Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कुहीचा टंगस्टन प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी
कुही, ७ ऑगस्ट / वार्ताहर

खोबना येथील टंगस्टन प्रकल्प मार्गी लावून नागपूर जिल्ह्य़ातील कुही उमरेड परिसरातील बेरोजगारांची समस्या सोडवावी, अशी मागणी कुहीचे माजी सरपंच राजू येळणे यांनी निवेदनातून केली आहे.केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी नुकतेच येते साकडे

 

घातले.
कुही येथे काँग्रेस मेळाव्यासाठी सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक आले असता राजू येळणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर केले.
कुही-खोबना-आगरगाव पट्टय़ात टंगस्टनही धातू मोठय़ा प्रमाणावर आढळून आली. १९०७ ते १९१४ या काळात ब्रिटिश संशोधकांनी प्रश्नथमिक सव्‍‌र्हेक्षण केले होते. त्यानंतर १९६० नंतर ‘जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ने बरेच वर्षे संसोधन कार्य केले.
१९८६ पासून तर नियमितपणे मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन ऑफ इंडियाने प्रत्यक्ष कच्चा धातू काढून त्याचे नमुने घेतले तेव्हा टंगस्टन साठा भरपूर प्रमाणात आढळून आला.
कच्ची धातू काढण्याचे काम सुरू असतानाच कामगारांनी तत्कालीन व्यवस्थापकांना मारहाण केली होती. त्यामुळे चिडून जाऊन या व्यवस्थापकाने येथून काढता पाय घेतला. त्यामुळे गेल्या १५ वर्षापासून हे कार्य बंद आहे. कुही-खोबना-आगरगाव परिसरात टंगस्टनचा साठा भरपूर असूनही खाण का सुरू झाली नाही, असा सवाल येळणे यांनी केला आहे. टंगस्टन खाण ही विभागाच्या भरभराटीसाठी आशेचा किरण आहे. परंतु, केंद्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
मुकुल वासनिकांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे व परिसराच्या आर्थिक विकासाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी विनंती राजू येळणे यांनी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर लोंडे, रामकृष्ण डहाके, पुष्पा पडोळे, पुष्पा भांडारकर उपस्थित होते.