Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

‘एच-२ बी’ व्हिसासाठी.. त्वरा करा हो त्वरा करा!
वॉशिंग्टन, ७ ऑगस्ट/वृत्तसंस्था

 

शेतीबाह्य उद्योगातील नोकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘एच-२ बी’ व्हिसासाठी विशेष मोहिमेद्वारे अर्ज स्वीकारण्याची घोषणा अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थानांतर सेवा विभागाने केली आहे.‘एच-१ बी’ हा व्हिसा व्यावसायिक व तंत्रज्ञांना अमेरिकेतील नोकरीसाठी दिला जातो. या व्हिसाधारकांना शेतीबाह्य उद्योगांत आपल्या आप्तांना आणण्यासाठी ‘एच-२ बी’ व्हिसा दिला जातो. हे दोन्ही व्हिसा भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. ६६ हजार लोकांना ३० सप्टेंबर २००९ पर्यंत ‘एच-२ बी’ व्हिसासाठी परवानगी देण्याची मर्यादा होती. प्रत्यक्षात केवळ ४० हजार ६४० लोकांनीच या व्हिसासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे २५ हजार जागा रिक्त आहेत. एवढय़ा अल्प मुदतीत इतके अर्ज येणे कठीण असल्याने ही विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. यात एक हजार डॉलरचे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल तसेच एक ऑक्टोबर २००९ पूर्वी या व्हिसाधारकाला नोकरीवर रुजू करून घेत असल्याचे पत्रही संबंधित उद्योगामार्फत द्यावे लागेल. शिक्षण, बांधकाम, आरोग्यसेवा, उत्पादन, अन्नप्रक्रिया व हॉटेल उद्योगासाठी हा व्हिसा दिला जातो.