Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग

केईएम रुग्णालयाच्या ‘हेरिटेज’ इमारतीच्या नूतनीकरणाचे कंत्राट ‘निव ग्रुप’ला
व्यापार प्रतिनिधी: मुंबईस्थित रियल इस्टेट क्षेत्रातील कंपनी निव ग्रुपने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या पुरातन वास्तू दर्जा असलेल्या जुन्या मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाचे १२० कोटी रुपयांचे कंत्राट मिळविले आहे. प्रख्यात वास्तुरचनाकार जॉर्ज विट्टेट यांनी १९२६ साली या इमारतीचे डिझाईन तयार केले होते. त्याचे नूतनीकरण निव ग्रुपतर्फे करण्यात येणार असून हे काम ऑक्टोबर २००९ मध्ये सुरू होत आहे.

धनको-ऋणको थेट संवादाचे नवीन ‘नॅनोफिन’ दालन
लवचिक अटी-शर्ती आणि स्वस्त कर्ज

व्यापार प्रतिनिधी: इंडियन सिन्टास समूहातील कंपनी ‘नॅनोफिन एंटरप्रश्नइजेस (प्रश्न.) लि.’ने इंटरनेट या समन्वयासाठी माध्यमाच्या प्रभावी वापरातून धनको आणि ऋणको यांना वाटाघाटी आणि थेट संवादासाठी सामायिक व्यासपीठ प्रदान करणारी व्यक्तिसापेक्ष ऋण (पीयर-टू-पीयर लेंडिंग) सेवा प्रस्तुत केली आहे. सध्याच्या बाजारपेठेच्या स्थितीत कर्जदारापुढे आवश्यक तितके कर्ज मिळविणे ही अडचण नसली तरी ते मिळविण्यासाठी क्लिष्ट प्रक्रिया आणि प्रसंगी अनावश्यक लाल-फीतीच्या कारभाराच्या दिरंगाईला सामोरे जावे लागणे ही मुख्य समस्या आहे.

टाटा एआयजी लाइफचे ‘सिटी बँके’शी सामंजस्य
व्यापार प्रतिनिधी: टाटा एआयजी लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयजी लाईफ)ने सीटी बँकेच्या सहकार्याने नूतनीकरण प्रीमिअम भरण्यासाठी ‘एनईएफटी’ माध्यम आज सादर केले. प्रीमिअम (विमा हप्ता) अधिदान करण्यासाठी ग्राहकाभिमुख पर्याय उपलब्ध करणारी टाटा एआयजी ही आयुर्विमा क्षेत्रातील पहिलीच कंपनी आहे. सीटी बँकेच्या ग्राहकोपयोगी सेवेमुळे टाटा एआयजी लाइफ विमाधारक आता ‘एनईएफटी’ची सुविधा असलेल्या त्यांच्या भारतातील कोणत्याही बँक खात्यामार्फत प्रीमिअमचे अधिदान करू शकतात. टाटा एआयडी लाइफ इन्श्युरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम. सुरेश या प्रसंगी म्हणाले की, ‘टाटा एआयजी लाइफ’कडून ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्याची ही सुरुवात आहे. ग्राहकांना जगाच्या कानाकोपऱ्यातून सहज संपर्क साधता यावा याच उद्दिष्टाने ‘एनईएफटी’ सादर करण्यात आले आहे. प्रीमिअम संकलित करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा ‘एनईएफटी’च्या माध्यमातून प्रीमिअम जलदगतीने गोळा होत आहे. एनईएफटीच्या ५७००० शाखा ‘कस्टमर टू बँक’मार्फत अधिदान करण्यास उपलब्ध असल्यामुळे येत्या काही वर्षात अशा प्रकारच्या अधिदानाला जास्त पसंती दिली जाईल.

‘मोबाईल स्टोअर’चा फेस्टिव्हल धमाका ; खरेदीवर पाच टक्के ‘कॅशबॅक ऑफर’
व्यापार प्रतिनिधी: जगातील सर्व ब्रँडचे मोबाईल हँडसेट एकाच ठिकाणी उपलब्ध करणाऱ्या ‘मोबाईल स्टोअर’तर्फे सणासुदीच्या हंगामानिमित्त ग्राहकांसाठी विशेष फेस्टिव्हल ऑफर सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेस्टिव्हल धमाका ऑफरअंतर्गत मोबाईल स्टोअरच्या कोणत्याही दुकानात मोबाईल हँडसेट, ब्ल्यू टूथ हँडसेटस्, मेमरीकार्ड, एमपी ३ प्लेअर्स आणि गेमिंग उपकरणे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खरेदी केलेल्या किमतीवर पाच टक्के रोख परतावा (कॅश बॅक) देण्यात येणार आहे. मोबाईल स्टोअरच्या देशभरातील सर्व दुकानांमध्ये ही फेस्टिव्हल ऑफर सुरू करण्यात आली आहे. खरेदीनंतर ग्राहकाला एक विवरणपत्र भरण्यासाठी देण्यात येणार आहे. ग्राहकाने रोख परतावा मिळवण्यासाठी हे विवरणपत्र भरून प्रक्रिया केंद्राकडे पाठवून द्यावयाचे आहे.

घाटकोपरच्या रिलायन्स रिटेलमध्ये ‘रिलायन्स ज्वेल्स’चे उद्घाटन
व्यापार प्रतिनिधी: रिलायन्स रिटेल लिमिटेडने खास दागिन्यांच्या विक्रीसाठी सुरू केलेल्या रिलायन्स ज्वेल्सने आज मुंबईतील घाटकोपर येथील आर सिटी मॉलमध्ये आपल्या ‘रिलायन्स ज्वेल्स’ स्टोअरची सुरुवात करीत असल्याची घोषणा केली. गुरगाव, बंगलोर, धनबाद, विशाखापट्टणम, हैद्राबाद, अहमदाबाद, जमशेदपूर, जामनगर, जोधपूर व जालंधर या शहरांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता हे ‘रिलायन्स ज्वेल्स’चे १३ वे स्टोअर सुरू केले जात आहे. हे मुंबईतील ‘रिलायन्स ज्वेल्स’चे पहिले स्टोअर आहे. रिलायन्स ज्वेल्सने मुंबईकर ग्राहकांसाठी एक विशेष शुभारंभ ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्केपर्यंत व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्केपर्यंत सूट मिळू शकते. ही ऑफर केवळ मर्यादित काळापुरतीच सुरू राहील.

बजाज इलेक्ट्रिकल्सची भरीव कामगिरी
व्यापार प्रतिनिधी: बजाज इलेक्ट्रिकल्सच्या ३० जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत विक्रीत १५ टक्के वाढ होऊन ३६५.४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गतवर्षी याच तिमाहीत विक्री ३१६.६ कोटी रुपये होती. निव्वळ नफ्यात ६० टक्के वाढ होऊन १६.४ कोटी रुपयेपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. २००८-२००९ साठी १०० टक्के लाभांश मंजूर झाला आहे.

व्ही-गार्ड इंडस्ट्रीजच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदावर एन. श्रीकुमार
व्यापार प्रतिनिधी: विद्युत व विद्युत यांत्रिकी सेवा पुरवठादार व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने एन. श्रीकुमार यांची कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. अलीकडेच एन. श्रीकुमार यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. एन. श्रीकुमार या उद्योगातील जाणकार असून त्यांच्याकडे ३० वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे. व्ही-गार्ड इंडस्ट्रीज कंपनीत रुजू होण्यापूर्वी त्यांनी अपोलो टायर्स कंपनीत प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच एन. श्रीकुमार यांनी तेथे काही काळ उत्पादन विभाग प्रमुख म्हणूनही काम केले आहे.