Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पत्रकारिता ‘प्रश्नेफेशन’ नव्हे, ‘मिशन’ -एस.एन. विनोद
यवतमाळ, ७ ऑगस्ट / वार्ताहर

पत्रकारितेला आज ‘प्रश्नेफेशन’ समजले जात असले तरी ते ‘मिशन’च आहे. पत्रकारितेचा प्रवास अविश्वसनियतेतून होत असताना दिसत असला तरी या व्यवसायात निष्ठेने काम करून वाचकांचा

 

विश्वास हेच आपले सामथ्र्य आहे. या ध्येयाने काम करणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी केले. यवतमाळात नव्यानेच सुरू झालेल्या ‘जनसामथ्र्य’ या दैनिकाचे प्रकाशन विनोद यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
विनोद म्हणाले की, संपादकांनी वास्तवाचे भान ठेवले तर त्यांना सन्मान आणि आदर आपोआप प्रश्नप्त होईल. आपल्या देशात पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा आहे, आधी या भांडवलदारांच्या हातात वृत्तपत्रे होती. त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी कोणताही संघर्ष करण्याची तयारी दाखवून त्याग केला आणि संपादकांच्याही स्वातंत्र्यात हस्तक्षेप केला नाही. मात्र, आणीबाणीच्या काळापासून म्हणजे १९७५ नंतर पत्रकारितेचे पतन होऊ लागले. त्यानंतर पत्रकारिता अविश्वसनीयतेतून मार्गक्रमण करीत गेली. आज विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स मिडिया’ची नक्कल आणि स्पर्धा यापासून ‘प्रिंट मिडिया’ने दूर राहण्याचीही गरज असल्याचे विनोद म्हणाले.
याप्रसंगी ‘जनसामथ्र्य’च्या संपादकपदाची जबाबदारी घेतलेल्या चंद्रकांत वानखडे यांनी आम्ही पक्षपाती आहोत, असे सांगताना आम्हाला तटस्थता मान्य नाही, आम्ही गरीब, दीनदुबळ्या, शोषित, पीडित, सर्वहारा, शेतकरी शेतमजुरांच्या बाजूने ‘पक्षपाती’ आहोत असे स्पष्ट केले.
याप्रसंगी आमदार दिवाकर रावते, आमदार संजय राठोड, मुख्य संपादक विजय वानखडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, वामन कासावार, दशरथ मडावी यांची भाषणे झाली. शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रश्न. सत्यवान देठे यांनी तर आभार माहिती अधिकारी मनोज सोनवणे यांनी मानले.