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सच्या प्रवर्तकांनी कंपनीच्या भांडवलामध्ये ४५ कोटी रुपयांची अतिरिक्त भर घातली आहे. यामुळे २७ जुलै २००९च्या आकडेवारीनुसार कंपनीचे एकूण भांडवल ३९५ कोटी रुपये झाले आहे. या आर्थिक वर्षामध्ये जो भांडवल विस्तार केला गेला तो एकूण ९५ कोटी रुपयांचा असून त्यात नुकत्याच टाकण्यात आलेल्या भांडवलाचाही समावेश आहे. एगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सच्या २००९-२०१० या आर्थिक वर्षासाठीच्या धोरणानुसार वितरण उभारणीसाठी हा विस्तार केला गेला आहे. अतिरिक्त भांडवल गुंतवणूक ही आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आलेली असून ती रेलिगेअर, एगॉन आणि बेनेट, कोलेमन अॅण्ड कंपनी लिमिटेड यांच्यातील अनुक्रमे ४४:२६:३० या गुणोत्तरामध्ये आहे. कंपनीने आतापर्यंत ३० हजार ग्राहक आणि ७० कोटी रुपयांपेक्षाही अधिक एपीई आपल्याकडे आकर्षित केले आहेत. एगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सकडे असलेली सर्वच उत्पादने ही या क्षेत्रातील सर्वोत्तम आणि सर्वात स्पर्धात्मक अशीच आहेत. कंपनीकडे संपूर्ण उत्पादनांचा गुच्छ असून त्यात ३ मुदत योजना, २ युलिप्स, एक पेन्शन योजना आणि एक मुलांची योजना आहे. आमच्या ग्राहकांपैकी ३० टक्के ग्राहकांनी (मे २००९) एगॉन रेलिगेअर पेन्शन योजना घेतली असून ती जानेवारी २००९ मध्ये दाखल झाली होती. आर्थिक वर्ष २०१० मध्ये कंपनीची कित्येक नवीन उत्पादने दाखल करण्याची योजना असून ती आरोग्य आणि अॅन्युईटी उत्पादन क्षेत्रात उतरणार आहे.