Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘साहित्याने उपेक्षितांचे आकाश व्हावे’.. प्रश्न. डॉ. वासुदेव डहाके
प्रश्न. अजय चिकाटे

सामाजिक चळवळीतील एक प्रश्नमाणिक कार्यकर्ता, वक्ता, प्रश्नध्यापक, वैचारिक लेखक समीक्षक अशा अनेक नात्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळात प्रश्न.डॉ. वासुदेव डहाके यांचे नाव परिचित आहे. त्यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती निमित्ताने ८ ऑगस्टला त्यांचा सत्कार सोहोळा

 

आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्ताने त्यांची ही विशेष मुलाखत.
कौटुंबिक पाश्र्वभूमीसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतानाडॉ. डहाके म्हणाले, माझी जन्मतारीख व वर्ष नेमके कोणते हे मला ठाऊक नाही. जन्मतारखेची जीवनात गरज असते हे न समजणाऱ्या आई-वडिलांचे पोटी मी जन्मलो. वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव तहसील मधील कांदेगाव नावाच्या खेडेगावात माझा जन्म झाला. परिस्थिती अगदी तोळामासाच. कसाबसा उदरनिर्वाह भागेल एवढीच आवक. वडील चार वर्ग शिकलेले. बाकी कुटुंबातील व नात्यातील इतर सर्व ठार अशिक्षित. कागदोपत्री माझा जन्म १ ऑगस्ट १९४९ चा नोंदवला आहे. भटक्या समजल्या जाणाऱ्या समाजात मी जन्मलो आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना
डॉ. डहाके म्हणाले, शिक्षणाने मला एक विशिष्ट दृष्टी दिली. त्याच्या व्यासंगातून माझ्या जाणिवा विकसित झाल्या. त्यामुळे या व्यवसायाविषयी म्हणजे शिक्षकीपेशा विषयी मला अत्यंत आकर्षण होते. वाचन, मनन, चिंतनात गोडी होतीच. लेखनातही रूची होती. सामाजिक बांधिलकी जपता जपता हे सारे साध्य करण्यासाठी शिक्षण क्षेत्राशिवाय, शिक्षकीपेशाशिवाय, अन्य पवित्रक्षेत्र नाही, म्हणून हे माझे हेतूपुरस्परच या व्यवसायातील पदार्पण आहे.
‘दलित साहित्याची अवस्था व भवितव्य’ या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना
डॉ. डहाके म्हणाले, पोटशुळाच्या विकाराने त्रस्त असलेल्यांची अशी बोंब आहे की, दलित साहित्याची कोंडी झाली आहे नव्हे तर दलितसाहित्य आता संपल्यातच जमा झाले आहे पण, ही हाकाटी म्हणजे पूर्णसत्य नव्हे. हा दलितांचाच देश आहे आणि त्याचा शेवटचा घटक अस्तित्वात आहे तोवर दलित शब्दब्रह्म हुंकारणार आहे. वेदना व विद्रोह त्यातून मांडले जाणार आहेत. उपेक्षित, बहिष्कृत आता-आता कुठे या विचारपाठीवर रूजू झाला आहे. अण्णाभाऊ, बाबूराव बागूल, कोंडविलकर, मनोहर, ढसाळ वगैरे दलित साहित्यातील पहिल्या पिढीतील कसदार लेखक आहेत. त्यानंतरच्या पिढीत नुसती अनुकरणशीलता आली. हळूहळू बडेजाव, ढोंग, आक्रोश याचेच प्रमाण वाढत गेले. दलित साहित्याने ही कोंडी फोडली पाहिजे. नवे आकाश शोधले पाहिजे. खरे तर समस्त साहित्यानेच उपेक्षितांचे आकाश झाले पाहिजे. नुसती खात्रीच नाही तर माझा पूर्ण विश्वास आहे.
मराठी साहित्यातून सकसपणा हद्दपार होतो आहे. साहित्यातील नवता आणि चैतन्य क्षीण होत आहे. याची मीमांसा आपण कशी कराल या प्रश्नाला उत्तर देताना
डॉ. डहाके म्हणाले, मराठी वाङ्मयाचे चित्र इतके निराशाजनक नाही. कितीतरी नवे अनुभव नव्या अभिव्यक्तिसह मराठीसाहित्यातून आविष्कृत होत आहेत, हे प्रमाण कमी असेल. लेखकांमध्ये लेखनपूर्व आत्मनिष्ठेचा अभाव, साहित्याच्या सखोलव्यासंगाकडे होणारे दुर्लक्ष, विषयाची अनुभवसिद्धता, तद्रूपता याची उणीव, त्यातून विस्तारत जाणारे उपरेपण, प्रसार-प्रचार माध्यमाचे आक्रमण, प्रकाशकांचा धंदेवाईकपणा, त्यातून दूर फेकला जाणारा लेखकवर्ग, लेखकरावांची निर्माण होणारी पिलावळ आणि त्यांचे कंपू, कार्यकर्त्यां साहित्यिकांचे विरळ होत चाललेले प्रमाण आणि मायेविणा येणारे रडगाणे हा दांभिकपणा यामुळे साहित्यातील सतेजता हरवत चालली आहे. वाङ्मयीन वास्तव असे चिंताजनक असले तरीही अवस्था फारकाळ टिकणारी नाही. नवे प्रवाह आणि नवे उन्मेष मराठी साहित्याला अटकेपार घेऊन जातील.