Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

उत्पादित कापड देश-विदेशात विक्री करण्याची यंत्रमागधारकांना संधी
इचलकरंजी, ७ ऑगस्ट / वार्ताहर

यंत्रमागधारकांनी बुद्धी व कौशल्य पणाला लावून कापड उत्पादित करायचे पण बडय़ा नामांकित कंपन्यांनी आपल्या ब्रँडचे लेबल लावून त्यावर भरघोस नफा कमवायचा, हे वर्षानुवर्षे सुरू

 

असलेले वस्त्रोद्योगातील एक दृष्टचक्र. हे चक्र भेदण्याचा प्रयत्न वस्त्रनगरीत सुरू झाला असून उत्पादित केलेले कापड स्वत:च देशविदेशात विक्री करण्याचे तंत्र अवगत केले जात आहे. पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (पिडीक्सेल) व वस्त्रोद्योग आयुक्तालय, मुंबई यांच्या वतीने येत्या शनिवार पासून सुरू होणाऱ्या बायर-सेलर मिट अर्थात कापड खरेदी विक्री मेळावा येथील यंत्रमागधारक कापड व्यापारी यांचे भवितव्य उजळवणारा ठरणार आहे.
खरेदीदाराच्या दृष्टीने ब्रँड नेमला विशेष महत्त्व प्रश्नप्त झाले आहे. बँड नेमचे महत्त्व न उमगलेल्या विकेंद्रित क्षेत्रातील कापड उत्पादक, यंत्रमागधारकांची उपेक्षाच झाली आहे. केंद्र शासनाने यंत्रमाग क्षेत्राचे कापड उत्पादनाचे प्रमाण ७० ते ८० टक्क्य़ांपर्यंत असल्याचे आकडेवारीसह मान्य केले आहे. दुसरीकडे कांपोझिट मिल व हातमागचे उत्पादन प्रत्येकी १० टक्क्य़ांच्या आसपास राहिले आहे. कांपोझिट मिलने बँड नेमने विक्री करण्याचे तंत्र अवगत केले आहे.
बडय़ा कंपन्यांच्या मोठमोठय़ा मिल कधीच अस्तंगत झाला आहेत. त्यांच्याकडील मागांची संख्या लक्षणीय स्वरूपात घटली असली, तरी विपणनाचे तंत्र मात्र प्रगत स्वरूपाचे आहे.
विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमागधारक किंवा दलाल, अडत्या यांना गाठायचे. आपल्याला हवे असणाऱ्या नमुन्याप्रमाणे (स्पेशिफिकेशन) लाखो मीटर कापड खरेदीची मागणी नोंदवावयाची. ठरावीक काळात तितके कापड खरेदी करायचे. चांगल्या प्रश्नेसेसिंग हाऊसमध्ये त्यावर प्रक्रिया करायची आणि आपला ब्रँड नेम टाकून खरेदीदारापेक्षा अवाच्या सवा दर आकारून प्रचंड कमाई करायची. हे बडय़ा कंपन्यांचे विपणनाचे सूत्र लक्षात आल्याने हळूहळू विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमागधारक कापडव्यापारी जागा होऊ लागला आहे.
पिडीक्सेल या संस्थेने विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमागधारकांच्या तांत्रिक विकास व निर्यातीला चालना दिली आहे. याचा लाभ काही स्थानिक यंत्रमागधारकांनी घेतला आहे. इचलकरंजीत तांत्रिक विकास व निर्यातीला चालना दिली आहे. याचा लाभ काही स्थानिक यंत्रमागधारकांनी घेतला आहे. इचलकरंजीत सायझिंग बेस्ड हजारो नमुन्याचे कापड उत्पादित केले जाते.
साध्या मागावर तीन बिमे बांधून जकॉर्ड मागावर निघत नाही असे दर्जेदार व डिझाईनचे कापड उत्पादित करणारे सुनील पाटील, मेहबूब मुजावर यांच्यासारखे शेकडो कारखानदार आहेत. प्रत्यक्ष खरेदीदार, गारमेंट निर्यातक, गारमेंट उत्पादक, विक्रेते यांना आपले कापड विक्री करण्यासाठी हा दोन दिवसांचा मेळावा होत असून त्याचा निश्चितपणे चांगला लाभ स्थानिक उत्पादकांना होईल. असा विश्वास पिडीक्सेलचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल व पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंड पाटील यांनी व्यक्त केला.