Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आदर्श खेडय़ांची निर्मिती ग्रामगीतेतूनच शक्य-पापळकर
यवतमाळ, ७ ऑगस्ट / वार्ताहर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’त आदर्श खेडय़ांचे जे कल्पनाचित्र रेखाटले आहे ते उदात्त असून तशा प्रकारची खेडी जर या भारतात निर्माण झाली तर त्याचे राष्ट्रीय पुनरुत्थान सहजगत्या

 

घडून येईल, असा विश्वास सीमा पापळकर यांनी येथे व्यक्त केला.
बालाजी देवस्थान तर्फे आयोजित श्रावणमास प्रवचनमालेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीते’तील ग्राम आरोग्य व गोवंश सुधार या विषयावर पापळकर बोलत होत्या. सीमा पापळकरांच्या प्रवचनासाठी भाविक भक्तांनी विशेषत: महिलांनी बालाजी मंदिरात गर्दी केली होती.
आपल्या प्रवचनात पापळकर यांनी संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, कबीर यांच्यापर्यंतच्या अनेक संतांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे खेडे आणि त्यातील लोकजीवन यांच्या उन्नतीचा ध्यास आहे, असे त्या म्हणाल्या.
‘ग्राम आरोग्य’मध्ये तुकडोजींनी म्हटले आहे, ‘काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे, कधी जगणे, सप्तही धातू कोपती याने, रोगरूपाने फळा येती’, ‘श्रमातूनी उपजे भाग्य संपत्ती, निजणारे तिची हानी करती’ इत्यादी ‘ओव्या’ सांगून ग्राम आरोग्य आहार, विहार, विचार कसे असावेत याचे सुंदर विवेचन केले.
गोवंशाचे महत्त्व सांगताना भारत कृषीप्रधान देश, शेतीसाठी हवा गोवंश, गोरसा इतुका नसे सत्वांश, अन्यत्र शुद्ध इत्यादी ग्रामगीतेतील ओव्यांचे स्पष्टीकरण केले.
सीमा पापळकर यांचा परिचय सेवानिवृत्त प्रश्नचार्य डॉ. नीला सोमलवार यांनी करून दिला. प्रश्नस्ताविक सुरेश देशपांडे यांनी तर आभार जयंत चोपडे यांनी मानले. डॉ. गोविंद देशपांडे (आयोजक) यांनी प्रवचन मालिका ‘ग्रामगीता’ या विषयावर असल्याचे सांगितले.