Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

भंडाऱ्यात ग्रामगीता गौरव सोहोळा
भंडारा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

बहुजनांना न्याय मिळवण्याठी ओ.बी.सी. संघटना टिकवायची असेल तर विशिष्ट विचारधारा, स्थान व उत्कृष्ट प्रचारक आवश्यक आहेत, असे प्रतिपादन ओ.बी.सी. सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष

 

अभियंता प्रदीप ढोबळे यांनी केले.
ओबीसी सेवा संघाच्या वतीने भंडारा सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित ग्रामगीता गौरव कार्यक्रमात ढोबळे बोलत होते. याप्रसंगी ग्रामगीताचार्य रामकृष्ण बेलूरकर यांनी देशाचा विकास करायचा असेल तर स्वत:च्या घरापासून विकासकार्याची सुरुवात करण्याचे आवाहन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार प्रत्येक घरात पोहोचणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी उद्योगपती केशवराव निर्वाण यांनी संघटित ओबीसी समाजाची सरकार दरबारी कधीच उपेक्षा होणार नाही, असे सांगितले. ओबीसी चळवळ रोडवायला नको असे भैयाजी लांबट म्हणाले, याप्रसंगी अ‍ॅड. मंजूषा गायधनी यांनीही विचार व्यक्त केले. प्रश्नस्ताविक रोशन उरकुडे यांनी तर संचालन आकरे यांनी केले. आभार पशिने यांनी मानले.
या समारंभ प्रसंगी प्रदीप ढोबळे यांनी ओबीसी सेवासंघाचे पदाधिकारी संघटक, संरक्षक व सदस्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बळीराम सार्वे, रामचंद्र तरोणे, रमेश शहारे, अरविंद मोटघरे, दिनेश शिरभाते, डॉ. प्रदीप मेघरे, अ‍ॅड. वसुधा मेघरे, वसंत लाखे, रामलाल हरडे, तेजराम भुरे, माजी नगराध्यक्ष रामदास शहारे, प्रश्न. जयश्री सातोकर, आनंदराव कावळे, प्रभाकर फुलबांधे, गोपाळ देशमुख, विठोबा मेश्राम, शरद भिवगडे, हर्षल मेश्राम, गोविंदराव चरडे, गोविंद ब्राह्मणकर, एम.बी. चिटकुले उपस्थित होते.