Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

मानवतेचे मंदिर
डॉ. अविनाश आचार्य हे जळगावातलं मोठं प्रस्थ.. डॉ. आचार्य हे एकेकाळचे रा. स्व. संघाचे जळगाव जिल्हा संघचालक.. डॉक्टरांनी जळगावातला संघ सर्वार्थानं समाजव्यापी बनवला, सर्वस्पर्शी केला.. जळगाव जनता सहकारी बॅँक ही जळगाव जिल्ह्यातली अग्रगण्य बनलेली सहकारी बँक त्यांच्याच कुशल नेतृत्वाखाली स्थापन झाली, मोठी झाली आणि स्थिरावली.. त्या एका बॅँकेनं केशव स्मृती प्रतिष्ठान स्थापन करून अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू केले.. शेकडो नेत्ररूग्णांच्या जीवनात नेत्रज्योती उजळविणारी मांगीलालजी बाफना नेत्रपेढी बॅंकेच्याच माध्यमातून सुरू झाली, बॅंकेनंच अल्पशुल्कात पूर्ण जेवण देणारं क्षुधाशांती केंद्र आणि श्रद्धा पापड नामक खाद्यउद्योग सुरू केला आणि कामानिमित्ताने गावागावातून जळगावात येणाऱ्या शेकडो-हजारो गोरगरीबांच्या पोटी सुखाचे दोन घास जातील अशी रचना उभी केली..

सध्या केवळ तर्कवितर्क!
काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्य़ाची ओळख ‘ताईं’चा जिल्हा अशी करून दिली जात होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असताना तत्कालीन खासदार उषाताई चौधरी आणि प्रतिभाताई पाटील असा तो संदर्भ होता. आजही ही ओळख पुसली गेलेली नाही. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यामुळे तर जिल्ह्य़ाचे नाव थेट ‘दिल्ली दरबारा’त पोहोचले. नंतर राजकीय वातावरणाच्या बाबतीत अत्यंत बेभरवशाची परिस्थिती जिल्ह्य़ाने अनुभवली. परिसीमनानंतर झालेले बदल, युती आणि आघाडय़ांमधील जागावाटपाचा घोळ, नव्या दमाच्या नेत्यांचा उदय, अशा वातावरणात विविध राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी त्यांची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेवटी उमेदवारांची निवड किंवा जय-पराजय याचे परिमाण जातीय आधारांवरच ठरणार आहे.

काँग्रेसला अनुकूल चित्र
विधानसभेत काँग्रेस आघाडीस १०० टक्के यश देण्याचा लौकिक असणाऱ्या वर्धा मतदारसंघात यावेळी एखाद-दुसरा अपवाद वगळता याच लौकिकाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत लाखाने निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या दत्ता मेघेंचे राजकीय डावपेच विधानसभा निवडणुकीवर प्रामुख्याने प्रभाव टाकतील. खासदार दत्ता मेघेंसह वर्धा- प्रमोद शेंडे, आर्वी- अमर काळे, देवळी-पुलगाव -रणजीत कांबळे, चांदूर रेल्वे- वीरेंद्र जगताप हे काँग्रेसी तर, हिंगणघाटला राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे व मोर्शीत अपक्ष म्हणून

खाद्यराक्षस
गुजरातच्या शाळांमध्ये सरकारतर्फे आवळा कँडीचे वाटप होणार आहे. मुलांची स्मरणशक्ती वाढावी, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये विशेषत: ग्रामीण भागांतील शाळांमध्ये मुलांची गळती रोखण्यासाठी दुपारच्या न्याहरीचे मोफत वाटप होते. काही ठिकाणी दूध आणि पावाचे वाटप होते. भारतात आज आर्थिक प्रगती वेगाने होत असली तरी कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यात भारत अपयशी ठरला आहे, असा ठपकाही जागतिक बँकेने गेल्याच आठवडय़ात ठेवला आहे. शाळांमधून खाद्यपदार्थाचे मोफत वाटप होते, ग्रामीण आणि आदिवासी भागांत कुपोषणाचे संकट तीव्र होत आहे आणि शहरी भागांतील मुलांमध्ये अनावश्यक खादाडीमुळे स्थूलपणा वाढतो आहे, असे आजचे चित्र आहे! अमेरिकेत गेल्या तीन दशकांत लहान मुलांमधील वाढत्या स्थूलपणाबाबत समाजशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत. या समस्येचे मूळ, पोषक आहाराऐवजी ‘जंक फूड’ खाण्याच्या वाढत्या सवयींत आहे तसेच सातत्याने तेथील टीकेचा रोख वळतो तो ‘कुकी मॉन्स्टर’ या अमेरिकेतील बच्चेकंपनीत लोकप्रिय असलेल्या कार्टूनमध्ये. १९७० च्या सुमारास हा कार्यक्रम अमेरिकन दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकू लागला. काहीही आणि कधीही खाणारा हा ‘खाद्यराक्षस’ मुलांमध्ये लोकप्रिय झालाच पण त्याच्याप्रमाणे काहीही आणि कधीही खाण्याची सवयही मुलांना जडली. या कार्यक्रमावर व्यापक टीका सुरू झाली तेव्हा मग कार्यक्रमाच्या शेवटी पोषक आहाराचे महत्त्व सांगणारा एखादा प्रसंग झळकू लागला पण त्याने फारसे काही साधले नाही. गेली तीन वर्षे या ‘मॉन्स्टर’च्याच आहारसवयी बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे! तो सफरचंद आणि गाजरही आवडीने खाऊ लागला आहे. आपल्याकडे परिस्थिती त्या तुलनेत आज नियंत्रणात असली तरी मुलांवर टीव्हीचा वाढत असलेला पगडा लक्षात घेता आणि मुलांच्या लोकप्रिय कार्यक्रमादरम्यान जंकफूडच्याच जाहिरातींचा मारा पाहता हा धोका आपल्याकडेही आहेच. शिवाय गतिमान जीवनशैलीमुळे पालकांना मुलांकडे लक्ष द्यायलाही उसंत नाही. मुलांनी कटकट करू नये म्हणून त्यांना हवं ते, आवडेल ते खायला द्या, अशी प्रवृत्तीही वाढत आहे. मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने मागे एक पाहाणी केली होती. शाळेत मधल्या सुटीत मुलांचा डबा काय असतो, यावर ही पाहणी होती. त्यातून असे लक्षात आले की मुलांच्या डब्यात पोषक मूल्ये कमी असतात आणि जंक फूडचेच प्रमाण अधिक असते. डब्यात द्यायला सोयीचा, मुलांच्या आवडीचा आणि फारसा व्याप नसलेला खाद्यपदार्थ म्हणून अशा सटरफटर खाण्याचे प्रमाण मुलांच्या डब्यात वाढते आहे, याकडे या पाहणीने लक्ष वेधले होते. या पाश्र्वभूमीवर ‘भगीरथीचे वारस’ या पाणी पंचायतीचे प्रवर्तक विलासराव साळुंखे याच्या वीणा गवाणकर लिखित चरित्रात मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांनी कृतीतून दिलेली शिकवण जशी मनाला भिडते तशीच एक अभिनव रेसिपीही मिळते. ही रेसिपी म्हणजे ‘भाकरीचे सँडविच’! भाकरीलाच लोणी किंवा दही आणि चटणी लावून त्यात टोमॅटो, काकडीचे काप ठेवून पौष्टिक सँडविच बनू शकते. आपल्या खाद्यसंस्कृतीतील असे किती तरी प्रकार मुलांच्या आवडी आणि आहारसवयी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com