Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

रुग्ण हक्क समितीचे कोल्हापुरात आंदोलन
कोल्हापूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

रुग्ण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, मेडिकल असोसिएशन, ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनने पुढाकार घेऊन रुग्ण हक्क समन्वय समितीची स्थापना करावी, खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीला आळा घालण्यात यावा, या मागणीसाठी जनसुराज्य शक्तीच्या वतीने

 

िबदू चौकात आंदोलन करण्यात आले.
डॉक्टरांनी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यावसायिक नीतितत्त्वे पाळण्याची शपथ घेतलेली असते. पण त्यांच्याकडून ही शपथ पाळली जात नाही. वैद्यकीय सेवेत असंवेदनशीलता वाढू लागली आहे. अशा डॉक्टरांना वेसन घालण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. रुग्ण हक्क संघर्षाचा या आंदोलनातून पहिला टप्पा सुरू केला असून, १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याचा इशारा जनसुराज्य शक्तीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी आंदोलनातून दिला आहे.
रुग्णांच्या हतबलतेचा फायदा घेऊन काही खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय सत्ता निर्माण केली आहे. असंवेदनशील डॉक्टरांची संख्या वाढू लागली आहे. डॉक्टरांनी आपल्या श्रमाचे मूल्य जरूर घ्यावे, पण रुग्ण हा सामान्य माणूस आहे हेही लक्षात घ्यावे, असे आवाहन आंदोलनातून करण्यात आले आहे. आंदोलनात संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेखर तेली, इम्रान शिकलगार, अमित गायकवाड, रामचंद्र शिंदे,इत्यादी पन्नासपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला.