Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात स्वाइन फ्लूवर यशस्वी नियंत्रण- डॉ. सुरेश जगदाळे
सातारा, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाईन फ्लू साथ येथील आरोग्य विभागाने यशस्वीपणे नियंत्रणात आणली असून, २५ पैकी २१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी

 

पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्य़ात पुणेप्रमाणेच साथ प्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात १० रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपचार केल्यामुळे त्यातील ५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पाचगणी येथील १६ रुग्णही बरे झाले असून, त्यांनाही हॉस्पिटलमधून सोडण्यात आले असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लू नियंत्रण कक्ष (क्र.२७) उघडण्यात आला असून, तेथील दूरध्वनी क्रमांक (०२१६२) २३००८९ आहे. बाह्य़ रुग्ण तपासणी विभाग क्र.८, संसर्गजन्य आंतररुग्ण अतिदक्षता विभाग, असे वेगवेगळे विभाग स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले आहेत. २५ बेडची सुविधा तयार ठेवण्यात आली आहे. स्वाईन फ्लूची साथ पसरण्याची भीती नाही. त्यामुळे अनावश्यक चाचणी करण्याचा आग्रह धरू नये, असे आवाहन डॉ. जगदाळ यांनी या वेळी केले. स्वाइन फ्लूची चाचणी करण्याची सर्वच तापाच्या रुग्णांना गरज नसते. जिल्हा रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करून त्यामध्ये शंका आली तरच संबंधित रुग्णांची तपासणी करण्याची सूचना करण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकाचे प्रमुख डॉ. रमेश चौगुले व डॉ. प्रदीप छंचुरे आहेत. डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. जयंत देशपांडे, डॉ. ननावरे, डॉ. अरुण जाधव, डॉ. अरुंधती कदम, डॉ. सुभाष कदम, डॉ. वैशाली खंदारे, डॉ. अश्विनी महाजन कार्यरत आहेत. गेले पंधरा दिवस पाचगणी व सातारा जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र राबून कौशल्याने साथ नियंत्रणात आणली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत निकम यांनी सांगितले की, १४९ संशयितांचे नमुने घेण्यात आले होते. सव्‍‌र्हेक्षणांनी १०७ र ुग्ण हे साध्या तापाचे आढळून आले आहेत. १२ संशयितांचे स्रावांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे (एमआयव्ही) येथे पाठविण्यात आले आहेत.