Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अंध विद्यालयात रक्षाबंधन
भंडारा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

शासकीय अंध विद्यालयातील ५२ अंधअपंग विद्यार्थ्यांना एनएसयूआय गांधी विचार मंच, संस्कार आणि आरोग्य सेनेच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून सैदव पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.
याबद्दल अंध विद्यार्थी मुकेश चुटे याने कृतज्ञता व्यक्त केली. आमच्या अंधारलेल्या जीवनात

 

बहिणींच्या मायेमुळे निश्चित चंद्रकोर उगवेल, अशी आशा व्यक्त केली. मोहन वाढई आणि रोशन सराटे यांनी गाणी म्हटली. याप्रसंगी एनएसयूआय चे माजी अध्यक्ष महेश पटेल, उपाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, अयूब पटेल, रॉबर्ट पटेल, अजय ब्राह्मणकर, पीयूष घाटोळे, सुभाष बोरकर, विलास केजरकर, अर्चना मोरे, संस्कारच्या आभा मानापुरे, दीपाली नाकतोडे, प्रीती साठवणे, रोशनी बांगडकर, माधुरी भुरे, अपेक्षा टेंभुर्णे, कोमल दुबे, अश्विनी देशमुख, स्मृती सुखदेवे यांनी अंध विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अंध विद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या आवाजाची दखल घेत, दहा अंध विद्यार्थ्यांची चमूची ९ ऑगस्ट २००९ ला होणाऱ्या नगराध्यक्ष चषक देशभक्ती ‘क्रांतीवीर’ समूहगीत स्पर्धेकरिता यावेळी निवड करण्यात आली.
यावेळी शासकीय अंध विद्यालयाचे अधीक्षक विनोद उमप, विद्यार्थिनी प्रमुख अर्चना मोरे, प्यारेलाल वाघमारे, महेश रणदिवे यांनी विचार व्यक्त केले.
प्रश्न. वामन तुरिले यांनी विद्यार्थ्यांच्या सेवाभावाचे कौतुक करीत, हाती घेतलेल्या कामात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.