Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आशय बुरुंगलेची उत्तुंग भरारी
पुणे, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

आशय बुरुंगले.. बारामती तालुक्यातील निरावागजसारख्या ग्रामीण भागातून शहरी भागात पदार्पण केलेला रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचा

 

विद्यार्थी.
जगातील सवरेत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजिलिस या विद्यापीठात त्याची पीएच.डी. साठी निवड झाली असून, दरमहा २४०० डॉलर (सव्वा लाख रुपये) एवढी शिष्यवृत्ती त्याला पुढील पाच वर्षासाठी मिळणार आहे. तो गणित या विषयात आपले संशोधन करणार आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्याने घेतलेली ही झेप खरोखरच कौतुकास्पद अशीच आहे.
लहानपणापासूनच गणिती कोडय़ांची पुस्तके वाचणाऱ्या आशयने गणिताची विशेष आवड निर्माण झाल्यामुळे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त गणित विषयाची पुस्तके वाचण्याचा छंद जोपासला. एस.एस.सी. परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून कोल्हापूर बोर्डात तो १९ वा आला, तर एच.एस.सी. परीक्षेतही त्याने ९४ टक्के गुण मिळविले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरच त्याची ४७ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी निवड झाली. या परीक्षेसाठी देशभरातून फक्त सहा विद्यार्थ्यांची गुणवत्तेवर निवड केली जाते. त्यापैकीच तो एक होता. स्लोव्हेनिया येथे पार पडलेल्या या स्पर्धेतही त्याने आपल्या प्रयत्न, जिद्द व एकाग्रतेच्या जोरावर ‘ब्रान्झ पदक’ मिळविले व भारताच्या शैक्षणिक इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. आशयला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने वार्षिक ८० हजार रुपये किशोर वैज्ञानिक स्कॉलरशीप मिळाली, तर इन्फोसिस अ‍ॅवॉर्डही मिळाला.
‘भव्य योजना आख, उच्च ध्येयाची जिद्द बाळग आणि त्यासाठीच काम कर’, ही शिकवण देणारे त्याचे वडील डॉ. अरविंद बुरुंगले हे रयत शिक्षण संस्थेचे मॉडर्न कॉलेजचे (वाशी, मुंबई) प्रश्नचार्य आहेत. आशयच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे व आई, माता व माऊली यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्यात दिसून येतो अशी त्याची आई सौ. जयश्री बुरुंगले या रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयात प्रश्नध्यापिका आहेत.
‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या तुकोबांच्या उक्तीप्रमाणेच आपल्या शिक्षक आई-बाबांचे संस्कार आशयवर झाले व त्यांनी आशयला वेळोवेळी निर्णयस्वातंत्र्य, प्रश्नेत्साहन व चेतना दिली.
हे. गो. देशपांडे व फग्र्युसनचे आचार्य या शिक्षकांनी त्याला योग्य मार्गदर्शन व दिशा दिली.
देशभरातून गुणवत्तेच्या आधारे तीसच विद्यार्थी बंगलोर येथील इंडियन स्टॅटॅस्टिकल इन्स्टिटय़ूटमध्ये बी. मॅथ्स. पदवीसाठी निवडले जातात. त्यातही आशयचा अग्रक्रम होता व त्याने तीन वर्षात भौतिकशास्त्र व संगणक असे विषय असणाऱ्या या पदवी परीक्षेतही घवघवीत यश संपादन केले.
अमेरिका, चीन, रशिया येथील मुलांबरोबर इंटरनेटवरून गणिताच्या प्रश्नॅब्लेमविषयी आशयने चर्चा करून आपल्या अनेक समस्यांचे निराकरण केले व आपली स्वयंअध्ययनाची सवय जोपासली. भारतामधून त्याने इंटरनेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणित विषयाच्या परीक्षेत यश संपादन केले व जगातल्या नामांकित कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्याची गणित विषय संशोधनासाठी (पीएच.डी.) निवड केली व प्रतिमहिना २४०० डॉलर (सव्वा लाख रुपये) शिष्यवृत्तीही देऊ केली.
आपल्या शिक्षणाचा बहुतांश खर्च हा आशयने त्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतूनच केल्याने कसलाही शैक्षणिक खर्चाचा आर्थिक बोजा आमच्यावर पडला नसल्याचे त्याचे वडील डॉ. अरविंद बुरुंगले अभिमानाने सांगतात.
आशय हा गणित विषयात अमेरिकेतील लॉस एंजिलिस या नामांकित शहरात पाच वर्षे संशोधन करणार आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात तो अमेरिकेला रवाना होणार असल्याने त्याचा कौतुक सोहळा व शुभेच्छा समारंभ बारामतीतील रयत मंचने आयोजित केला. या समारंभास रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रश्नचार्य एन. एल. जाधव, प्रश्नचार्य डॉ. मोहन राजमाने, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जळोचीचे सरपंच दीपक मालगुंडे, रयत मंचचे अध्यक्ष देविदास गुरव, दूध संघाचे संचालक विठ्ठलराव देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
‘भविष्यात आशय हा आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर गणित क्षेत्रात संपूर्ण आशिया खंडात आपला नावलौकिक करेन, असा आशावाद या वेळी मान्यवरांनी व्यक्त केला. कर्मवीर भाऊराव पाटील प्रतिष्ठान, रयत सेवक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, रयत सेवक बँक यांच्या वतीने दत्तात्रय पांढरे, गणपत तावरे, अरुण जाधव, अंकुश शिंदे, सुजित जाधव, अर्जुन मलगुंडे, अविनाश साळुंखे, झकीर शेख, सुभाष लकडे, काशिनाथ सोलनकर यांनी त्याच्या परदेश शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
आशयने बारामतीचे नाव आता जगाच्या नकाशावर कोरले असून, त्याला गणित संशोधनासाठी शुभेच्छा देऊया!!