Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

धनगर समाजाचा एकच उमेदवार जतमधून विधानसभेसाठी लढणार
जत, ६ ऑगस्ट/वार्ताहर

 

आगामी विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघातून धनगर समाजाच्या वतीने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला, तसेच निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तिघांची नावेही जाहीर करण्यात आली.
जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी धनगर समाजातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांची बैठक येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत जत तालुक्यात धनगर समाजाची संख्या पहिल्या क्रमांकाची आहे. तालुक्यात ४० टक्के धनगर समाज आहे. एकूण ७० ते ८० हजार मतदार धनगर समाजाचे आहेत. धनगर समाजातून एकच उमेदवार दिला, तर समाजाच्या लोकसंख्येवर तो बहुमताने निवडून येईल. त्यासाठी समाजातून एकच उमेदवार देण्यात यावा व तोही स्थानिक असावा, असे निश्चित करण्यात आले.
धनगर समाजाच्या वतीने जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाराम मासाळ, अ‍ॅड. म्हाळाप्पा पुजारी (वळसंग) व अशोक बन्न्ोनावर हे जत विधानसभेसाठी इच्छुक आहेत. या तिघांपैकी कोणालाही जरी उमेदवारी दिली, तरीही समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना बहुमताने निवडून आणण्याचे ठरले. या बैठकीस श्यामराव आप्पा जानकर, कुंडलिक दुधाळ, रावसाहेब मोटे, मानसिद्धा पुजारी, नागनाथ मोटे, शिवाजी गडदे, विलासराव गडदे, प्रा. भूषण माने, प्रा. नागेश पुजारी, बिरा बंडगर, धनाजी गडदे, अण्णाप्पा सुसलाद, सुरेश कटरे व सदाशिव व्हनमाने आदी उपस्थित होते.