Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

ड्रॅगनबॉल इव्होल्युशन
परिचित पदार्थाचा बेचव काला

पृथ्वीचा विनाश करायला खुद्द आपण पृथ्वीवासी समर्थ असताना, अवकाशातून कुणी तरी दुष्ट तत्त्वांनी येऊन पृथ्वीचा विनाश करण्याचा, तिच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करावा (आणि मग पृथ्वीवासी नायक-नायिका आदींनी त्यांना नेस्तनाबूद करून पृथ्वीला वाचवावं) अशी कल्पना करणे हा गेल्या काही वर्षातला हॉलीवूडचा एक आवडता छंद. त्यातून मग विज्ञान-काल्पनिका, चमत्कार आणि अ‍ॅक्शनला मोकळं आकाश मिळतं. कॉमिक बुक्स आणि व्हिडीओ गेम शैलीचं आणखी एक परिमाण अशा आशयाच्या चित्रपटांचा चेहरा बनताना बरेच वेळा दिसतं.

पब्लिक एनिमीज
‘चोर-शिपाई’ खेळ केवळ!

अमेरिकेतल्या मंदीच्या (द ग्रेट डिप्रेशन) सुरुवातीच्या काळात (१९२९ ते १९३३) गाजलेल्या आणि तत्कालीन अमेरिकन पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभं करणाऱ्या बँक दरवडेखोर जॉन डिलिंगरच्या प्रकरणावर ‘पब्लिक एनिमीज’ आधारित आहे. संपूर्ण चित्रपटाचा ‘फोकस’ आहे तो जॉन डिलिंगर (जॉनी डेप)चे धाडसी दरवडे, पोलिसांना गुंगारा देण्याचं कसब, तुरुंग फोडून आपल्यासह आपल्या साथीदारांना मुक्त करण्यातली त्याची हातोटी आणि त्याला पकडण्यासाठीची पोलीस यंत्रणेची धडपड, मेल्विन पर्विस (ख्रिश्चन बेल) यानं डिलिंगरला पकडण्यासाठी लावलेले सापळे आणि या सर्वातून निर्माण होणारा थरार, निर्माण होणारी ‘अ‍ॅक्शन’.

‘बॉलीवूड हीरो’ आणि अमेरिकी भारतीयांची काळजी
अमेरिकेतील इंडिपेण्डन्ट फिल्म चॅनलवर (आय.एफ.सी) ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिलेली ‘बॉलीवूड हीरो’ नावाची मिनी सिरीज दाखविली जाणार आहे. ‘हॉलीवूड’मध्ये भूमिका नाकारलेला एक कलाकार ‘बॉलीवूड’च्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कसा झळकतो, या कथेवर ही मिनी सिरीज आधारलेली आहे. यात नेहा धुपिया, पूजा कुमार, अली फझल, रचना शहा यांच्यासोबत हॉलीवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.आर्थिक गुंतवणूक ,सहायक दिग्दर्शन, कोरिओग्राफीमध्ये स्लमडॉग मिलिऑनेरच्या टीमचा ‘बॉलीवूड हीरो’मध्ये मोठा सहभाग आहे. सध्या अमेरिकेत इंटरनेट, टीव्ही आणि वृत्तपत्रांमधून मुंबईत चित्रीकरण करण्यात आलेल्या या मिनी सिरीजच्या प्रदर्शनाला सर्वाधिक प्रसिद्धी दिली जात आहे.