Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

‘वर्कशॉप्स इनकॉर्पोरेटेड’
प्रतिनिधी

मल्हार हा मुंबईमधील आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हल्समधील सवरेत्कृष्ट फेस्टिव्हल आहे. तीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा फेस्टिव्हल सर्व ‘झेवियराइटस्’ची शान आहे. ‘मल्हार फेस्ट’मध्ये दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम आणण्याचा प्रयत्न करत असतो. मल्हारच्या कामगिरीत एकूण २० विभाग असतात. त्यातील सर्वात अलीकेड सुरू झालेला विभाग म्हणजे ‘वर्कशॉप्स इनकॉर्पोरेटेड’ म्हणजेच ‘व्हिंक.’ सात वर्षापूर्वी सुरू झालेला हा विभाग प्रेक्षकांसमोर ‘मल्हार’ची एक नवीन बाजू मांडतो.

अद्वितीय कैलास मानस
‘कैलासराणा शिवचंद्रमौळी। फणिंद्रमाथा मुकुटी झळाळी’.. अशी आपण शिवाची स्तुती करतो. ‘कैलास’तर शिवाचे निवासस्थान. अशा त्या अद्वितीय शक्तिरूप ‘कैलास-मानस’विषयी.. तसे पाहिले तर ‘कैलास-मानस’ परिक्रमा खूपच दुर्लभ आणि दुर्गम आहे. कैलासाचे नाव ऐकताच मनातील अपार भक्तीच शक्तीला पुकारते आणि असंभवत ते संभव होऊन जाते. त्यासाठी थोडी मनाची हिम्मत, थोडी असुविधांची सवय आणि थोडे नियोजन केले की ‘कैलास-मानस’ यात्रा संभव होते.

लोणार सरोवराचा वारसा जपण्याची गरज
जगात ज्या मोजक्या देशात खारट पाण्याची सरोवरे आहेत, अशांमध्ये भारताचाही समावेश होतो. भारताच्या क्षेत्रफळाचा विचार करता एकूण सरोवरांची संख्या कमी आहे. यामध्ये काश्मीर खोऱ्यातील गोड पाण्याचे दाल व वुलर तर राजस्थानमधील खारट पाण्याचे सांभर सरोवर यांचा समावेश होतो. परंतु यामध्ये सर्वाधिक कुतूहल निर्माण करणारे सरोवर म्हणजे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार सरोवर होय.

कार्बन शोषणारा रेणू
सध्या सगळीकडेच हवामान बदलाची चर्चा आहे. हरितगृह वायूंमुळे पृथ्वीचे तापमान वाढल्याने हे घडते आहे. यात कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय मानला जात आहे. ग्लोबल वॉर्मिगमुळे महासागरांतील पाण्याच्या प्रवाहांचे तापमान वाढून त्याचा परिणाम हवामानावर होतो आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवेळी हवामानविषयक परिषदेत आणाभाका घेतल्या जातात. पण प्रत्यक्षात विकसित देशांमधून सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे विकसनशील देशांपेक्षा तुलनेने अधिक आहे.

अनंत राजे :प्रतिभाशाली वास्तुरचनाकार
अहमदाबादचे प्रसिद्ध वास्तुरचनाकार व प्रश्नध्यापक अनंत दामोदर राजे यांचे अलीकडेच अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांच्या सर्जनशील कार्याचा हा घेतलेला आढावा. एकाच वेळी जीवनातील अनेक पैलूंनी जीवन समृद्ध व संपन्न करणाऱ्या अनंत राजे यांचा जन्म १९२९ मध्ये मुंबईत झाला. एक बुद्धिमान व अचूक विचारांची बैठक असलेला विचारवंत, प्रतिभाशाली वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट), एक निष्ठावान, प्रश्नमाणिक व्यावसायिक, आपली तन्मयता व तळमळ पणाला लावून मनापासून शिकविणारा प्रश्नध्यापक तसेच अत्यंत परखड, पण प्रेरक समीक्षक व एवढे असूनसुद्धा प्रसिद्धीपासून नेहमीच अलिप्त राहणारे, प्रश्नमाणिक, विनम्र असे अनंत दामोदर राजे हे भारतीय आधुनिक वास्तुकला क्षेत्रातील निष्णात व असाधारण व्यक्तिमत्त्वच होते.

अॅनिमेशनच्या क्षेत्रात जपानने बराच काळ वर्चस्व राखले होते. डिस्ने किंवा कोणत्याही अमेरिकन स्टुडिओपेक्षा अधिक प्रमाणात टीव्ही मालिका जगभरात पोहचविण्याचे कार्य जपानी अॅनिमेशनने केले. रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’वरील अनेक अॅनिमेटेड चित्रपट- मालिका आधी आल्या होत्या. त्यांची सद्दी असतानाही फुमिओ कुरोकावा यांची ५२ भागांची जंगल बुक मालिका जपानमध्येच नव्हे, तर इतर देशातही सारखीच लोकप्रिय बनली. (हीच मालिका आपण दूरदर्शनवर गुलजार यांच्या लोकप्रिय गीतासह पाहिली) ‘टारो ए ड्रॅगन बॉय’पासून गेल्या काही वर्षात लोकप्रिय झालेल्या ‘पोकेमॉन’, ‘शिनचान’ या व्यक्तिरेखा उपग्रह वाहिन्यांच्या आगमनानंतर प्रचंड वेगात घराघरात पोहोचल्या.

वेगवान कामातही आनंद
गप्पा ‘कुंकवाच्या धन्यां’शी

एखाद्या दिवशी कंटाळा आल्यास डेली सोपचा एखादा भाग पाहणे प्रेक्षक टाळू शकतात. कारण त्या भागाचे पुनप्र्रक्षेपण पाहता येते, हे त्याला माहित असते. त्यातील कलाकारांना मात्र ही मुभा नसते. रोज सकाळी नोकरदार ट्रेनमधून आपापले कार्यालय गाठतात. त्याचप्रमाणे डेली सोपमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना रोज सकाळी उठून स्टुडियो गाठावा लागतो. सर्वसामांन्यांच्या दिनक्रमाप्रमाणेच या कलाकारांचेही दैनंदिन कामकाज ठरलेले असते. झी मराठीवर सुरू झालेल्या ‘कुंकू’मधील नरसिंह किल्लेदार ही व्यक्तिरेखा साकारणारा सुनील बर्वे गप्पांच्या ओघात म्हणाला की, सामांन्यांना करावा लागतो तसा ट्रेनचा प्रवास आम्हाला करावा लागत नाही, हाच फरक असतो.

स्मिता भौमिक यांचे ‘फेसबुक’
खरगपूर येथून आयआयटी एमटेक पदवीप्रश्नप्त स्मिता भौमिक यांचे ‘फेसबुक’ हे आठवे चित्रप्रदर्शन आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील चिरंतर नाते चेहऱ्यांमधून व्यक्त करणारे हे प्रदर्शन आहे. काळाघोडा येथील आर्टिस्ट सेंटरमध्ये ९ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.

देअरफोर आय अॅम
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मीती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांचे ‘देअरफोर आय अॅम’ हे प्रदर्शन ९ ऑगस्टपर्यंत कुलाबा येथील पॉइंट ऑफ व्ह्य़ू गॅलरीत सुरू आहे. सदर प्रदर्शन हे मीनाक्षी पाटील यांचे तिसरे एकल प्रदर्शन आहे. आजची स्त्री ही शिक्षित, उच्चपदस्थ, कलावंत अशा निरनिराळ्या रुपात वावरत असली तरी ‘बाईपणाचे’ लेबल तिला कसे कायमचे चिकटलेले असते व महिलाही या लेबलचा कला अलंकारासारखा वापर करतात हा व्यंगात्मक विचार या प्रदर्शनात व्यक्त करण्यात आला आहे.
प्रतिनिधी

‘मिकी माऊस’, ‘डोनाल्ड डक’, ‘टॉम अॅण्ड जेरी’, ‘स्पायडरमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’ इथपासून ते सध्याच्या ‘डेकस्टर’, ‘शिनचॅन’ आणि ‘पॉकिमॉन’पर्यंत कित्येक कार्टून व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळविले आहे. बच्चेकंपनीप्रमाणेच तरूणाईमध्येही यातील कित्येक व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांचे ब्रॅण्डिंग इतके तगडे झाले आहे की, ५० ते ७० वर्षापूर्वी जन्मलेल्या या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांना तेवढय़ाच भावतात. यापैकी बहुतेक व्यक्तिरेखांचा प्रवास पुस्तकांतून, दृक् श्राव्य माध्यमाकडे झाला आहे.

अज्ञाताची उत्सुकता असल्यास..
गुन्हेगारी जगतानंतर आता रामू भयपटांच्या मागे लागला आहे. खरे तर आक्राळविक्राळ चेहरा न दाखवता रामूने ‘रात’मध्ये प्रेक्षकांना घाबरवून सोडले होते. मधल्या काळात तो गुन्हेगारी जगतावर आधारित चित्रपटांकडे वळला होता. अलीकडे पुन्हा एकदा त्याने अमानवी घटकांकडे लक्ष वळवले आहे. ‘अग्यात’चे प्रश्नेमोज पाहून हॉलिवूडच्या ‘प्रिडेटर’ या चित्रपटाची आठवण होते. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एक फिल्म युनीट श्रीलंकेतील जंगलात जाते. कॅमेऱ्यात बिघाड झाल्यामुळे चित्रीकरण थांबते. तेथील नोकरावर कोणीतरी हल्ला करतो. त्यानंतर हल्ल्याचे सत्र सुरू होते आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच ही झुंज देणे अपरिहार्य ठरते. हा भयपट नसून थरारपट आहे. हा मृत्यू नक्की कोण घडवून आणते, हेही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाच्या शेवटाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर रामूने म्हणे या चित्रपटाचे तीन क्लायमॅक्स चित्रीत केले होते. त्यामुळे चित्रपट पूर्ण झाल्यावर केवळ रामू आणि चित्रपटाचा संकलक यांनाच शेवट माहित होता. प्रियांका कोठारी आणि नितीन रेड्डी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. पण अर्थातच हा चित्रपट राम गोपाल वर्माचा चित्रपट म्हणूनच प्रसिद्ध होतोय. या चित्रपटाच्या होर्डिग्जवरून झालेल्या वादामुळे प्रेक्षकांच्या तोंडी या चित्रपटाचे नाव आहेच. त्यामुळे आपण घाबरत नाही हे इतरांना दाखविण्यासाठी किंवा घाबरण्याची आवड असलेल्यांनी ‘अज्ञाता’चा शोध घ्यायला हरकत नाही.