Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

चिकन सूप... : दुर्लक्षित थडगं
त्या प्रसन्न दिवशी मी वाट तुडवत होते.
आणि अधूनमधून वाकून खाली बघत होते.
थडग्यांवरील स्मारकशिला
क्षणात माझी नजर पडली एका साधारण क्रुसावर (क्रॉस)
ज्याचे निघाले होते ढलपे व लाकूड झालं होतं जुनं।।
वडिलांच्या थडग्यावर वाहण्याची फुलं होती माझ्या ओंजळीत
मला लवकर धरायची होती परतीची वाट
पण मी पाऊल पुढे नाही टाकू शकले, राहिले तिथेच खिळून
त्या क्रुसापाशी - ज्याच्याशी नव्हतं माझं काहीच देणं-घेणं।।
थडग्यावरची तारीख बघून माझी शंका खरी ठरली
मला आधीच कल्पना आली होती त्याची
त्या क्रुसाखाली दफनवलेलं होतं एक कोवळं बालक
निळ्या रंगाचा तो क्रूस होता खूप जीर्ण।।

 

नक्कीच किती स्वार्थी पालक असणार ते
ज्यांनी पोटच्या गोळ्याला पुरलं होतं किती एकाकी
सोबतीला नव्हती फुलं ना अंधारात होती मेणबत्तीची संगत
ना होती साधी एखादी स्मारकशिला।।
जवळ जाऊन नीट निरखला तो क्रूस
ढलपे सुटून आलेला भासला तो केविलवाणा
पण त्याच्या मागे लिहिलेल्या ओळी वाचल्या
व त्या क्षणी मी आमूलाग्र बदलूनच गेले।।
‘‘हा क्रूस नाही भव्यदिव्य पण बनला आहे माझ्या या हातांनी
आता तुला कळेल बाळा, किती रे जीव होता माझा तुझ्यावर
क्रुसाचा हा निळा रंग देईल सतत तुझी आठवण
नाही मी तुझ्याजवळ, ही वेदनाच किती मोठी।।
अरे तू मला सोडून गेलास आणि मी एकाकी पडले रे
काय हा विरोधाभास, तुझं आयुष्य गेलं संपून
आणि मी मात्र राहिले मागे- एकटी व निराधार
कशी राखू निगराणी या थडग्याची - वेदना होती फार’’।।
डोळ्यात आला अश्रूंचा महापूर, जेव्हा नजर पडली
आजूबाजूच्या भव्य स्मारकांवर - पण वाटले ते खुजे त्या जीर्ण क्रुसासमोर
त्या निनावी पालकांच्या दु:खात झाले मी सहभागी
व उमजल्या त्यांच्या वेदना, त्यांची झालेली हानी।।
सभोवतालच्या स्मारकशिला माझ्यापेक्षाही उंचच उंच
परंतु आता भासू लागल्या अगदीच नगण्य-
प्रेमळ हातांनी बनवलेल्या त्या जीर्ण क्रुसासमोर
फुलांनी भरलेली माझी ओंजळ झाली रीती त्यावर।।
शेरिल एल. कॉस्टेलो - फॉर्शी
The Grave No One Tended
स्वैरानुवाद : उषा महाजन
sayhi2usha@rediffmail.com